विवाहबाह्य संबंध सुरवात, प्रकार आणि तीव्रता



विवाहबाह्य संबंध ह्याकडे आपण एकाच नजरेने बघू शकत नाही. ह्यामध्ये विविधता असते, त्यानुसार आपल्याला त्याच्याकडे बघितले पाहिजे जेणेकरून भविष्यात होणारे कौटुंबिक वादविवाद आणि गुन्हे हे थांबवता येतील.

अ) विवाहाअगोदर असलेले संबंध :
१) नातेसंबंधातील चुलत, मावस, दूरचे भाऊ बहिण ह्यांच्यामध्ये असलेले संबंध किंवा समवयानुसार नात्यातील जुळलेले संबंध
२) ओळखीच्या पैकी असलेले संबंध, विविध कारणाने बघण्यात असलेली व्यक्ती, परिसरात राहणारी, किंवा नातेवाईक सोडून ओळखीचे असलेले.
३) अनोळखी नात्यातून तयार झालेले संबंध
४) ऑनलाईन तयार झालेले संबंध

हे संबंध विविध कारणांनी जुळतात. काही फक्त एकच कारण नसते. प्रत्येकाचे कारण हे वेगवेगळे असते. एकदा का मुल कारण भेटले कि आपण योग्य उपाय किंवा निर्णय घेवू शकतो. इथे समजूतदारपणा लागतो.

विविध कारणांनी जेव्हा प्रेम करणाऱ्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाह होतो तेव्हा ह्या संबंधांचे काय होते?

१) संबंध कायमस्वरूपी विसरले जातात.
२) संबंध लक्ष्यात असतात पण भावना जुळलेल्या नसतात.
३) संबंध लक्ष्यात देखील असतात व भावना देखील जुळलेल्या असतात.
४) संबंध मैत्रीचे ठेवतात.
५) संबंध थोडे पुढचे ठेवलेले असतात.
६) जुने जसे चालू होते तसेच संबंध सुरु ठेवले जातात.
७) लग्नाचा जोडीदार नाकारून पहिल्या जोडीदाराला पसंदी दिली जाते.
८) दोन्ही बाजूने किंवा एका बाजूने हिंसा केली जाते.

लग्नानंतर जुळलेले संबंध

लग्नानंतर विविध कारणांनी संबंध जुळले जातात त्याची कारणे हि वेगळी असतात.

१) भावनिक करणे.
२) शारीरिक कारणे
३) कौटुंबिक कारणे.
४) लैंगिक कारणे.
५) आर्थिक कारणे
६) मुलभूत कारणे
७) समलिंगी जोडीदार.

जो नवीन कायदा बनवला आहे ज्यामध्ये त्वरित कारवाई चे आदेश दिले आहे त्याचा वापर करून कायदेशीर खंडणी वसूल केली जाते.

अनेकदा जोडीदाराकडून विवाहबाह्य संबंध ठेवायला परवानगी दिली जाते त्याची कारणे वेगळी आहे.

विवाहबाह्य संबंधाला वयाची अट नाही. तरून ते म्हातारपणाचे विवाहबाह्य संबंध असतात त्यामुळे तुम्ही वयाकडे बघून काहीही बोलू शकत नाहीत.

काही विवाहबाह्य संबंध हे पकडले जातात तर काही पकडले जात नाहीत. काही जोडीदार कानाडोळा करतात तर काही तीव्र आक्षेप घेतात. इथे देखील त्यांचे स्वतः चे काही निर्णय जे परिस्थिती नुसार घेतलेले असतात.

अनेकदा जोडीदार मुलांच्या भविष्याकडे बघून दुर्लक्ष्य करतात. समाजाचा दबाव हा देखील एक भाग आहे जिथे अब्रू जावू नये म्हणून घरातील गोष्ट हि घरातच ठेवली जाते.

जर तुम्हाला समस्याचे समाधान पाहिजे तर तुम्ही सर्वांना एकच नियम लावू शकत नाही. घटस्फोट घेणे, दुसरे घर घेवून राहणे, आर्थिक जबाबदारी, भावनिक आणि लैंगिक गरजा ह्या देखील बघणे महत्वाचे आहे.

स्त्री असू दे किंवा पुरुष ह्या दोघांना देखील दोष दिला जातो. घटस्फोटीत स्त्रिया ह्यांच्याकडे संधी म्हणून बघितली जाते आणि पुरुषांचे दोष काढले जातात त्यामुळे ह्या दोघांचे जगणे हे मुश्कील होवून जाते.

चीड एकाच गोष्टीची येते जेव्हा जोडीदाराची हत्या, मुलांची हत्या केली जाते तेव्हा, हत्या करण्यापेक्षा वेगळे झालेले बरे. हत्या म्हणजे हि लोक मनुष्य प्राण्यात राहण्याच्या लायकीची नाही आहे.

समस्या आहे तिथे समाधान पण आहे. जे योग्य समाधान आहे तेच निवडा. भावनांना तुम्ही जखडून ठेवू शकत नाही. भावना ह्या एका क्षणात देखील बदलतात. हे मी अनुभवले देखील आहे आणि बघितले देखील आहे.

योग्य समुपदेशन आणि मार्गदर्शन तुम्हाला ह्या सर्व परिस्थिती मधून बाहेर काढू शकते. कृपया घरगुती उपाय करून परिस्थिती अजून चिघळवू नका नाहीतर नंतर परिणाम अजून वाईट होत जातील.

#अश्विनीकुमार

#बालक #पालक #कुटुंब आणि #नातेसंबंध

#वैवाहिकजीवन #मुलांचेसंगोपन #गर्भसंस्कार #शिक्षण #आर्थिकआयुष्य #लैंगिकआयुष्य #विवाहबाह्यसंबंध #पती #पत्नी #तणाव #नैराश्य #भांडणे #कौटुंबिकसमस्या #पुरुषअधिकार #मानसिकशोषण #शारीरिकशोषण #लैंगिकशोषण

appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : Balak Palak Children Parents

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah

आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?


आपल्या समस्या दूर करण्यासाठी वैज्ञानिक किंवा अध्यात्मिक पैकी कुठल्या मार्गाचा अवलंब करावा किंवा निवडावा?

वैज्ञानिक आणि अध्यात्मिक अश्या दोन्ही मार्गांनी तुम्ही तुमच्या समस्या दूर करू शकता.

अनेकदा इंटरनेट वर मी बघतो कि विज्ञान आणि अध्यात्म ह्या मध्ये सतत वाद सुरु असतो आणि त देखील कमेंट मध्ये, पण ह्याचे मोठे नुकसान हे जी व्यक्ती समस्येने ग्रस्त आहे त्या व्यक्तीवर होतो.

मी नेहमी सांगतो कि तुमचा ज्या वर विश्वास आहे तो मार्ग निवडा आणि तीच मार्ग तुम्हाला तुमची समस्या दूर करून देईल. जर वैज्ञानिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर वैज्ञानिक मार्ग निवडा आणि जर अध्यात्मिक मार्गाने तुमची समस्या दूर होऊ शकते तर अध्यात्मिक मार्ग निवडा.

ना विज्ञान परिपूर्ण आहे आणि नाही अध्यात्म, उत्तर हे तुम्हाला तुमच्या अनुभवातच सापडेल आणि तेच अंतिम सत्य आहे. माझ्याकडे अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे विज्ञानाने सांगितले कि व्यक्ती कधीच बरी होऊ शकत नाही तिथे त्या व्यक्तीला पूर्ण बरे अध्यात्माने केले आणि जिथे अध्यात्माने सांगितले कि व्यक्ती बरी होऊ शकत नाही तिथे बरे विज्ञानाने केले.

ह्या अध्यात्म आणि विज्ञानाच्या भांडणात निसर्गाला आणि ब्रम्हांडाला विसरू नका. कारण शेवटी हेच शक्तिशाली आहेत आणि बाकी अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोघांवर अवलंबून आहे.

विज्ञानाने जसे फेल झालेली किडनी बसवण्याचा देखील शोध लावला तिथे किडनी चोरण्याचा देखील शोध लागला. अध्यात्मात समस्या दूर देखील केल्या जातात तर दुसरीकडे लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या लुबाडले देखील जाते. तुम्हाला तुमची सद्विवेकबुद्धी वापरायची आहे.

जिथे झोपेच्या पक्षाघाताला मानसिक आजार संबोधतात तिथे दुसरीकडे दुष्ट शक्तींनी केलेला आघात देखील संबोधतात. ज्यामध्ये मुळ कारण आहे त्या मार्गानेच उपचार होईल, बाकी वाद विवाद हे अजून समस्या वाढवत जातील. कारण एकदा का व्यक्तीचा दोन्ही मार्गावरील विश्वास उडाला कि तो काही बरा होत नाही.

घरात कोणीतरी आहे, शरीरावर कोणतरी बसलेले आहे, बोलू शकत नाही, कुणाला आवाज जात नाही आणि खरच हे झोपेत होते कि ते जागे असतात हा देखील समजत नाही इतके वास्तव अनुभव असतात ते म्हणजे विचार करा ती व्यक्ती कुठल्या परिस्थिती मधून जात असते ते.

शरीर जे अनुभवणार तेच वास्तव. मग शरीराने स्वप्नातील हृदय विकाराचा झटका अनुभवला कि ते वास्तव, जेव्हा घरचे सकाळी उठवायला जातात तेव्हा ती व्यक्ती मृत झालेली असते, पण त्याच वेळेस योग्य उपचार मिळाले असते तर प्राण वाचवता आले असते. अशी अनेक उदाहरणे तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी हॉस्पिटल मध्ये मिळतील.

जे धडधाकट होते त्यांना मधुमेह कसा झाला? जे ठणठणीत होते त्यांना कर्करोग कसा झाला? जेवण थोडे असून सुद्धा शरीराची जाडी वाढत का आहे? जास्त जेवूनसुद्धा शरीर बारीक का आहे?

९८ % आपण अंतर्मनात जे आहे त्यानुसार आयुष्य जगत असतो आणि ते आपल्याला समजून देखील येत नाही. आपल्या अंतर्मनात सर्वकाही दडलेले आहे.

तुम्हाला श्रीमंत बनायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला आजारपण दूर करायचे आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला नोकरी मिळवायची आहे?
अंतर्मनावर काम करा.

तुम्हाला प्रेमासाठी, लग्नासाठी जोडीदार आकर्षित करायचा आहे?
अंतर्मनावर काम करा.

कुठल्याही शास्त्रापेक्षा स्वतःला शक्तिशाली समजा आणि मगच उपचाराला लागा. १०० % खात्री देवून सांगतो कि तुम्ही जो काही मार्ग निवडाल त्याने तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल.

जिथे मी आकर्षणाचा सिद्धांत, संमोहन, वास्तू शास्त्र, उर्जा शास्त्र आणि इतर मार्गांनी लोकांच्या समस्येवर यशस्वी यशस्वी उपचार केले तिथे दुसरीकडे अध्यात्म तंत्र साधनेचा वापर करून देखील यशस्वी उपचार केलेले आहेत. आणि ह्या दोन्ही विद्यांचे मूळ हे आपल्या पौराणिक शास्त्रात किंवा ज्ञानात आढळून येईल.

तुमच्याकडे एक समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे, ती समस्या दूर करण्याचे हजारो नाही तर लाखो मार्ग आहेत.

#अश्विनीकुमार

डिप्रेशन, मानसिक आजार घातक का आहेत?









जर शरीराला बाहेरून जखम झाली तर ती व्यक्तीला दिसून येते, ती व्यक्ती धावतपळत जावून उपचार करून घेते. जर आतमध्ये जखम झाली तर त्या व्यक्तीला अनेक समस्या निर्माण होतात, वेदना असह्य होतात मग डॉक्टर कडे जावून, एमआरआय, सिटी स्केन, एक्स रे काढून त्या आतील जखमेवर उपचार सुरु करून ती जखम बरी करतात.

जेव्हा व्यक्तीला मानसिक जखम होते तेव्हा ती जखम दिसून येत नाही, तिची तीव्रता समजून येत नाही. ती व्यक्ती बाहेरून हसत खेळत आयुष्य जगत असते पण जेव्हा एकट्यात असते तेव्हा आपल्या भावना रडून ओरडून किंवा स्वतःला त्रास देवून व्यक्त करते पण कुणाकडेही ती व्यक्त होत नाही.

मानसिक जखम जितकी खोल तितके तिचे परिणाम गंभीर. अश्या व्यक्ती स्वतःला गंभीर इजा, दुखापत करून घेवू शकतात पण त्या जखमा कपड्यांमध्ये झाकल्या जातात किंवा झाकून ठेवतात. सतत च्या नकारात्मक विचारांमुळे शारीरिक आजार बळावतात. त्या आजारांचे रुपांतर जीवघेण्या आजारात होते. उपचारांना प्रतिसाद देत नाही.

मानसिक आजार आहे हे केव्हा कळते जेव्हा ती व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करते, उपचारांना प्रतिसाद देत नाही तेव्हा. जीव वाचला तर ठीक नाहीतर परत त्या व्यक्तीला संधी भेटत नाही. फक्त कुटुंबातील सदस्यांना माहिती असते पण बाहेरच्या लोकांना सामान्य व्यक्ती दिसून येते.

मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो का?

हो मानसिक आजार कायमस्वरूपी बरे करू शकतो. फक्त मान्य केले पाहिजे कि मानसिक आजार आहे आणि पारंपारिक घरगुती उपचारपद्धती काम करत नसेल तर लगेच तज्ञांची मदत घ्या. जितका जुना आजार तितका तो बरा व्हायला वेळ लागतो पण तो पूर्णपणे बरा होतो.

#अश्विनीकुमार

#मानसशास्त्र आणि #आकर्षणाचा सिद्धांत

#आत्मविकास #आत्मविश्वास #प्रोस्ताहन #चमत्कार #संमोहन #हिलिंग #स्पर्शचीकीस्ता #अंतरमन #अलौकिक #अघोरी #कंपन #उर्जा #रेकी #वास्तू #आकर्षणाचासिद्धांत #मानसिकआजार #शारीरिकआजार #तणाव #नैराश्य #भीती #नकारात्मकविचार

कुठल्याही समस्येवर खात्रीशीर उपाय, मार्ग अध्यात्मिक, अलौकिक आणि वैज्ञानिक.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

appointment बुक करण्यासाठी 8080218797 ह्या क्रमांकावर व्हास्टएप मेसेज पाठवा.

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

फेसबुक : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1