प्रश्न : आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी, भाग्यशाली बनण्यासाठी, संधी मिळवण्यासाठी आणि सर्वांगीण समृद्ध आयुष्य जगायला खूप परिश्रम घ्यावे लागते का? २४ तास ध्यान आणि इतर साधना कराव्या लागतात का? सतत सकारात्मक विचार करत बसावा लागतो का?
उत्तर : नाही. काही लोक हि नैराश्यात जातात, परिस्थिती समोर हार मानतात आणि नकारात्मक आयुष्य जगायला लागतात. एक नकारात्मक इतका नैराश्यात जातो कि त्याची सकारात्मक बायको मुलांसोबत निघून जाते. तो आपल्या काम धंद्यावर लक्ष्य केंद्रित न करता सतत नकारात्मक विचार करत जातो आणि तिथे देखील त्याला काढून टाकले जाते किंवा नुकसानीत, कर्जबाजारी होतो. विविध आजारपण जडतात. त्याने जे आयुष्य वर्तमान आणि भविष्यात जगायला पाहिजे त्यावर त्याचा हक्क राहत नाही.
एकदा का ह्या नकारात्मक व्यक्तीने हक्क नाकारला कि जी दुसरी सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती सतत चमत्काराच्या शोधात असते त्याच्या आयुष्यात चमत्कार घडतो. त्याने सोडलेल्या बायको सोबत लग्न होते व तो मुलाला देखील आपलेसे करतो. अश्या पद्धतीने त्याच्या आयुष्यात सकारात्मक व्यक्ती येते आणि तो सुखी समाधानी आयुष्य जगायला लागतो.
नकारात्मक व्यक्तीने नैराश्यामुळे सोडलेल्या विविध संध्या, बंद केलेले पैसे कमावण्याचे मार्ग हे ज्या दुसऱ्या सकारात्मक व्यक्ती शोधत असतात त्यांना मिळतात. नकारात्मक व्यक्तीला कामावरून काढले जाते तिथे सकारात्मक किंवा धूर्त ह्यापैकी एक व्यक्ती लागते व प्रगती करत जाते.
नकारात्मक व्यक्ती हिलिंग ची उर्जा आणि कंपने आपल्या शरीरात येवू देत नाही त्यामुळे तो आजारपण बरा करू शकत नाही. हीच उर्जा व कंपने सकारात्मक व्यक्ती आपल्या आयुष्यात येवू देतो आणि असाध्य, न बरा होणारा आजर देखील बरा करून पूर्णपणे ठणठणीत, धडधाकट आणि निरोगी आयुष्य जगायला लागतो.
आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी अति मेहनत करण्याची गरज नाही आहे. नकारात्मक लोक सोडतील ते सकारात्मक लोकांना भेटत जाईल. तुम्हाला फक्त जास्तीत जास्त वेळ सकारात्मक रहायचे आहे आणि आलेली संधी पकडायची आहे. इथे तुमची स्पर्धा सकारात्मक + धूर्त लोकांसोबत असेल. इथे जी सकारात्मक + धूर्त लोक असतील ती ऐश आराम घेवून जातील, आणि बाकी सकारात्मक सर्वसामान्य आयुष्य घेवून जातील. सकारात्मक व्यक्तींना कसेहि आयुष्य भेटो त्यामध्ये त्यांचा फायदाच आहे.
एकदा का तुम्ही सकरात्मक आयुष्य जगायला लागला कि अनेक वर्षे किंवा शेवट पर्यंत तुम्ही सकारात्मक आयुष्य जगायला लागता त्यामुळे फक्त तुम्हाला एकदा सकारात्मक आयुष्याचे चक्र सुरु करायचे आहे. मग हे सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वतः सुरु करा किंवा तज्ञांची मदत घ्या. जर तुम्ही सकारात्मक आयुष्याचे चक्र स्वताहून सुरु करणार असाल तर जास्तीत जास्त ३ महिने द्या आणि परिणाम नाही जाणवला कि लगेच तज्ञांची मदत घ्याल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
0 आपले विचार