आता एक बातमी वाचत होतो जिथे एका कपड्याच्या व्यापाऱ्याने आत्महत्या केली, ती बातमी भारतातील प्रसिद्ध ऑनलाईन वृत्तपत्रात आली आणि त्या वृत्त पत्राचे नाव आहे टाईम्स ऑफ इंडिया.
त्या व्यापाऱ्याचे वय ४७, गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबात त्याची बायको आणि दोन मुले आहेत. बायको जेव्हा मंदिरात गेली होती तेव्हा मोहनानी ह्यांनी आत्महत्या केली.
आताचा मुद्दा मुख्य आहे. तो समजून घ्या, आणि आत्महत्येची लेखाच्या शेवटी आत्महत्या रोखणाऱ्या संस्थांचे क्रमांक देवून मस्करी कशी केली जाते हे तुम्हाला समजून येईल.
व्यापाऱ्यावर कोरोना मुले आणि त्या कालावधी मध्ये ३० ४० लाखांचे कर्ज झाले होते, आता हे सामान्य व्यापारी, बँक काही उभे करणार नाही कारण अश्या व्यापाऱ्यांची संख्या खूप आहे. बोलणे सोपे असते पण जो परिस्थिती मधून जात असतो त्यालाच माहिती असते कि किती उठाठेव करावी लागते ते. मग कर्ज घेतले ते दुसऱ्या एका व्यापाऱ्याकडून, सतत पैसे परत देण्याचा तकादा पैसे उसने दिलेला व्यापारी हा लावतच असेल आणि काही केल्याने बाजारात उठाव नाही म्हणून पैसे देवू शकत नसेल आणि हे वास्तव आहे अनेक व्यापारी करोडोंची उलाढाल करायचे पण ह्या कोरोना कालावधी चा फटका असा पडला कि जास्तीत जास्त व्यापाऱ्यांचे उद्योग व्यवसाय बंद झाले, उरलेले कर्जात गेले, आणि काही उठावच नसल्यामुळे कितीही काहीही करून देखील त्यांचा उद्योग व्यवसाय हा नफ्यात नाही आणू शकले आणि ह्यांचाच व्यवसाय हा कोरोनाच्या आधी उत्तम सुरु होता. आयुष्य असे देखील पूर्ण बदलते, कोणीही काहीही करू शकत नाही. कौशल्य सर्व पण तरीही कोणीही काहीही करू शकत नाही, ह्यालाच आयुष्याची शिकवण म्हणतात.
चला ज्याने पैसे उसने दिले तो व्यापारी पैश्यांची मागणी करत असेल पण प्रकरण मोहनानी ह्यांची बदनामी करेपर्यंत गेले. ह्याची अजून पुष्टी नाही. मोहनानी ह्यांची बदनामी होईल असे व्हिडीओ हे सोशल मिडिया मध्ये पसरवण्यात आले. आता हे प्रकरण तर आत्महत्या करायला लावण्यासारखेच आहे. जे सरळ मार्गाने जगणारे आहेत जे भावनिक दृष्ट्या हळवे आहे तेच आत्महत्या करतात. कारण हा स्वभावाचा भाग झाला आहे आणि अश्या लोकांना वाचवण्यासाठीच कायदा आणि न्याय व्यवस्था बनवली आहे.
आता इथे समस्या काही आत्महत्या थांबवण्यासाठी बनवलेल्या समाजसेवी संघटनांची येत नाही कारण अश्यांना फोन करून देखील बघितले काहीही फायदा नाही, महाराष्ट्र महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग तर सरळ हात वरती करतात, काडीची मदत नाही, आत्महत्या करण्यास अप्रत्यक्ष प्रवृत्त करतात.
आता इथे मुख्य भूमिका येते ती पोलिसांची. तिथे तक्रार करण्यास गेल्यास कधी कधी असे वाटते कि अजून अपमान करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. ठरलेले वाक्य, आम्ही काय करू, तुम्हाला पैसे भरावे लागतील, आम्हाला हेच काम आहे काय?, आणि हेच शब्द खाजगी कर्मचार्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये वापरले तर त्यांना कामावरून सरळ काढून टाकतात पण पोलिसांना हा नियम लागू नाही त्यामुळे असे बोलू नका कि भारतात लोकशाही आहे म्हणून, हे साफ खोटे आहे. मोहनानी वर जावून विचारावे लागेल. सर्व खेळ कायद्याच्या पळवाटा आणि गैरवापर ह्यावर आहे. अश्या लाखो केसेस दाखवेल जिथे काही गुन्हा नसतांना पण जेल झाली आहे.
आता पुढे उपाय सांगतो.
वकिलाचा सहारा घ्या, जर कोणी लोन सेटलमेंट करून देणारा असेल तर त्याची मदत घ्या, ह्यामुळेच आत्महत्या थांबतील ना कि फक्त समुपदेशनाद्वारे. पैसे तर द्यायचेच आहे त्यासाठी योग्य ती पाउले उचला मग तुम्हाला फरक जाणवून येईल. सगळ्यात मोठी शोकांतिका हि आहे कि जाती धर्माचे ठेकेदार कमी येणार नाहीत. तुम्हाला योग्य व्यक्तींद्वारेच ह्या समस्यांवर मात करावी लागेल. जर कोणी समाजसेवी वकील असेल जो सुरुवातीला मोफत सल्ला देवू शकेल, मदत करू शकेल, लोन सेटलमेंट करून देणारी व्यक्ती असेल तर त्यांनी कृपया मला संपर्क करावा जेणेकरून आपण मिळून अनेकांचा जीव वाचवू शकतो व अनेक आत्महत्या टाळू शकतो. सुरुवातीला कदाचित पैसे मिळणार नाही पण जेव्हा कर्जदार आर्थिक सुस्थितीत येतील तेव्हा नक्की ते तुम्हाला तुमची फी देवू करतील, कृपया ती फी घ्यावी कारण तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही अजून लोकांना मदत करू शकता.
ज्या लोकांचा कर्ज वसूल करणारे मानसिक छळ करत असतील तर त्यांनी मला मेसेज करे, काही समाजसेवी वकील आहेत त्यांचे क्रमांक तुम्हाला देईल व तुम्ही ह्यामधून बाहेर पडाल. समस्या असतील तर त्यावर योग्य उपाय मिळाले किंवा झाले तरच आत्महत्या थांबतील नाहीतर नाही.
जवळील मानसोपचारतज्ज्ञ कडून तुम्ही समुपदेशन करू शकता, लवकरच त्यांना भेट दया कारण जितके तुम्ही अम्न्सिक दृष्ट्या शांत रहाल, जितक्या भावना व्यक्त होतील तितके तुम्ही समाधानाचे नव नवीन मार्ग काढाल. जर माझ्याकडून ऑनलाईन समुपदेशन पाहिजे असेल तर लिंक खाली देत आहे.
https://bit.ly/3Qmvxdl
धन्यवाद
अश्विनीकुमार