जर तुमचे उत्पादन किंवा तुमची सेवा हि तुमच्यानुसार आणि बाजारपेठेत आलेल्या ग्राहकांच्या अनुभवानुसार योग्य असेल तर तुम्हाला विनाकारण किंमत कमी करण्याची गरज नाही. सुरुवातील थोडा वेळ लागेल पण तुमचे उत्पादन किंवा तुमची सेवा हि तुमच्या ग्राहकांद्वारेच इतरांपर्यंत पोहचेल. ग्राहक मूर्ख नाही, त्यांना देखील माहिती आहे कि ते कुठे पैसे खर्च करत आहेत म्हणून.
भले तुमचे उत्पादन किंवा सेवा त्या तोडीची का असेना पण ग्राहक जो अभिप्राय देतो तो अमुल्य असतो. नंतर बदल करू शकता पण सुरुवातीपासून नको. सतत कमी किमतीत उत्पादने आणि सेवा विकणार्यांवर आता ग्राहक शंका घेत असतात.
जे नवीन असतात त्यांचे एकदा आपण समजू शकतो आणि दुसरीकडे काही ठराविक लोक ज्यांना ग्राहकाचे हित नाही तर ग्राहकांचा पैसा पाहिजे तेच स्वस्त, कमी किंमत अश्यांचा मारा करत असतात. इथे गरीब श्रीमंत हा प्रश्न नाही. जो गरीब आहे आणि ज्याला खाण्याची आवड आहे तो पंच तारांकित हॉटेल मध्ये सुद्धा खाण्याचा अनुभव घेवून आलेला असतो.
तुम्ही तुमचे उत्पादन किंवा सेवा योग्य दर ठेवून विका, ग्राहक स्वतःहून येतील.
योग्य पद्धतीने उद्योग व्यवसाय करा, प्रगती हळू हळू होईल पण भक्कम आणि दीर्घकालीन होईल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
सल्ला, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण
0 आपले विचार