इथे मुख्य पदार्थ शिमला मिरची, गाजर, पत्ता गोबी, कांदा पात अंड आणि चिकन आहे. इथे व्हेज आणि नोन व्हेज असे दोन भाग पाडू शकता आणि त्यानुसार आपण काय काय बनवू शकतो ते बघू.
१) मंचुरियन (विविध प्रकार)
२) चायनीज भेळ (विविध प्रकार)
३) सूप
४) नुडल्स
५) राईस
इथे तुम्हाला शेझवान चटणी लागेल, तिच्या टेस्ट वर काम करा.
जितका सोपा मेनू ठेवता येईल तितका सोपा ठेवा, जास्त एड करण्याची गरज नाही.
क्वालिटी तुम्ही जिथे आणि जसा व्यवसाय करणार आहात त्यानुसार ठेवा, जिथे कमी दर्ज्याचे जाते तिथे उत्तम दर्ज्याचे विकले जाणार नाही आणि कोणी विकत पण घेणार नाही.
इथे काही पदार्थ ओव्हन किंवा एअर फ्रायर मध्ये बनवू शकतो पण सगळे नाही, हे मी फक्त माझे मत व्यक्त करत आहे.
हा व्यवसाय एक छोटासा टेबल टाकून, दुकान घेवून किंवा घरातून करू शकता.
जसे पहिल्या ३ भागांमध्ये सांगितले आहे त्यानुसार कमी जास्त करत व्यवसाय सुरु करू शकता.
धन्यवाद
अश्विनीकुमार
Image by Jamir Tamboli from Pixabay
0 आपले विचार