स्थानिक स्वदेश उद्योजक व्यवसायिक आणि गुंतवणूकदार तयार करा.


 गुंतवणूक स्थानिक उद्योजक व्यवसायात करा.


शेअर बाजारपेक्षा जास्त नफा स्थानिक उद्योजक व्यवसायिक निर्माण करू देतील.


ज्ञान जागतिक ठेवा व त्याचा वापर स्थानिक पातळीवर करा.


विदेशी प्रोस्ताहनला बळी पडू नका.


हजारो कोटी उलाढाल करणारा उद्योजक व्यवसायिक निर्माण करण्यापेक्षा लाखोंची उलाढाल करणारे हजारो उद्योजक व्यवसायिक निर्माण करा.


धन्यवाद

अश्विनीकुमार


सर्व आदर लोक जेव्हा सांगतात कि ते माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कार्यालयात काम करतात तेव्हा देतात. पण एक मुख्य मुद्दा विसरलात कि जग नोकरीच्या पलीकडे खूप मोठे आहे त्यामुळे तुम्ही देखील तुम्ही करत असलेला उद्योग व्यवसाय अभिमानाने सांगा.


"मी रिक्षाचालक आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी वडापाव विक्रेता आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी दुकानदार आहे आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."
"मी खानावळ चालवतो आणि मला माझ्या व्यवसायाचा अभिमान आहे."


तुमचा जो काही व्यवसाय आहे तो कमेंट टाकून अभिमान व्यक्त करा. कळू दया लोकांना कि नोकरी सोडून देखील असे अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड संधी उपलब्ध आहेत. किती दिवस संकुचित मर्यादेत रहायचे? अशी अनेक लोक संपर्कात आली ज्यांनी छोट्यापासून सुरुवात केली मग ते रिक्षावाले ते रस्त्यावर विक्री करणारे आज श्रीमंत झाले आहेत.


इथे मुद्दा कोण किती श्रीमंत झाला हा नाही तर इथे मुद्दा आहे कि नोकरी सोडून असे अनेक क्षेत्र आहेत जिथे स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. आणि हे शाळेत शिकवले पाहिजे ना कि पदवी देवून नंतर बेरोजगारांची फौज तयार केली पाहिजे. जर शिक्षण चांगला रिक्षावाला, वडापाव वाला, दुकानदार, खानावळ चालवणारा, गेरेज वाला नसेल बनवत तर असे शिक्षण काय कामाचे? म्हणजे शिक्षण भेदभाव करते.


तुम्ही तुमचे जीवन जगण्यासाठी, आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी जे जे काम करत आहात त्याचा आदर आहे.


धन्यवाद
अश्विनीकुमार

 


 “उद्योग व्यवसायात उतरण्याची काहींचे वय हे ८ वर्षे, १२ वर्षे, १५ वर्षे, १८ वर्षे ते ७० वर्षे आहे. उद्योग व्यवसायात कुठेही आडकाठी नाही, ज्याला जे करायचे तो ते करू शकतो. तुम्हाला स्पर्धा अश्या सर्वांसोबत करायची आहे प्रत्येकाचा अनुभव हा दांडगा आहे, काहींनी ४, ५ उद्योग व्यवसायात प्रयत्न करून ६ व्यात यश मिळवले तर काहींनी सपशेल अपयश तर काहींनी साहिंच्या साही मध्ये यश. इतके विविध अनुभव घेतले आहे कि तोडच नाही. हे सर्व दिसायला सामान्य वाटतात पण ह्यांच्याकडे असलेले ज्ञान हे तुम्हाला जगातील कितीही मोठ्या विद्यापीठात मिळणार नाही. म्हणून सांगतो स्वतःला कमी समजू नका, तुमच्यात देखील क्षमता आहे आणि बाजारपेठेत ती तुम्ही आरामात दाखवू शकता, आम्हाला पण एका उद्योजक व्यवसायिकाची गरज आहे. बाजारपेठेत मागणी हि सतत सुरूच असते.”

अश्विनीकुमार

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने Byju वर विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे क्रमांक घेवून धमकी वजा सूचना देत त्यांचे कोर्सेस विकतात हा आरोप केला आहे.




Byju's ऑनलाईन शैक्षणिक सेवा पुरवणारी कंपनी आहे. मी मध्यंतरी अश्या सर्वांवर किंवा अश्या लोकांवर किंवा अश्या लोकांचे सुविचार टाकणे बंद केले कारण मला माहिती होते कि ह्यांची माझ्याकडून नकळत मार्केटिंग होईल, माझे फेसबुक पेज वाढत जाईल, कोणीतरी पालक Byju's चे महागडे कोर्सेस घेईल व व स्वतःच्या मुलांवर दबाव टाकेन.


Byju's चा मालक त्याच्या जीवनावर देखील मी एक लेख लिहिणार होतो पण जेव्हा शिक्षण शैक्षणिक क्षेत्राची काळी बाजू समजले तेव्हापासून हात जोडले. जे जे प्रोस्ताहन देणारे आहेत, अब्जो कमावलेले आहेत, त्या सर्व पैसे देवून मार्केटिंग करण्यात आले आहे नाहीतर आमच्या काळापासून ते आता पर्यंत का नाही चांगले शिक्षक यशस्वी झालेत? ज्यांना मार्केटिंग जमले आणि ज्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्यापेक्षा जास्त चिंता हि त्यांच्या पालकांकडे असलेल्या पैश्यांवर होते तेच कसे पुढे गेले?


शिक्षण किती मुलांसाठी घातक होत गेले हे आपण आता समजून घेवू


"NCPCR" हि सरकारी संस्था "National Commission for Protection of Child Rights" मराठीत "राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग" हा तिचा फुलफोर्म, ह्या संस्थेचे काम काय आहे माहिती आहे काय? ह्यावरून तुम्हाला समजले पाहिजे कि हे प्रकरण किती गंभीर आहे ते. हि संस्न्था लहान मुलांच्या हक्कांसाठी काम करते. म्हणजे विचार करा कि ह्या संस्थेला मध्यस्थी करावी लागली ते.


राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग Byju's ला हजर राहण्याचा हुकून बजावला. Byju's वर आरोप काय करण्यात आले? काहीतरी असेल म्हणून तर हुकुम बजावण्यात आला. त्यांच्यावर आरोप malpractice म्हणजे व्यावसायिक सेवेतील निष्काळजी, गैर किंवा बेकायदेशीर वर्तन; गैरव्यवहार, दुराचार चा करण्यात आला. विचार करा शैक्षणिक संस्था आणि तिच्यावर असले आरोप.


आरोप काय आहे तर कोर्स, क्लास म्हणजे शिकवणी विकत घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो, चुकीची माहिती दिली जाते, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे फोन क्रमांक विकत घेतले जातात, जर त्यांचे कोर्सेस क्लासेस म्हणजे शिकवण्या नाही घेतल्या तर मुलांचे भविष्य उध्वस्त होईल अशी भीती घातली जाते. भारतातील सामाजिक व्यवस्था अशी होती कि काहींना शिक्षणाचा अधिकार नव्हता पण तेच इंग्रजांनी निर्माण केलेल्या शिक्षण व्यवस्थेत होता मग अशे पालक जसे कि कमी शिकलेले, किंवा ज्यांची पहिली किंवा दुसरी पिढी १० वी, १२ वी , १५ वी किंवा उच्च शिक्षण पूर्ण नाही करू शकले अश्यांना टार्गेट केले जाते.


आयोगाला जेव्हा काही वृत्तपत्रातील बातम्या अश्या दिसून आल्या कि ज्यामध्ये पालक सांगत होते कि मुलांच्या उज्वल भविष्याचे आमिष दाखवून त्यांचे कोर्स विकत घेण्यात भाग पाडत होते, काही पालकांनी आर्थिक शोषणाची तक्रार केली तर काहींना फसवण्यात आले आणि ह्याप्रकारे पालकांची कठीण परिश्रमाने मिळवलेले, बचतीचे पैसे देखील कोर्स क्लास च्या नावाखाली उकळण्यात आले. ह्यामध्ये असे आढळून आले कि फी परत करण्याचे सांगून पालकांना फी परत केली जात नव्हती.


शिक्षण चांगले आहे कि वाईट हा भाग आणि वाद वेगळा झाला, मी तर आपली इंग्रजांनी दिलेली शिक्षण व्यवस्था मानतच नाही, गुरुकुल पद्धत जिथे प्रात्यक्षिक देखील करून घेतले जायचे आणि त्यासोबत आधुनिक वैज्ञानिक पद्धत जिथे सर्वांगीण विकासाभर भर देण्यात येईल अश्या शिक्षण पद्धती आवडतात. पण इथ मुद्दा येतो तो पालक आपल्या मुलांवर टाकत असलेल्या दबावाचा आणि 


ह्या अगोदर सुद्धा Byju संस्थेचा मालक रविंद्रन ह्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग संस्थेने हजर राहण्याची नोटीस बजावली होती. आणि Byju चा मालक रविंद्रन ह्याचे अनेक प्रोस्ताहित करणारे व्हिडीओ नेट वर उपलब्ध आहेत. त्याची महती सांगत आहेत ते सर्व पेड मार्केटिंग आहे असे समजा.


६० पैकी पहिल्या ५ मध्ये काही मुले सतत वर्गात पहिली येतील उच्च शिक्षण पर्यंत पहिली येतील मग बाकींच्या मुलांचे काय? त्यामुळे अश्या जंजाळात अडकू नका, ह्या जगात संस्कार आणि अनुभवापेक्षा दुसरे शिक्षण कुठलेही नाही, बाकी निर्णय तुमचा.


धन्यवाद

अश्विनीकुमार

 

“आपण आरामात स्थानिक लघु उद्योग व्यवसाय वाचवू शकता ते देखील विना बँकेची मदत घेता. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ १३ कोटी पकडू, जरी एक एक रुपया काढला तरी एखाद्या स्थानिक उद्योजक व्यवसायिकाला आपण कर्जातून बाहेर काढू शकतो, नवीन लघु उद्योजक व्यवसायिक निर्माण करू शकतो, शेतकऱ्यांची आत्महत्या पूर्णपणे थांबवू शकतो. हे स्थानिक पातळीवर जरी सुरु केले तरी आपण मदत योग्य आणि गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो जेणेकरून आपल्या पैश्यांचा कोणीही गैरवापर करू शकणार नाही. मी फक्त १ रुपया बोललो पण असे नेक आहेत जे १० ते जास्तीत जास्त आपण १००० रुपये मर्यादा जरी ठरवली तरी अनेक लघू उद्योजक व्यवसायिक आपला उद्योग व्यवसाय हा वाचवून परत भरारी घेवून आपले पैसे परत ते परत करतील.”


अश्विनीकुमार


 दाक्षिणात्य खाद्य पदार्थ हे जगभरात प्रसिद्ध आहेत तर त्या पाठोपाठ पंजाबी खाद्य पदार्थ, हे असे का? कारण ते भाषा आणि त्यांची खाद्य संस्कृती जपून आहे सोबत त्यांचे बाहेरगावी कामे करण्याचे प्रमाण देखील जास्त आहेत त्यामुळे ते प्रसिद्ध आहेत पण जेव्हा मराठी हाच मार्ग अवलंबतील तेव्हा आपले खाद्य पदार्थ, मराठी संस्कृती हि आपोआप प्रसिद्ध होते जाईल, आता जो न्यूनगंड भरवला होता तो आता खूप प्रमाणात कमी झाला आहे. जगाच्या पाठीवर बिनधास्त मराठी बोला समोरचा तुमची भाषा तर शिकेलच सोबत आपली संस्कृती देखील त्याच्या पर्यंत पोहचेल.


 “काही व्यवसाय करतांना त्या त्या व्यवसायाकरिता लागणारी जागा खूप महत्वाची आहे इथे कधीही पैसे वाचवण्यासाठी तडजोड करू नका आणि जरी मोक्याची जागा नाही भेटली तर त्या आसपास तुमच्या आर्थिक स्थिती नुसार जागा निवडा व बाकी पैसा हा जाहिरात करण्यासाठी वापरा ह्याला दुसरा पर्याय नाही पण ह्या अगोदर तुम्ही तयार असले पाहिजे म्हणजे त्या क्षेत्रातील अनुभव तुम्हाला पाहिजे, व्यवसायिक गुण तुमच्यात पाहिजे जे अनुभवानेच येतील.”


अश्विनीकुमार


 “कुठलाही उद्योग व्यवसाय हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नाही तर कमीत कमी ३ प्रयत्न तरी करावे लागतात हे अनेक यशस्वी लोकांच्या अनुभवावरून सांगत आहे. त्यामध्ये असे देखील उद्योजक व्यवसायिक भेटले जे पहिल्या प्रयत्नात यशस्वी आहेत पण अश्यांची संख्या खूप कमी आहे म्हणजे अपवाद त्यामुळे जेव्हा देखील उद्योग व्यवसाय सुरु करायचा विचार करत असाल तर हा अलिखित नियम लक्ष्यात ठेवा आणि जर तुमची मानसिकता नसेल आणि आर्थिक स्थिती नसेल तर सहसा उद्योग व्यवसाय करण्याच्या भानगडीत पडू नका. प्रोस्ताहन देणारे व्हिडीओ बनवणे सोपे आहे पण वास्तव खूप वेगळे आहे म्हणून अनुभवला महत्व आहे.”


अश्विनीकुमार

 

“उत्पादन करणे आणि विक्री करणे हे दोन्ही उद्योग व्यवसाय वेगवेगळे आहेत. जर उत्पादन क्षमता वाढवण्यावर जोर दिला असता तर महाराष्ट्र व मराठी समाज हा प्रचंड श्रीमंत झाला असता पण झाले उलटे, सर्व महत्व हे विक्री करणाऱ्यांवर देण्यात आले आणि त्यामुळे माल हा चीन वरून मागवण्यात येतो. एकप्रकारे बोलू शकतात कि दलाल श्रीमंत पण उद्योजक आणि ग्राहक त्रस्त फायदा हा चीन ला कारण विक्री करणारा हा स्वस्तात माल शोधणारच, त्यांचा व्यवसाय तर उत्तम सुरु आहे. जे भारतीय नागरिक उष्ट्या सफरचंदाचे लाखो रुपये देतात ते भारतीय उत्पादनाचे लाखो रुपये नाही देणार? बाजारात तरी उतरवा.”


अश्विनीकुमार


 “फेसबुक मध्ये असे खूप जास्त लेख आहेत जे भारतीय उद्योजक व्यवसायिक आहेत आणि जे करोडपती झाले पण असे लेख नाही जिथे करोडोंच्या खाली म्हणजे लाखो किंवा हजारो मध्ये उलाढाल करता व अनेक नोकऱ्या उपलब्ध करून देतात. तुम्ही फेसबुक च्या बाहेर आपले स्थानिक जग बघा किंवा तुम्ही जिथे जिथे कुठल्याही संदर्भात फिरायला जातात तेथील स्थानिक उद्योजक व्यवसायिक बघून त्यांना प्रसिद्ध करा ना कि एखाद दुसरा करोडपती होतो त्यांचे लेख फोरवर्ड करा. आपण आपल्याला मदत करणार आहोत ना कि कोणीतरी करोडपती त्याच्या बंगल्यातून येवून आपल्याला मदत करेन.”

अश्विनीकुमार


 “लोका चायवाला वडापाव वाला रिक्षावाला वगैरे बोलून कमी पण दाखवायचा प्रयत्न करतात पण जिथे एमबीए चायवाला, इंजिनिअर चायवाला असे शब्द दिसले कि त्याला डोक्यावर घेतात व त्याचे गुण गान करतात. म्हणजे एका ठिकाणी तुच्छता आणि दुसरीकडे आदर दाखवतात हि शोकांतिका आहे. ह्याच एमबीए आणि इंजिनिअर च्या कॉलेज मध्ये कमी शिकलेल्या लोकांना धडे द्यायला बोलावता ते देखील कधी जेव्हा ते करोडपती होतात तेव्हा नाहीतर नाही. शाळा कॉलेज च्या शिक्षणात यशस्वी होण्यापेक्षा आयुष्याच्या शाळेत यशस्वी व्हा इथे पदवी बघून यश दिले जात नाही तर तुमची मानसिकता आणि मेहनत बघून दिले जाते.”


अश्विनीकुमार


 “माझ्या मित्राने त्याच्या दुकानावर बोर्ड लावला तो मित्र परप्रांतीय आहे हे मी अगोदरच तुम्हाला सांगत आहे. जेव्हा बोर्ड बघितला तेव्हा आठवले कि ह्या अगोदर दुकानाला बोर्ड होता तेव्हा आम्ही दुकानदाराच्या मालकाच्या नावाने त्या ठिकाणी जायची ना कि बोर्ड बघून, अशीच विक्रोळी मधील नावे आठवून मग शेवटी चितळे हे नाव आठवले, चितळे ह्यांनी काही इतर कुठलेही नाव ठेवले नाही तर स्वतःचे आडनाव ठेवले आणि आज ते जग प्रसिद्ध आहेत. चितळेची भाकरवडी, चितळेचे दही आम्ही मुंबई उपनगर मध्ये आवर्जून मागतो, गोकुळ अजून उपलब्ध का नाही ते माहिती नाही. हे सर्व ब्रांडचे थोतांड हे विदेशातून आले आहेत त्यामुळे त्यांच्या नादी लागून ब्रांड बनवण्याकडे लक्ष देवू नका, सतत कर्म करा तुमचे नाव किंवा आडनावाचा ब्रांड बनून जाईल, विनाकार उष्टा खाल्लेल्या सफरचंद च्या नादी लागू नका. ज्ञान जागतिक ठेवा पण स्थानिक उत्पादन सेवा हि उत्कृष्ट ठेवा.”


अश्विनीकुमार


“एखाद्या कमी शिकलेल्या किंवा कुठल्याही सामान्य शाखेतून पदवी घेतलेल्या तरुणाने छोटा व्यवसाय सुरु केला तर त्याची दखल कोणीही घेत नाही पण त्याविरुध्द डॉक्टर, इंजिनिअर, एमबीए पीएचडी धारकाने कुठल्याही लघु व्यवसायात उडी घेतली तर सर्व त्यांची मुलाखत घेत बसतात हे आपल्या इथले दुर्दैव आहे. नेहमी पदवी बघून नाही तर त्यांच्या सातत्याचा, उत्पादन किंवा सेवेचा दर्जा बघा आणि मगच महत्व द्या. आपल्या इथे लाखो उच्च शिक्षित लोकांचे त्यांच्यापाडून पैसे घेवून पदवीधरांची निर्मिती होते एखाद्या कारखान्यासारखे त्यामुळे किती व्हिडीओ बनवणार त्यांचे? शेवटी वीट येईल. आपण चहा घेतांना विचारत नाही कि तुझी पदवी काय आहे? चहा घेतो आवडला तर स्तुती करतो आणि नाही आवडला तर नावे ठेवतो पण महत्वाचे हे आहे कि ती व्यक्ती सातत्याने व्यवसाय करते कि नाही? मेहनत करणारे आणि कष्टकरी ह्यांना सर्वच अन्न गोड लागते, सध्या पोट भरते ना? उद्या कोणीतरी चांगले खाद्य पदार्थ बनवणारा तयार झाला कि त्याच्याकडे जातील पण तोपर्यंत तरी ते उपाशी झोपत नाही ना? महत्वाचे काय आहे ते लक्ष्यात ठेवा आणि उद्योग व्यवसायात उतरा, अनुभव घेत घेतच तुम्ही यशस्वी व्हाल.”


अश्विनीकुमार