मी राहतो विक्रोळी ला, तिथे एसबीआय मध्ये एक अधिकारी आली. जेव्हा माझे काम होते तेव्हा देखील गर्दी कमी दिसली होती पण थोडी अव्यवस्थितच होती. काल मित्र एसबीआय शाखेत त्याचे काम करायला गेला व अर्ध्या तासात काम करून बाहेर आला. त्याच्या सोबत मित्र गेले होते पण जेव्हा अधिकारी येवून बाहेर सर्वांना काय काम आहे हे विचारत होते तेव्हा ते स्वतः बाहेर निघून गेले, त्या अधिकारीने बाहेर काढले नाही. ग्राहकांनी व त्यांच्यासोबत आलेल्या लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
मेनेजर हि केबिन मध्ये फक्त बसून नव्हती तर तर बाहेर येवून देखील काम करत होती. ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस करत होती, टोकन घेतले कि नाही, काय काम आहे हे सर्व विचार होती. एका सरकारी बँकेत खाजगी बेंकेच्या वेगाने काम होते हे दाखवून दिले. ह्यासाठी खाजगीकरण ची नाही तर योग्य लोकांना संधी देण्याची गरज आहे. जात धर्म प्रांत ह्यापलीकडे चांगले अधिकारी आहेत जे कामाने बदल घडवून आणून देतात.
माझे आई वडील सरकारी नोकरी करत होते म्हणून मी काही बाजू घेत नाही आणि खाजगीकरण करून जे दरवाढ करण्यात आली, सेवा सुमार दर्ज्याची देण्यात आली, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे शोषण बघितले, कामगार कायद्याचे उल्लघन बघितले म्हणून त्याचा विरोध करत आहे. कामगार कायदे पाळा, जसे अगोदर कामगार नेत्यांचे वापर करून कंपन्या बंद पडल्या गेल्या अश्या सामान्य लोकांना मूर्ख बनवण्याचे काम करू नका मग बघा सरकारी आणि खाजगी कंपन्या कसे काम करतात ते.
जे एक मेनेजर हा बदल घडवून आणू शकते मग तिच्या सारख्या क्षमता असलेल्यांचे शोध घेण्याचे काम त्या संबंधित खात्याचे आहे. कोणीही कितीही सरकारी अधिकाऱ्यांवर नोकरदारांवर चिखलफेक केली तरी त्यामधून चांगले काम करणारे अधिकारी आणि नोकरदार हे त्यांची चांगली कामे सुरूच ठेवतील.
पण ह्याला पर्याय निवडला गेला तो खाजगीकरणाचा, आणि इथेच श्रीमंत आणि गरिबांची दरी वाढत गेली. लोक इतिहास जाती धर्म आणि राजकारणाचे विषय लक्ष्यात ठेवतात पण कधी त्यांच्या जवळ सरकारी खात्यात असलेल्या चांगल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नावे लक्षात ठेवतात का? इतकेच जर सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वाईट असेल तर मग राजकारणी जे शासन व्यवस्था चालवतात ते कसे काय चांगले? त्यांना कोणी कामावरू का नाही काढून टाकत किंवा त्याचे खाजगीकरण का नाही करत?
हा मंत्री योग्य नाही तर हि कामे देखील खाजगी कंपन्यांना दिली पाहिजे, मग खाजगी कंपनी एक एका खात्याचा कारभार चालवत जाईल. पण असे होणार नाही, मंत्री आहे तिथे राहतील बदलतील ते सरकारी कर्मचारी आणि अधिकारी, बंद होतील त्या सरकारी कंपन्या किंवा खाजगी कंपन्यांना चालवायला देतील.
अनेक वर्षांपासून फक्त महाराष्ट्रात कौशल्य काढले तर अमेरिका आणि चीन ला मागे टाकतील इतके कौशल्य मराठी तरुणांमध्ये आहेत, मला दिसते पण त्यांची जिथे गरज आहे तिथे त्यांना संधीच दिली जात नाही. इतक्या सरकारी जागा कमी केल्या कि अनेकांच्या नोकरीच्या संधीच काढून घेतल्या आणि दिल्या त्या कंत्राटी नोकरी, आज ६ महिने असेल तर पुढील ६ महिने असेल. ते देखील २५००० पगारावर सही करून रोकड मध्ये ७, ८ हजार पगार हातात दिला जातो.
सरकारी खाते देखील खाजगी कंपन्याच्या पेक्षा चांगल्या चालवल्या जावू शकतात हे अनेकदा सरकारी अधिकारी आणि कर्मचार्यांनी सिध्द करून दाखवले आहेत पण हे लोकांना दिसणारच नाही, लोकांना काय दिसणार ते इतिहास, जात धर्म, राजकारण क्रिकेट आणि सिनेमा.
मला तर विश्वास होताच पण आता बघितले सुद्धा कि चमत्कार घडू व्ह्क्तो ते, मला माहिती नाही कि ती अधिकारु गेल्यावर काय होईल ते पण आता बोलू शकतो कि सरकारी बँका आणि कंपन्या सुद्धा खाजगी पेक्षा जास्त तोडीस तोड चालू शकतात. त्या मेजर चा मी आभारी आहे.
अश्विनीकुमार