स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग १


 १) बेसन, बटाटा, कांदा, तिखट मिरची, कमी तिखट मिरची मोठी वाली, ऑप्शनल, पाव व ब्रेड


बेसन पासून तुम्ही किती प्रकारचे पदार्थ बनवू शकता? जास्त अतिरेक करायचा नाही प्रयोग करण्यासाठी, काही सोपे प्रयोग करू शकता पण जास्त नको.


अ) बटाटा वडा

ब) बटाटा भजी

क) कांदा भजी

ड) मिरची भजी

इ) ऑप्शनल भजी

फ) ब्रेड पेटीस


मी वैयक्तिक रित्या इथे समोसा एड करत नाही कारण इथे एक मुख्य सामग्री लागते ती म्हणजे मैदा आणि मैद्यापासून आपण कुठचे पदार्थ बनतात ते पुढे बघू


जितके सोपे मेनू ठेवता येईल तितके सोपे ठेवा, चटणी खूप महत्वाची आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. जास्तीत जास्त ३ प्रकारची चटण्या ठेवा त्यापेक्षा जास्त नको. ओली सुखी चटणी बनवणे सोपे आहे फक्त प्रयोग करून बघायचे आहेत प्रमाण कमी जास्त करून.


बटाट्याच्या भाजीची चव चांगली ठेवा आणि जर ठीक ठक चव असेल तर जास्तीत जास्त गरम गरम देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून गरम लोक लगेच खाऊन टाकतात व सहसा चवीकडे लक्ष जात नाही पण थंड झाल्यास लोकांमधील करमचंद जागृत होईल.


माल घेताना जो तुमची बनवता त्या पद्धतीला योग्य असेल तोच घ्याल, त्यामध्ये बदल नको, तोटा झाला तरी चालेल पण ग्राहकाला एकसारखाच माल द्याल मग तो तुमचा कायमस्वरूपी ग्राहक बनेल. हा जेव्हा प्रचंड महाग असले तेव्हा तुम्हाला तुमच्या बजेट नुसार वागावे लागेल पण उन्नीस बीस असेल तर ग्राहकांकडे लक्ष द्या.


म्हणजे इथे तुम्ही बेसनाचा वर करून विविध पदार्थ बनवत आहात. आणि जे जे बेसनाने शक्य आहे तेच बनवा म्हणून मी समोसा बाजूला ठेवायला सांगितला, हा पण इथे तुम्ही बाहेरून माल मागवू शकता, काही इश्यू नाही.


एक लक्ष्यात ठेवा व्यवसाय म्हणजे तुम्हाला ग्राहकांचा विचार करायचा आहे, जास्त वेळ दुकान बंद ठेवू शकत नाही, सातत्य प्रचंड पाहिजे आणि संपूर्ण कुटुंब कामाला लागले पाहिजे ना की फक्त एक व्यक्ती. तुम्ही वडापाव विका किंवा एसी मध्ये बसून काम करा शेवटी पैसाच कमवायचा आहे, जर रेडीमेड व्यवसाय मिळत असेल तर नोकरी करणे टाळा व व्यवसायाकडे लक्ष द्या.


तुमचे आई वडील जुने विचारांचे असे बोलून वडापाव मध्ये चीज टाकत बसू नका, जे उत्तम सुरु आहे तेच सुरु राहू द्या, आयुष्य असेच असते, काही नवीन नसते. आणि सोशल नेटवर्क पासून सहसा लांब रहा कुणाला व्हिडीओ रेकोर्ड करायला देवू नका, स्थानिक ग्राहक आणि रनिंग ग्राहक सर्व तुम्हाला मिळतील आणि जर चव उत्तम असेल तर दुरून देखील ग्राहक येतील.


कुणाची भांडू नका, ज्यांना ज्यांना पैसे द्यायचे आहेत त्यांना त्यांना देत जा, स्थानिक सारखे वागू नका, असे समजा कि तुमचे कोणीच नाही आणि व्यवसाय करा, तुम्हाला सगळ्यांना सांभाळून घ्यायचे आहे. आणि एकदा का तुम्ही तुमच्या लोकल परिसरात स्थिर झालात तर प्रयत्न करा कि स्टेशन सारख्या किंवा इतर कुठल्याही गजबजलेल्या परिसरात व्यवसाय सुरु करण्याचा. एकदा का अनुभव आला कि तुम्ही आरामात करू शकता.


केल्याशिवाय समजत नाही आणि आर्थिक तोट्या पासून शिका ना कि लांब पळा. तुमच्याकडे पैसे असतील तरी ओळखीच्या कडून उधार घ्या व त्यांना परत देत चला, कारण वेळ प्रसंगी तुमच्याकडे पैसे नसतील आणि देता नाही आले तर समजून घेतील.


प्रयत्न करा कि डोक शांत ठेवण्याचा, हळू हळू सवय होईल, काही कोरिअन सीरिअल मध्ये बघितले आहे कि तोंडाला बांधायचे मिळते ते जर तुम्ही वापरले तर उत्तम कारण ते पूर्ण पेक नाही आहे मास्क सारखे. ग्लोज वापरणे शक्य नाही त्यामुळे हाताचा वापर कराल, आतापर्यंत इतकी वर्षे बिना ग्लोज चे खात आलो आहेत आपण, आणि नेहमीचा ३६५ दिवस कोणी आजारी नसतो.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Photo by Aditya Mara: https://www.pexels.com/photo/a-vada-pav-lunchbox-17433353/

Previous
Next Post »
0 आपले विचार