काल मुंबई मेरेथोन झाले, खूप आनंदाची बातमी आहे कारण अश्या स्पर्धा लोकांना चांगल्या कामासाठी एकत्र आणतात. पण अजून एक मेरेथोन संदर्भात बातमी आली ज्यामध्ये ७ स्पर्धकांना हृदयविकाराचा झटका आला आणि एक हृदयविकाराच्या झटक्याने दगावला गेला. जे दगावले गेले त्यांचे वय ६४ होते.
हे असे झाले का? अति प्रोस्ताहन, भ्र्मिक प्रोस्ताहन, इव्हेंट करून तयार केलेले वातावरण, तज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय प्रोस्ताहित होवून केलेली कृती, विनाकारण ओलांडलेली मर्यादा, दुसऱ्यांशी शर्यतीत जिंकण्याचा अट्टाहास आणि एका मेडल च्या लोभापायी केलेला शारीरिक अतिरेक.
हि अशी शर्यत असू दे किंवा उद्योग व्यवसाय असू दे तुम्ही कितीही लोकांना समजवा पण ते जाणार तर ह्याच मार्गाने.
मी तुम्हाला उदाहरण देवून सांगतो
माझ्याकडे अनेक फोन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासंदर्भात, श्रीमंत बनण्यासंदर्भात, मानसिक आणि शारीरिक विकास करण्यासंदर्भात येतात त्यामध्ये लोक घाई करतात जसे कि त्यांना अगदी पुढच्या क्षणी श्रीमंत बनायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आजारपण बरे करायचे आहे, अगदी पुढच्या क्षणी आयुष्यातील सर्व समस्या दूर करायच्या आहेत आणि परत आयुष्यात समस्या उद्भ्वायलाच नको म्हणून एकदाच उपाय करू घ्यायचे आहेत.
अश्यांचे होते काय?
कोणीतरी त्यांना भेटते आणि आणि सांगते कि हा हा उद्योग व्यवसाय करा तर तुम्हाला प्रचंड नफा होईल, तुम्ही इतके पैसे कमवू शकतात आणि त्यांच्याकडून हजारो, लाखो आणि करोडो रुपये घेतात व शेवटी तो उद्योग, व्यवसाय सपशेल बुडतो आणि ते मानसिक प्रवाहात असल्यामुळे, मृगजळाच्या पाठी पळत असल्यामुळे सर्व पैसे गमावून कर्ज करून बसतात. नंतर माझ्याकडून समाजसेवेची अपेक्षा करतात पण जेव्हा पैसा असतो तेव्हा ते योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेत नाही किंवा ऐकतही नाही.
असेच काही शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्यांचे देखील आहे. जे शेअर बाजारातील इमानदार तज्ञ सांगतात कि कमी वेळेत जास्त पैसा कमावणे शक्य नाही तिथे लोक जातच नाही तर तिथे जातात जे बोलतात कि मी तुम्हाला दिवसाला हजारो, लाखो आणि करोडो काढून देईल आणि मग काय सपशेल बुडतात व नंतर जागे होतात.
असेच आत्मविकास करणाऱ्याचे आहे, त्यांना लवकरात लवकर समस्या दूर झालेली बघायची आहे. मग ते अश्या लोकांच्या जाळ्यात अडकतात जे फक्त लुबाडण्यासाठी बसलेले असतात, ते त्यांचे मानसिक, आर्थिक, शारीरिक आणि लैंगिक शोषण करतात.
वरील मेरेथोन मध्ये असेच घडले, ना योग्य तज्ञांची मदत, भ्र्मिक प्रोस्ताहन स्वयं उपचार किंवा प्रोस्ताहित होणे आणि इंटरनेट चा वापर करून, व्हिडीओ बघून नकोत ते प्रयोग करणे जीवावर बेतू शकते.
अनेक लोक जाहिरातींना भुलून उपचार करतात व आपला आजार अजून बळावून घेतात. मग काय पैसा तर जातोच पण रुग्ण देखील दगावतो. आमच्या घरी देखील एक रुग्ण आम्ही गमावला आहे, कृपया पैसे वाचवण्यासाठी कुठलेही प्रयोग करू नका नाहीतर पैसा आणि रुग्ण दोन्ही जातील.
प्रोत्साहन देणाऱ्याचे काम असे तसे व्हिडीओ बनवणे, सेमिनार घेणे आणि पैसे कमावणे आणि तुमचे देखील काम आहे कि ह्या सर्व भ्रमाच्या चक्रातून बाहेत पडून वास्तवात राहणे, आपले आयुष्य काही प्रोस्ताहित करणारा स्पीकर सांगतो तसे सिनेमासारखे नाही.
द सिक्रेट पुस्तकाने देखील प्रचंड पैसे कमावले, आपले अध्यात्मिक गुरु तर प्रचंड श्रीमंत आहेत आणि त्यांना माहिती देखील नसेल कि तुम्ही त्यांचे शिष्य आहात म्हणून, त्यांची संपत्ती अमाप आहे. तरीही अंध भक्तांची कमी नाही आणि अशीच भक्त लोक जाहिरात करण्यार्या गुरूंना श्रीमंत करतात.
तुम्ही किती धीर धरू शकतात?
माझ्याकडे माझे शिष्य अनेक वर्षे संपर्कात आहे, सतत ते आत्मविकास करत असतात आणि त्यापैकी काही तर १० वर्षांनंतर यशस्वी झाले, एक तर करोडपती झाला. हि आहे धीर धरण्याची शक्ती जी यश देते व सोबत त्या यशाचा पाया हा भक्कम असतो. आज ते अश्या परिस्थितीत आहे कि सर्व मार्गांनी त्यांना पाहिजे ते ह्याच क्षणी मिळत जाते म्हणजे थोडक्यात ते चमत्कारिक आयुष्य जगत आहे.
अजूनपर्यंत एकालाही भ्रमात ठेवले नाही त्यामुळे जवळपास ९९ % विद्यार्थी आणि शिष्यांनी उत्तम कामगिरी करत त्यांना पाहिजे ते त्यांनी मिळवले आहे. भ्रमाच्या करोड रुपयांपेक्षा वास्तवातील हजार रुपये वर्तमान काळात कमावून दिले आहेत म्हणून ते कुटुंबासह आरामात आयुष्य जगत करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
कुणाशीही स्पर्धा करण्यास सांगत नाही, आणि नाही तश्या वातावरणात जायला सांगतो म्हणून आज राष्ट्रीय खेळाडू देखील माझ्याकडे मनो शारीरिक विकास करण्यासाठी येत असतात.ते स्वतःसाठी खेळतात आणि मेडल घेवून जातात आणि जर खेळत यश नसेल दिसत तर लगेच मार्ग बदलतात पण विनाकारण भ्रमात जगत नाही, ते वर्तमान काळात सुख समाधानाने जगतात.
कृपया आरोग्य, जीव, पैसा आणि तुमच्या आयुष्याशी खेळू नका. इथे सर्वांनाच दुसरी संधी भेटत नाही. सवाशे करोड चा भारत आहे त्यापैकी असे कितीतरी खोट्या प्रोस्ताहनात अडकून आपला, जीव आणि पैसा गमावत आहेत आणि कुटुंब रस्त्यावर आणत आहे.
तुम्ही महत्वाचे, तुमचा जीव महत्वाचा आणि तुमचे कुटुंब महत्वाचे, दीर्घ सुखी समाधानी आणि निरोगी आयुष्य जगण्याची स्पर्धा स्वतःशी करा ना कि अश्या स्पर्धेत जा जिथे क्षणासाठी तणाव, नैराश्य आणि विविध आजार होतील व जीव देखील जावू शकतो. आणि हो आता हॉस्पिटल चा खर्च कुणालाही परवडणारा नाही.
तुम्ही तुमच्या आयुष्याला जबाबदार आहात आणि तुमचे कुटुंब सोडले कि इतरांना काहीही फरक पडणार नाही.
कृपया हात जोडून विनंती आहे कि जीवघेणे प्रयोग करू नका.
धन्यवाद
अश्विनीकुमार
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.
appointment 8080218797 ह्या व्हास्टएप क्रमांकावर बुक करू शकता.
वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/
चला उद्योजक घडवूया
(फक्त आर्थिक विकास)
https://www.facebook.com/chalaudyojakghadwuya/
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
(सर्वांगीण विकास)
https://www.facebook.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-281324852234592/
Balak Palak Children Parents
(फक्त कौटुंबिक खाजगी आयुष्य)
https://www.facebook.com/Balak-Palak-Children-Parents-1642953812639963/
0 आपले विचार