आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?
वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्या दोन्ही मार्गांनी तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता.
अनेकदा इंटरनेट वर मी बघतो कि विज्ञान आणि अध्यात्म ह्या मध्ये सतत वाद सुरु असतो आणि त देखील कमेंट मध्ये, पण ह्याचे मोठे नुकसान हे जी व्यक्ती समस्येने ग्रस्त आहे त्या व्यक्तीवर होतो.
मी नेहमी सांगतो कि तुमचा ज्या वर विश्वास आहे तो मार्ग निवडा आणि तीच मार्ग तुम्हाला तुमची समस्या दूर करून देईल. जर वैज्ञानिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर वैज्ञानिक मार्ग निवडा आणि जर अध्यात्मिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर अध्यात्मिक मार्ग निवडा.
ना विज्ञान परिपूर्ण आहे आणि नाही अध्यात्म, उत्तर हे तुम्हाला तुमच्या अनुभवातच सापडेल आणि तेच अंतिम सत्य आहे. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे विज्ञानाने सांगितले कि व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही तिथे त्या व्यक्तीला पूर्ण बरे अध्यात्माने केले आणि जिथे अध्यात्माने सांगितले कि व्यक्ती बरी होऊ शकत नाही तिथे बरे विज्ञानाने केले.
ह्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या भांडणात निसर्गाला आणि ब्रम्हांडाला विसरू नका. कारण शेवटी हेच शक्तिशाली आहेत आणि बाकी अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोघांवर अवलंबून आहे.
विज्ञानाने जसे फेल झालेली किडनी बसवण्याचा देखील शोध लावला तिथे किडनी चोरण्याचा देखील शोध लागला. अध्यात्मात समस्या दूर देखील केल्या जातात तर दुसरीकडे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या लुबाडले देखील जाते. तुम्हाला तुमची सद्विवेकबुद्धी वापरायची आहे.
जिथे झोपेच्या पक्षाघाताला मानसिक आजार संबोधतात तिथे दुसरीकडे दुष्ट शक्तींनी केलेला आघात देखील संबोधतात. ज्यामध्ये मुळ कारण आहे त्या मार्गानेच उपचार होईल, बाकी वाद विवाद हे अजून समस्या वाढवत जातील. कारण एकदा का व्यक्तीचा दोन्ही मार्गावरील विश्वास उडाला कि तो काही बरा होत नाही.
घरात कोणीतरी आहे, शरीरावर कोणतरी बसलेले आहे, बोलू शकत नाही, कुणाला आवाज जात नाही आणि खरच हे झोपेत होते कि ते जागे असतात हा देखील समजत नाही इतके वास्तव अनुभव असतात ते म्हणजे विचार करा ती व्यक्ती कुठल्या परिस्थिती मधून जात असते ते.
शरीर जे अनुभवणार तेच वास्तव. मग शरीराने स्वप्नातील हृदय विकाराचा झटका अनुभवला कि ते वास्तव, जेव्हा घरचे सकाळी उठवायला जातात तेव्हा ती व्यक्ती मृत झालेली असते, पण त्याच वेळेस योग्य उपचार मिळाले असते तर प्राण वाचवता आले असते. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळतील.
जे धडधाकट होते त्यांना मधुमेह कसा झाला? जे ठणठणीत होते त्यांना कर्करोग कसा झाला? जेवण थोडे असून सुद्धा शरीराची जाडी वाढत का आहे? जास्त जेवूनसुद्धा शरीर बारीक का आहे?
९८ % आपण अंतर्मनात जे आहे त्यानुसार आयुष्य जगत असतो आणि ते आपल्याला समजून देखील येत नाही. आपल्या अंतर्मनात सर्वकाही दडलेले आहे.
तुम्हाला श्रीमंत बनायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.
तुम्हाला आजारपण दूर करायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.
तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे?
अंतर्मनावर काम करा.
तुम्हाला नोकरी मिळवायची आहे?
अंतर्मनावर काम करा.
तुम्हाला प्रेमासाठी, लग्नासाठी जोडीदार आकर्षित करायचा आहे?
अंतर्मनावर काम करा.
कुठल्याही शास्त्रापेक्षा स्वतःला शक्तिशाली समजा आणि मगच उपचाराला लागा. १०० % खात्री देवून सांगतो कि तुम्ही जो काही मार्ग निवडाल त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.
जिथे मी आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, वास्तू शास्त्र, उर्जा शास्त्र आणि इतर मार्गांनी लोकांच्या समस्येवर यशस्वी यशस्वी उपचार केले तिथे दुसरीकडे अध्यात्म तंत्र साधनेचा वापर करून देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि ह्या दोन्ही विद्यांचे मूळ हे आपल्या पौराणिक शास्त्रात किंवा ज्ञानात आढळून येईल.
तुमच्याकडे एक समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे, ती समस्या दूर करण्याचे हजारो नाही तर लाखो मार्ग आहेत.
#अश्विनीकुमार
0 आपले विचार