अनेक पालक सध्या माझ्याकडे मुलांच्या शिक्षणासंदर्भात तक्रारी घेवून येतात. अनेक पालक हे आता परीक्षा जवळ आली म्हणून अगदी घाई मध्ये येत आहे. त्यांना त्यांच्या मुलांच्या नापसाची भीती सतावत आहे आणि ह्यामुळे घरातील वातावरण देखील तणावपूर्ण बनत आहे.
ह्यामुळे नवरा बायको, कुटुंबातील इतर सदस्य ह्यांच्यामध्ये भांडणे होत आहेत. म्हणजे वर्षातील आणि आयुष्यातील १० दिवसांच्या परीक्षेसाठी अनेक कटुता निर्माण होत आहे. आणी ह्या भांडणामुळे जोडीदारावर सर्व राग काढला जात आहे. अगदी लहान सहान चुका देखील मोठ्या करून सांगितल्या जात आहे.
शेवटी हाच ताण तणाव मानसिक आणि शारीरिक आजारात रुपांतरीत होतो. मग कुटुंबात सुखसमाधान आणि आरोग्याची जागा हि आजारपण ताण तणाव घेते.
फक्त एका परीक्षेसाठी आयुष्यात आणि कुटुंबात इतके तणाव आणण्यापेक्षा तज्ञांची मदत घेतलेली बरी. सर्वच उपाय आणि घरी करू शकत नाही आणि जर ह्या नकारात्मक भावना साठत गेल्या तर त्यामधून नकारात्मकताच बाहेर येईल. ह्यामुळे अनेक मुल यशस्वी देखील होतील पण ते फक्त बाह्य स्वरूपाने ना कि अंतर्मनाने. त्यांना सतत त्यांचे अंतर्मन, भावना आणि विचार हे आतल्या आत खात जातील.
इतके करण्यापेक्षा घरचे वातावरण हे आनंदी ठेवा. जास्त दबाव निर्माण करू नका. बंधने मर्यादेत आणा. जेव्हा देखील मुल अभ्यास करत असेल तर हळूच आपल्या जोडीदारासोबत बोला कि "मुलगा खूप हुशात आहे, आरामात पास होईल." हाच विचार तुमचा मुलगा पकडून ठेवेल व जरी मन लावून अभ्यास नाही केले तरी त्याच्या लक्ष्यात राहील कारण तुम्ही दाखवलेला विश्वास. विश्वास चमत्कार घडवतो.
त्याच्या नकळत त्याच्या अभ्यासावर लक्ष ठेवा. कुठे अडत असेल त्यावर उपाय शोधा. समजण्याचे एक नाही तर अनेक मार्ग आहे त्यापैकी तुमच्या मुलाला जो मार्ग सोयीस्कर वाटल किंवा ज्या मार्गाने समजेल, अंतर्मनात रुजेल त्या मार्गांचा वापर करा.
घरातील परीक्षेमुळे दुषित झालेले वातावरण काढून टाका. वास्तू शांती, वास्तू पूजा, यंत्रे ह्यांचा वापर करा. माझ्या स्पर्श उर्जा शास्त्राचा देखील वापर करू शकता. हे सर्व शास्त्र तुम्हाला तुमचे घर, शरीर शुद्ध करायला मदत करते व शुद्ध वातावरणात सकारात्मकता, भाग्य आणि चमत्कार निर्माण होवून तुम्हाला हवा तो रिझल्ट भेटतो.
संमोहन देखील उत्तम शास्त्र आहे, ह्याचा वापर करून देखील तुम्ही तुमच्यात आणि तुमच्या मुलांमध्ये प्रोग्रामिंग करून घेवू शकता ज्यामुळे त्यांना परीक्षा पास होण्यास मदत होते. संमोहन शास्त्र आणि वरील शास्त्र ८० % रिझल्ट देतातच. हे शास्त्र तेव्हाच वापायचे जेव्हा मी वर सांगितल्याप्रमाणे देखील सकारात्मक परिणाम येत नसतील तर.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जर परीक्षा तुमच्यासाठी समस्या असेल तर त्या समस्येवर मात करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. मी जे वर उपाय सांगितले आहे त्याचा वापर दीर्घ कालावधीसाठी नका करू. वरील मार्ग फक्त उत्तेजन दिल्यासारखे आहे, ह्या मार्गाचा वापर फक्त जेव्हा कुटुंबात ताण तणाव वाढतो तेव्हाच करायचा आहे आईन त्यानंतर लगेच तज्ञांची भेट घ्यायची आहे. कायमस्वरूपी बदलासाठी दीर्घकाळ तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करावे लागतात.
परीक्षा पास होणे सोपे आहे पण हे जे नकारात्मक विचार आणि भावना येतात ह्यामुळे हुशार विद्यार्थी देखील येत असून सुधा नापास होतो किंवा स्वतःला कमी मार्ग पाडून घेतो. तुमची मुल हि नैसर्गिक हुशार आहे. जर नैसर्गिक मार्गांनी ते यशस्वी होत असतील तर होऊ द्या, फक्त घरचे वातावरण ठीक ठेवा नाहीतर घरच्या समस्यांमुळे मुलांवर परिणाम होतो किंवा ते परिणाम करून घेतात.
वरील मार्गांचा अवलंब करा, तुमच्या मुलांना त्याचा फायदा होईल आणि सोबत तुम्हाला देखील. तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठीक ठेवण्यात मदत होईल.
appointment बुक करून तुम्ही माझ्या ऑनलाईन सेवेचा लाभ घेवू शकता. ह्या कालावधी मध्ये रीस्पोंस जास्त असल्यामुळे जो पहिला येईल त्याला अटेंड केले जाईल.
अश्विनीकुमार
बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah
फेसबुक : Balak Palak Children Parents
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
ग्रुप ३
https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1
0 आपले विचार