स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग २


 भाग 2 मध्ये आपण विविध व्यवसाय प्रकार बघणार आहोत


१) बेसन, बटाटा, कांदा, तिखट मिरची, कमी तिखट मिरची मोठी वाली, ऑप्शनल, पाव व ब्रेड


बेसन पासून तुम्ही किती प्रकारचे पदार्थ बनवू शकता? जास्त अतिरेक करायचा नाही प्रयोग करण्यासाठी, काही सोपे प्रयोग करू शकता पण जास्त नको.


अ) बटाटा वडा

ब) बटाटा भजी

क) कांदा भजी

ड) मिरची भजी

इ) ऑप्शनल भजी

फ) ब्रेड पेटीस


वरील पदार्थ तुम्हाला ओव्हन मध्ये आणि एअर फ्रायर मध्ये बनवता येतील असे बनवायचे आहे. इथे तुम्हाला चटणी वर काम करायचे आहे जेणे करून मुख्य गाभा जास्तीत जास्त मेंटेन राहिला पाहिजे. मुंबौ मध्ये काही पैसे वाल्यांच्या परिसरात चीज वगैरे टाकले जाते त्या मायाजालात पडू नका, जर चव चांगली असेल तर ठराविक ग्राहक सोडले कि अनेक ग्राहक मिळतील. इथे पैसा मुख्य मुद्दा नाही तर चव आहे.


इथे तुम्ही २ प्रकारे व्यवसाय करू शकता, पहिले म्हणजे घरातून आणि दुसरे म्हणजे दुकान घेवून. ते तुमच्यावर अवलंबून आहे.


इथे तुम्ही चांगल्या प्रतीचा माल ठेवा कारण इथे किंमत वाढणार आहे, दुसरा पर्याय नाही.


जर हॉटेल किंवा खानावळ किंवा इतर कुणासोबत सोबत टाय अप असेल तर त्या नुसार माल बनवून द्याल, इथे तुम्हाला कौशल्य लागेल.


जिथे पैसा असतो तिथे कौशल्य आणि अनुभव लागतो.


जर शक्य असल्या मिनी स्नेक्स बनवू शकत असाल तर उत्तम, हे लहान मुलांसाठी खूप कामी येईल.


मिनी सेक्स जर बार आणि रेस्टॉरंट मध्ये देणार असाल तर चवीकडे लक्ष ठेवलं व त्यानुसार माल तयार कराल.


कमीत कमी १० लोकांच्या घरपोच ऑर्डर घेत चला डीस्तंस बघून. आणि जर तुमच्या जागी येत असतील तर तसे करा. शक्य असल्यास तडजोड सगळे करतात.


सुरुवात नेहमी हळू होते त्यामुळे फक्त दररोजच्या कामावर लक्ष द्या, आपोआप व्यवसाय जोर पकडत जातो.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Photo by Aditya Mara: https://www.pexels.com/photo/a-vada-pav-lunchbox-17433353/

Previous
Next Post »
0 आपले विचार