इंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे?



तुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो.

तुमचा विश्वास बसत नाही?

तुमचा विश्वास का नाही?

कारण तुमच्या ओळखीची व्यक्ती इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवत नसेल किंवा तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात इंस्टाग्राम सारखे सोशल नेटवर्किंग वेबसाईट चा वापर करत नसतील म्हणून.

मुंबई सारख्या शहरात हे सामान्य आहे. इथे फिल्म, मोडलिंग, इव्हेंट आणि ह्या सलग्न क्षेत्रात व्यवसायिक दिवसाला हजारो आणि लाखो रुपये कमवून जातात. ह्या लॉक डाऊन मध्ये देखील इंस्टाग्राम व्यवसायिकांची कमाई कमी झालेली नाही.

जे तुम्हाला इंस्टाग्राम वर फोटो दिसत आहेत ना ते काही एकाचे काम नाही, कदाचित एखाद दुसरी व्यक्ती एकटे सर्व कामे करू शकत असेल पण इथे टीम ची गरज लागते म्हणजे एक इंस्टाग्राम व्यवसायिक हा अनेकांना नोकरी आणि व्यवसायाच्या अर्धवेळ आणि पूर्णवेळ संधी उपलब्ध करून देतो.

फक्त ह्या इंस्टाग्राम चा वापर करून अनेक गरीब श्रीमंत झाले, ह्याच इंस्टाग्राम चा वापर करून अनेकांनी आपल्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीवर मात केली, ह्याच इंस्टाग्राम चा वापर करून अनेकांनी आपले कौशल्य जगासमोर मांडले आणि आज ते मोठ मोठ्या जगप्रसिद्ध नामांकित कंपनीमध्ये किंवा सोबत काम करत आहे.


सेलीब्रेटी इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग एप चा वापर करून एका पोस्ट मागे किती पैसे कमावतात?

विराट कोहली हा सेलिब्रेटी आहे तो एका प्रमोशनल पोस्ट मागे १,४०,००,००० (पूर्णांक संख्या) एक करोड आणि चाळीस लाख रुपये कमवतो.

प्रियांका चोप्रा प्रत्येक प्रमोशनल पोस्ट मागे १,३५,००,००० (पूर्णांक संख्या) एक करोड आणि पस्तीस लाख रुपये कमवते.

सर्वसामान्य यशस्वी व्यक्ती जी सेलिब्रेटी नाही आहे ती किती रुपये कमवू शकते?

जर तुमचे इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग एप वर ५,००,००० पाच लाख फॉलोअर्स आहे तर तुम्ही वर्षाला १.५ लाख म्हणजे दीड लाख ते प्रत्येक पोस्ट मागे ७ लाख रुपये कमवू शकतात.

तुम्हाला देखील इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवायचे आहे?

हो तुम्ही देखील इंस्टाग्राम चा वापर करून पैसे कमवू शकतात. ह्यासाठी काही महत्वाचे मुद्दे जे मी माझ्या कार्यशाळेत शिकवतो ते निशुल्क तुम्हाला शिकवत आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता.

१) आर्थिक मानसिकता / साक्षरता : तुम्ही स्वतःला खाली दिलेले प्रश्न विचारा.

अ) तुमची आर्थिक मानसिकता कशी आहे?
ब) तुम्ही आर्थिक दृष्ट्या साक्षर आहात कि नाही?
क) तुम्ही मुक्त विचारांचे आहात कि नाही?
ड) तुमचा तुमच्या भावनांवर ताबा आहे कि नाही?
इ) तुम्ही धाडसी आहात कि नाही?
फ) तुम्ही अपयश किती दिवसात पचवता?
क) नैतिक अनैतिक च्या चक्रात तुम्ही अडकला आहात का?

वरील प्रश्नांची सकारात्मक उत्तरे असतील तर तुम्ही इंस्टाग्राम ह्या सोशल नेटवर्किंग साईटवर आपला व्यवसाय सुरु करू शकता, जर उत्तरे नकारात्मक असतील तर तुम्ही व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न बघू नका तर तुम्ही नोकरी करू शकता.

२) फोटो काढण्याचे कौशल्य :

अ) मॉडेल किंवा व्यक्तीचे फोटो : ह्यामध्ये मॉडेल महत्वाचे आहे पण त्यासोबत फोटो काढताना लागणारे कौशल्य जास्त महत्वाचे आहे. लहान मुल ते ज्येष्ठ नागरिक ह्यापैकी कोणीही मॉडेल असू शकते. जास्त मागणी युवक आणि तरुणांना आहे.

ह्यामध्ये देखील भाग येतात. फक्त चेहऱ्याचे फोटो, पूर्ण शरीराचे फोटो, हात पाय किंवा विशिष्ट अवयवांचे फोटो म्हणजे जशी उत्पादने तशी फोटो. जिथे फक्त चेहऱ्याची गरज असते तिथे चेहरा आकर्षक असला पाहिजे, जिथे केसांची गरज असते तिथे केस चागली असली पाहिजे. म्हणजे जशी उत्पादने त्यानुसार तुमचे अवयव चांगले असले पाहिजे.

ब) वस्तू किंवा उत्पादनाचे फोटो : इथे कुठलेही उत्पादन असू शकते ते तुम्हाला प्रमोट करायचे आहे पण ह्यासाठी तुमच्या अकाऊंट ला तितके फॉलोअर्स पाहिजे त्यासाठी २ अ हा मुद्दा खूप महत्वाचा आहे.

३) फोटो एडिटिंग : ह्यासाठी तुम्हाला महत्वाचे म्हणजे उत्तम उत्पादने घेणे गरजेचे आहे. जर उत्पादने विकत घेवू शकत नसाल तर उधारीने घ्या, भाड्याने घ्या, थोडे कमी दर्ज्याचे घ्या पण प्रयत्न सोडू नका. जर वरील १ आणि २ गुण तुमच्यात असतील, कौशल्य असेल तर तुम्ही एकटे काम करू शकता पण जर नसतील तर तुम्हाला टीम ची गरज आहे.

४) इंस्टाग्राम व्यवसायिकांना तुम्ही सेवा किंवा उत्पादने पुरवू शकता. हा सतत चालणारा व्यवसाय आहे.

५) इथे व्यवसायिक मानसिकता ठेवली पाहिजे. कामाशी काम ठेवले पाहिजे.

६) तुमच्या कल्पनाशक्तीला वाव भेटत राहील अश्या लोकांसोबत रहावे लागेल.

७) सतत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रहावे लागेल.

८) आर्थिक व्यवहार करतांना तज्ञांचे मार्गदर्शन गरजेचेच आहे, एक किंवा अनेक तज्ञांकडून मार्गदर्शन तुम्ही घेवू शकता.

जी मुल १८ वर्ष झाली नसतात त्यांचे मेनेजर हे त्यांचे पालक असतात तेव्हा पालकांची जबादारी हि मोठी असते. लहान बाळ पासून ते १०, १३, १५, १८ वर्षांपर्यंत तुम्हाला सतत संधी शोधत रहावी लागते, एक दीर्घकालीन संपर्क शोधावा लागतो जिथून तुम्हाला सतत काम भेटत जाईल, जस जसे तुमच्या मुलांचे वय वाढत जाईल तस तसे त्यांच्या कामाची पद्धत बदलली जाईल व त्यानुसार तुम्हाला बदलावे लागेल.

एकदम सोपे आहे, पहिला स्वतःवर विश्वास तरी ठेवा. 

का तुम्ही पैसे कमवू शकत नाही? 

का तुम्ही प्रसिद्ध होऊ शकत नाही? 

तुम्हाला कोनी अडवलय?

जर प्रयत्न करून यश भेटत नसेल तर माझा ऑनलाईन कोर्स उपलब्ध आहे त्याचा तुम्ही लाभ घेवू शकता.

"संधी वर्तमानकाळात उपलब्ध असते, जर ह्या क्षणी निर्णय नाही घेतला तर ती संधी दुसरा घेऊन जाईल."

धन्यवाद
अश्विनीकुमार