स्टार्टअप आणि व्हिसी ह्या लोकांनी मिळून भारतातील सुरु होणारे अनेक उद्योग व्यवसाय बंद पडून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसाय हे डबघाईला आणले.
तुम्हाला येणारा प्रश्न अगदी योग्य आहे कि त्यांना उद्योग व्यवसाय करता येत नाही म्हणून त्यांचे उद्योग व्यवसाय हे डबघाईला आले म्हणून. आता पुढे मी मुख्य मुद्द्यावर हात घालणार आहे.
कुठलाही उद्योग व्यवसाय पकडू जे सामान्य लोक सुरु करतात. काहींची आर्थिक परिस्थिती उत्तम असते तर काहींची नसते पण ज्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहेत ते काही २०० ५०० करोड उभे करू शकत नाही जे व्हिसी देवू शकतात आणि नाही सर्वांनाच व्हिसी ची गरज लागते.
आता आपण विश्लेषण करू
खाद्य पदार्थ व्यवसाय
१) रस्त्यावरील खाद्यपदार्थ ते खानावळ
२) १ ते ५ तारांकित हॉटेल्स
एक स्टार्टअप येते व बोलते कि मी तुम्हाला घरोघरी जेवण डिलिव्हर करेन. आता समजा मला जर जेवण मागवायचे झाले तर माझ्याकडे स्थानी हॉटेल्स चे नंबर आहेतच मग ह्यांची काय गरज? रात्री पण अनेक खाद्यपदार्थ व्यवसाय सुरु असतात. आणि समजा माझ्या घरापासून १ किलोमीटर लांब जर एखादे प्रसिद्ध हॉटेल्स माझ्या परिसरात डिलिव्हरी देत नसेल तर समजू शकतो, तिथे ह्यांची मदत कामी येते का? हो, फक्त थोडे किलोमीटर वाढतात.
स्वतःचे उत्पादन काही नाही आणि ना हि डिलिव्हरी चा अनुभव. फक्त भारतातील प्रसिद्ध विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्या विद्यापीठातून जास्तीत जास्त विद्यार्थी भारताबाहेर स्थायिक झाले. ग्रासरूट हा शब्द लागू होत नाही. ग्रासरूट वाले अनेक उद्योजक आणि व्यवसायिक आहेत आपल्याकडे जे परदेशी गेलेल्या लोकांपेक्षा जास्त भारतात कमावतात.
ह्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग व्यवसायांवर लक्ष केंद्रित करायचे, चांगली कितीतरी घरे इमानदारीत चालत होती महिन्याला काही हजार ते लाखोंचे उलाढाल करायचे, आरामात स्थानिक स्तरावर उत्तम बाजारपेठ काबीज करून जगत होते तिथे लक्ष गेले स्टार्टअप वाल्यांचे.
नाही बोलले तरी एककेंद्री झाले तर करोडोंचा टर्नओव्हर आहे, पण त्यामध्ये अनेक इमानदार उद्योजक व्यवसायिकांचे मरण आहे. आणि खर्च अनेक उद्योजक व्यवसायिक हे डबघाईला आलेसुद्धा.
स्टार्टअप वाले आणि व्हिसी सोबत सरळ संपर्कात नसलेले ग्राहक जे स्थानिक उद्योजक व्यवसायिकांच्या संपर्कात होते तसे. नवीन स्टार्टअप चेन उतरली, माल घेण्यापासून ते देण्यापर्यंत, ग्राहकांचा डाटा हे सर्व त्यांच्याकडे आले.
आता समजा एक व्यवसायिक एक हॉटेल सुरु करत आहे, तो तुम्हाला सूट देईल का? नाही ना, कारण सामान्य व्यवसाय हे असेच चालतात. चांगली चव असेल तर चालेल आणि नसेल तर बनाद होवून जाईल कारण कुठलाही व्हिसी प्रकारच नाही, एक रुपया पण कोणी देणार नाही.
आता येतो स्टार्टअप वाला, त्याल पैसे मिळतात व्हिसीकडून, मग तो सूट द्यायला सुरु करतो, ग्राहकांसोबत भावनिक टच नाही तर ते फक्त नफ्याचा किंवा भविष्याचा एक ग्राफ आहेत. मग अप्रत्यक्ष जे जुने उद्योजक व्यवसायिक होते त्यांच्याकडे ग्राहक कमी होतात, असे करत करत शेवटी फटका पडत एक एक उद्योग व्यवसाय हा तोट्यात जावून बंद होतो पण इथे व्हिसी च्या पैश्यानी स्टार्टअप घाट्यात पण उद्योग व्यवसाय करू शकतात.
असे बिचारे कितीतरी उद्योग व्यवसाय अबंड झाले ह्यावर कुणाचे लक्ष्यच नाही, सोबत नको तिथे क्लाउड किचन तयार झाले, ह्या अगोदर असे व्यवसाय नव्हते का? होते ना? मग विनाकारण कश्याला नाव द्यायचे क्लाउड किचन वगैरे?
स्टार्टअप वाले अनेक वर्षे व्हिसी च्या पैश्यांवर बाजारपेठेत जागा पकडून राहणार व अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्ये व्यवसायांना टार्गेट करणार आणि वरून पैसे देवून स्वतःची इमेज मार्केटिंग पण करणार?
म्हणजे अगोदर काय उद्योजक व्यवसायिक तयार झाले नव्हते का? का कोणी चितळे ला नावे ठेवत नाही? चितळे ने तर असे काही केले नाही बाकी पण भाकरवडी बनवतातच ना? ह्याला बोलतात उद्योग व्यवसाय करण्याची भारतीय पद्धत, स्टार्टअप वाल्यांची आहे का? चितळे नां कधी इमेज मार्केटिंग नाही करावी लागली कारण आम्ही ग्राहक म्हणून त्यांची साक्ष देतो.
एक जर इमानदारीत एखाद्या मार्जिन वर व्यवसाय करत असेल त्याचा तो मार्जिन कमी कमी होत जाईलच ना, तो कसा भरून काढणार, चला काही साठवलेले पैसे असतील पण त्यापुढे काय? समजायला पाहिजे. व्हिसी काय पैश्यांवर पैसे ओतू शकतो पण सामान्य उद्योजक व्यवसायिक नाही.
स्टार्टअप सोडा आणि तुमच्या स्थानिक बाजारपेठेत जावून एखाद्या उद्योग व्यवसायाला प्रसिद्ध करा. जर तुमच्या आवडीनुसार नसेल तर तुम्ही उद्योग व्यवसाय सुरु करा नाहीतर अश्या उद्योग व्यवसायात गुंतवणूक करा, एक खात्री देतो कि तुम्ही जितके शेअर बाजारात नाही कमावणार तितके तुम्ही स्थानिक बाजारपेठेत गुंतवणूक करून कामवाल.
एकत्र या, एकमेकांना सपोर्ट करा, भावनि होवून सपोर्ट नको तर तो त्या लायक असलाच पाहिजे अश्यांना सपोर्ट करा, दीर्घकाली असेल अश्यांना सपोर्ट करा मग बघा गल्लोगल्लीत मराठी उद्योजक व्यवसायिक दिसतील व हे स्टार्टअप वाले गाशा गुंडाळून जातील. हे एकट्याचे काम नाही.
मला आशा आहे मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला समजले असेल, मुक्त चर्चा मान्य आहे, विरोधी विचारांचा देखील आदर आहे, फक्त ट्रोलर मान्य नाहीत, त्यांना ब्लॉक करण्यात येईल. विरोधी विचारात अनेकदा शिकायला मिळते पण ट्रोलर मध्ये नाही. आपण भले, आपले घर भले आणि आपला उद्योग व्यवसाय भला, राजकारणापासून चार हात लांब.
धन्यवाद
अश्विनीकुमार