योग्य दर लावूनही दीर्घकालीन उद्योग व्यवसाय करता येतो.


 एकदा एका व्यक्तीने फोन केला होता, त्याचा व्यवसाय हा व्यवस्थित चालत होता पण काही महिन्यांपासून व्यवसाय पाहिजे तसा नफा देत नव्हता. असे का होत होते? जेव्हा त्याने सल्ला घ्यायला फोन केला तेव्हा मूळ समस्या हि समजून आली.


नवीन इंटरनेट स्वस्त झाले, त्यामध्ये विदेशी भ्रम पसरवणारे प्रोस्ताहन देणारे प्रशिक्षक आले ज्यांचा आणि उद्योग व्यवसायाचा काही संबंध नाही, त्यामध्ये शून्यातून करोडपती असे उदाहरण देत होते. म्हणजे जगात कोणी करोड च्या आत कमावणारा नकोच असे त्यांचे म्हणणे होते जे वास्तवाला धरून नव्हते.


इंग्रजी बोलणे, त्यामध्ये ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही अश्यांना न्यूनगंड, असे वाटायचे कि आपल्यातच काही कमी आहे का? जर काही हजार आणि लाखो रुपये कमावून पण मी अपयशी आहे का? माझे दर कमी आहेत का? कि मी माझी किंमत करत नाही? असे प्रश्न मनात येवू लागले व त्याचा परिणाम हा व्यवसायावर व्हायला लागला.


सर्वात अगोदर तर मी त्या व्यवसायिकाचा इंटरनेट चा वापर हा कामापुरता करायला लावला. भारतीय अर्थव्यवस्था कशी उत्तम आहे आणि बदलाची मानसिकता कशी आणि केव्हा ठेवायची हे समजावून सांगितले. त्यांचे दर योग्य का आहेत हे देखील सांगितले. आणि ह्यामुळे फिक्स ग्राहक कसे मिळतात जो पाया असेल व नंतर अल्पकालीन ग्राहक कसे मिळतात हे त्यांच्या व्यवसायातून दाखवून दिले.


जो खर्च होता तो कमी करायला लावला, जास्तीत जास्त खर्च हा खाजगी जीवनावर होता, फक्त महिन्याला इतके लाखो कमावतात म्हणून इतका खर्च करायचा असतो किंवा अशी जीवनशैली जगायची असते असे सर्व वायफळ खर्च बंद करायला लावले.


पैसा वाचायला लागला, जिथे काम कमी असेल तिथे बचत कामी यायला लागली, पाया भक्कम झाला, हळू हळू वाढ होऊ लागली, नवीन व्यवसायिकांचे आवाहने पेलता येवू लागली, योग्य दर असल्यामुळे ग्राहक काही सोडून जात नव्हते व जे कटकटीचे ग्राहक होते त्यांना सरळ नाही बोलायचे हे सांगितले, ह्यामुळे ना उधारी, ना कमी पैसे आणि ना हि नकारात्मक माउथ पब्लिसिटी झाली.


इथे जोडीदाराची साथ लागते जर ती भेटत नसेल तर कोणीही काहीही करू शकत नाही, जोडीदाराला स्पष्ट शब्दात बोलायला शिका, आयुष्य म्हणजे सिनेमा नाही. नकारात्मक जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा एकटे राहिलेले बरे. हा काही कठीण निर्णय नाही हे लक्ष्यात ठेवा.


मुलांना अगोदरपासून योग्य संस्कार देणे गरजेचे आहे. त्यांना स्वतंत्र पण द्या सोबत लक्ष देखील ठेवा, आयुष्याचा सामना करायला लावा, सुरुवातीपासून भावनिक दृष्ट्या सक्षम बनवा, हे खाजगी सांगण्याचा उद्देश हाच आहे कि खाजगी आयुष्याचा देखील मानसिकतेवर प्रभाव पडतो.


शारीरिक आणि मानसिक आरोग्याला पहिले महत्व द्या, ह्या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा, लाखो रुपये आजारपणावर खर्च करण्यापेक्षा काही हजार रुपये आरोग्यावर खर्च केलेले कधीही उत्तम.


आता येणाऱ्या ग्राहकांना अभिमानाने सांगतात कि ५ वर्षे झाले मी व्यवसायात आहे आणि इथेच एक स्थैर्य दिसते, ग्राहकांना विश्वास असतो कि जेव्हा गरज असेल तेव्हा ती व्यक्ती इथे असेलच म्हणून कोणीही नवीन जरी आला तरी फुकटात काही घेत नाही आणि इतरांना देखील योग्य माहिती देत सांगतात कि इथे तुम्हाला योग्य दरात चांगली सेवा मिळणार आहे. मी देखील फुकट किंवा कमी जिथे तिथे जात नाही कारण अनुभव घेतले आहे, आणि इंटरनेट रीव्ह्युव वर विश्वास नाही पण जे तिथे प्रत्यक्ष जावून अनुभव घेतले त्यांच्या सांगण्यानुसार जातो व ९९ % माहिती हि योग्यच मिळालेली असते व त्यानुसार पुढे सांगितले जाते.


ह्यामुळे व्यवसाय दुप्पट होऊ शकत होता पण केला नाही, कारण जितके झेपते तितकेच काम करायचे, विनाकारण ताण घ्यायचा नाही, कर्ज घ्यायचे नाही नाहीतर असे उद्योजक व्यवसायिक ह्यांचे फोटो भिंतीवर दिसून येतात, कारण काय तर हायपरटेन्शन, हृदयविकार चा झटका किंवा इतर आजार. हे सांगितले आहे ते वास्तव आहे. आयुष्यात जन्म मृत्यू मध्ये परत संधी भेटत नाही त्यामुळे जे आयुष्य जगत आहात ते हुशारीने जगा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


 मध्यम वर्गीय मानसिकता हि उद्योजक व्यवसायिक बनण्यासाठी अतिशय उत्तम आहे, इथे बचतीवर जोर दिला जातो, त्यामुळे आर्थिक आयुष्याचा पाया इतका भक्कम बनतो कि थोडे पैसे हे उद्योग व्यवसायासाठी वापरू शकता. अपयशी झाला तरीही जास्त नुकसान होत नाही व प्रयत्न करायला तुमच्याकडे पुरेसा पैसा असतो. आणि जर उद्योग व्यवसाय हा यशस्वी झाला तर सुरुवातीपासून बचत करत करत तुम्ही तुमचाच उद्योग व्यवसाय हा कुठेही कर्ज न घेता वाढवू शकता, स्वतःच्याच उद्योग व्यवसायात पैसे गुंतवू शकता.


अश्विनीकुमार


 जेव्हा सकाळी तुम्ही तुमच्या ऑफिस चे दार उघडाल, दुकानाचे शटर उघडाल किंवा व्यवसायिक वस्तूला हात लावाल तेव्हा नेहमी 


"नवीन दिवस नवीन सुरुवात." 

"आजचा दिवस सकारात्मक जाईल." 

"आज मी आनंद मौज मजेने दिवस घालवेल." 


हे वाक्य बोलून करा भले तुम्ही कर्जात का असेना, आर्थिक विवंचनेत का असेना तुम्ही हि परिस्थिती फक्त सकारात्मक मानसिकतेनेच बदलू शकता. सकारात्मक मानसिकतेवाला उद्योजक व्यवसायिक हा कुठल्याही परिस्थितीवर मात करून परत भरारी घेवू शकतो.


अश्विनीकुमार


 पैसा टिकवण्यासाठी आर्थीक मानसिकता खूप महत्वाची असते. एका विद्यार्थ्याला त्याचा नवीन व्यवसाय सुरु करेपर्यंत ते स्थिर होईपर्यंत मार्गदर्शन केले. जिथे सुरुवातीला सर्व बरोबर सुरु होते पण जस जसा व्यवसाय जमू लागला तस तसा विद्यार्थी बदलला. आलेले पैसे हे साठवले नाही तर परदेशी सुट्ट्या, मुली आणि दारू ह्यावर खर्च केले. अशी वागणूक होती कि जसे ह्या पैश्यांच्या प्रवाहाचा सातत्य आहे तसाच राहणार आहे पण असे काही झाले नाही, पैश्यांचा प्रवाह तर आटलाच पण सोबत वडीलांचे आजारपण आले. पैसा जो पर्यंत तुमच्याकडे आहे तो पर्यंत तुमचा आहे, एकदा का गेला कि परत शक्यता नाही कि तुम्हाला भेटेलच म्हणून. आहे तो जपून वापरा ह्याचा अर्थ असा नाही कि घाबरून करत आहात, ह्याचा अर्थ असा आहे कि हुशारीने वापरत आहात. एक वेळ अशी येईल कि पैसा साठलेला देखील असेल, गुंतवलेला देखील व खर्च करून देखील उरत असेल. नफा तोटा व्यवसायाचा भाग आहे आणि फक्त नफा हा घोटाळा, फसवणूक आहे.

अश्विनीकुमार


 शेतकऱ्याच्या कांद्याला २ रुपये भाव मिळत होता, थेट शेतकऱ्याला मदत करायचे ठरवले पण मध्येच सातत्याने बातमी दिसत होती ती उर्फी जावेद ची, हे आहे फेसबुक चे अल्गोरिदम. फेसबुक ने ह्या उर्फी जावेद, धर्म आणि राजकारण ह्याच्या नादापायी अनेक शेतकरी, कष्टकरी आणि शहरी मध्यम वर्गाच्या व्यथा सामान्य नागरिकांपर्यंत पोहचू दिल्या नाही ज्यामुळे ज्या आत्महत्या आपण थांबवू शकत होतो त्या देखील थांबवल्या गेल्या नाही पण  नंतर परत राजकारण्यांचा एकमेकांसोबत भांडतानाच्या बातम्या फेसबुक लगेच दाखवू लागला. हे असे फेसबुक चे अल्गोरिदम जे जगभरातील त्या त्या देशाच्या सामान्य नागरिकांच्या जीवावर उठले आहे.


अश्विनीकुमार


 “mentalist सुहानी शाह हिचे शिक्षण इयत्ता पहिली पर्यंत झाले आहे. वय वर्ष ३२ ह्या वयात तो जगप्रसिद्ध mentalist आहे. तिने पहिला स्टेज शो हा वयाच्या ७ व्या वर्षी केला. सुहानी शाह ला जादू कोणी शिकवले नाही ती स्वतः शिकली. असे अनेक सुहानी शाह सारखी लोक आपल्या महाराष्ट्रात देखील आहेत ज्यांनी ८ ते १० वर्षी सुरुवात केली व आज ते यशस्वी आहेत. सुहानी शाह बोलते कि तिला जादू शिकायची आहे, जे आवडते ते शाळेत शिकवले जात नाही मग दुसरा पर्याय काय? स्वतः शिकणे. शिक्षण फक्त शाळेतून भेटत नाही तर शिकणारा कसाही कुठूनही शिकू शकतो, ह्याला बोलतात अनुभव. बिनधास्त आयुष्याच्या शाळेतून शिका, अमर्याद आहे शिकण्यासारखे.”


अश्विनीकुमार


 "अगोदर कुठल्याही कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक केली तर पूर्ण नफ्याचा परतावा सरळ सामान्य लोकांना मिळायचा. पण आता गुंतवणूकदार सर्व नफा आपल्याकडे घेवून उरलेला चोथा हा सामान्य लोकांसाठी ठेवतात. आणि हेच गुंतवणूकदार खराब कंपनीमध्ये गुंतवणूक करून, जो पर्यंत नफा निघत नाही तोपर्यंत तिच्या शेअर्स चे भाव वाढवून सामान्य लोकांच्या गळ्यात मारले जाते व स्वतःचा नफा काढून सेफ राहिले जाते. जेव्हा सामान्य व्यक्ती हे शेअर्स घेतो त्यानंतर शेअर्स सरळ गडगडायला सुरुवात होते. आर्थिक व्यवहारात स्वतः माहिती घ्यायला शिका."


अश्विनीकुमार

वर्तमान शिक्षण व्यवस्था आयुष्य कसे बरबाद करते?

सुरुवातीला लागणारे मानसिक शारीरिक व सामाजिक विकासाचे शिक्षण दिले जात नाही. ज्याला संस्कार बोलतात.


कौशल्य विकासावर भर दिला जात नाही.


भावनांवर ताबा ठेवायला शिकवले जात नाही.


अध्यात्म, मानसशास्त्र ह्याची योग्य माहिती दिली जात नाही.


विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक क्षमता ओळखण्याचा प्रयत्न केला जात नाही.


इयत्ता आठवी ते बारावी जिथे जबाबदारीची जाणीव करून द्यायची असते तिथे १० वी १२ वी च्या परीक्षेची भीती घालतात.


इयत्ता आठवीत आर्थिक परिस्थिती मध्ये शिक्षण सोडावे लागल्यामुळे अनेक विद्यार्थी काळाच्या ओघात वाहून जातात तर काहीच पुढे जातात.


शिक्षण प्रचंड महाग करून ठेवले.


चौकटीबाहेर विचार करायचा शिकवला जात नाही. काही शिक्षक असतात जे आपल्या विद्यार्थ्यांना अगोदरच हि माहिती देवून ठेवतात पण हा शिक्षणाचा भाग नाही.


मोची कसे बनावे, दुकान कसे सुरु करावे, फोटोग्राफी चा व्यवसाय कसा सुरु करावा, प्लंबर कसे बनावे ह्या आणि अश्या अनेक क्षेत्रांना वाव दिली जात नाही किंवा त्यांना खालच्या दर्ज्याचे काम म्हणून हिणवले जाते.


नोकरी शिवाय दुसरा पर्याय ठेवला नाही.


स्थानिक बाजारपेठेला अनुसरून शिक्षण पद्धती बनवली जात नाही, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ती देखील फक्त अमेरिका बाजारपेठेला अनुसरून शिक्षण पद्धती तयार केली जाते.


नोकरी ह्या फक्त एकाच मार्गामुळे अनेक लघु उद्योजक व्यवसायिक तयार होणे कधीच बंद झाले.


ज्यांनी शिक्षण सोडले किंवा चौकटीबाहेर पाउल ठेवले त्यापैकी अनेक प्रगतीपथावर आहे.


अश्विनीकुमार

बाजार भांडवलानुसार भारतातील १० प्रमुख कंपन्यांची यादी

रिलायन्स इंडस्ट्री

बाजार भांडवल - १५,६३,८८७ करोड
अक्षरी - पंधरा लाख त्रेशष्ठ हजार आठशे सत्याऐंशी करोड

टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस

बाजार भांडवल - १२,६६,०३१ करोड
अक्षरी - बारा लाख सहाषष्ठ हजार एकतीस करोड

एचडीएफसी बँक

बाजार भांडवल - ९,२१,३११ करोड.
अक्षरी - नऊ लाख एकवीस हजार तीनशे अकरा करोड

इंफोसिस

बाजार भांडवल - ६,६०,८७९ करोड
अक्षरी - सहा लाख साथ हजार आठशे एकोणऐंशी करोड

हिंदुस्तान युनिलिव्हर

बाजार भांडवल - ६,२०,९९६
अक्षरी - सहा लाख वीस हजार नऊशे शह्याण्णव करोड

आयसीआयसीआय बँक

बाजार भांडवल - ५,९५,७०७
अक्षरी - पाच लाख पंच्याण्णव हजार सातशे सात

एचडीएफसी बँक

बाजार भांडवल - ४,८९,७८३
अक्षरी - चार लाख एकोणऐंशी हजार सातशे त्र्याऐंशी

एसबीआय बँक

बाजार भांडवल - ४,८६,७०३
अक्षरी - चार लाख सह्याऐंशी हजार सातशे तीन

आयटीसी

बाजार भांडवल - ४,७५,८२९
अक्षरी - चार लाख पंच्याहत्तर हजार आठशे एकोणतीस

भारती एअरटेल

बाजार भांडवल - ४,४७,६५६
अक्षरी - चार लाख सत्तेचाळीस हजार सहाशे छप्पन

अश्विनीकुमार

*रेफरंस : बिझनेस इनसायडर वेबसाईट