बाल कलाकार
कमाई, प्रसिद्धी आणि करिअर च्या अनेक संधी
अनेक सिनेमा आणि सीरिअल मध्ये बाल कलाकारांची गरज लागते. त्यांना तिथे त्यांची नैसर्गिक कला दाखवता येते.
हंसिका मोटवानी जिने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये बाल कलाकार म्हणून काम केले होते ती आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
आमीर खान ह्याने देखील बाल कलाकार म्हणून काम केले होते व आज तुम्ही तो किती प्रसिद्ध अभिनेता आहे हे बघू शकता.
वरील नावे फक्त उदाहरणादाखल दिलेली आहेत. हा लेख कोण कोणी व किती बाल कलाकार होवून गेले हे सांगण्याचा नाही तर मराठी पालकांनी आपल्या मुलांना कमी वयात कशी यश व प्रसिद्धी मिळवून द्यायचे हा आहे.
जसे बोल गेट्स चे कमी वयात यशस्वी झाला म्हणून दाखले दिले जातात तसेच इतर क्षेत्रातील प्रसिद्ध मुलांचे देखील आहे आणि सिनेमा देखील त्यापैकी एक क्षेत्र आहे.
काहींना ध्येय जन्मापासून किंवा लहानपणी मिळून जाते तर बहुतेक लोक हि नंतर ध्येय ठरवून ते ध्येय साध्य करतात. हि सर्व काही बिल गेट्स सारखी प्रोस्ताहन देणारी पुस्तके लिहित नाही.
हर्षाली मल्होत्रा ह्या बाल कलाकाराने बजरंगी भाईजान ह्या सलमान खान च्या सिनेमात काम केले होते त्या वेळी तिला २, ३ लाख रुपये मानधन मिळाले होते.
बाजारपेठ बोला किंवा वास्तव आयुष्य बोला हे असेच असते, इथे कोणी वय मानत नाही. तुमच्यात धमक आहे तर उतरा बाजारपेठेत आणि तुम्हाला हवे ते घेवून जा. इतिहासात देखील अशी उदाहरणे आहेत जिथे कमी वयात राजपाट सांभाळले गेले आहे.
म्हणजे काळ कुठलाही असो त्यामध्ये तुम्हाला संधी आहे. अमीर खान, हंसिका मोटवानी आणि हर्षाली मल्होत्रा अशी मी वेगवेगळ्या काळात सुरुवात केलेल्या कलाकारांची उदाहरणे दिली आहे ती ह्यासाठी कि तुम्ही बोलायला नको कि काळ हा तुमच्या प्रगतीसाठी आणी ध्येय गाठण्यासाठी अडथळा बनत आहे.
तुम्हाला काय वाटते कि तुम्ही ट्रेन ने प्रवास करत आहात आणि तुम्ही तिथली गर्दी अनुभवता व विचार करता कि विमानतळावर गर्दीच नसते म्हणून? कधी विमानतळावर ह्या तेव्हा समजेल कि किती गर्दी तिथे देखील असते म्हणून. म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत ह्या सर्वांना स्पर्धेचा सामना हा करावाच लागतो.
हा लेख ह्यासाठी लिहित आहे कि पारंपारिक मार्ग सोडून मराठी पालकांनी जग बघावे, काही पालक विनाकारण मुलांवर दबाव टाकून त्यांना तणाव आणि नैराश्याने ग्रस्त करत होते आणि स्वतःमध्ये काही बदल करून ह्या मार्गात कसे टिकावे ह्यासाठी.
काही पालक हे हुशार असतात आणि ते असे वेगळे मार्ग अवलंबवून आपल्या मुलांचे भविष्य हे सुखकर करून ठेवतात. ते स्वतः मुलांना प्रोस्ताहित करतात, शिक्षणासोबत जिथे मुलांना प्रात्यक्षिक करण्याची संधी भेटेल म्हणून प्रयत्न करत असतात.
मला जी लोक आयुष्यात यशस्वी झालेली दिसली त्या सर्वांना त्यांच्या आई वडिलांनी प्रोस्ताहन दिले होते आणि जी यशस्वी नाही झाली त्यांना त्यांच्या पालकांकडून प्रोस्ताहन भेटले नव्हते. म्हणून मी प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि संस्कारांना पर्याय नाही.
यश वय बघत नाही, जिथे यशासाठी सुपीक पोषक वातावरण असते तिथे यश हे येतेच, कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही तुमच्या घरात यशाचे सुपीक पोषक वातावरण निर्माण करा, मुलांना तसे बनवा आणि बघा कसे तुम्ही आणि तुमची मुल यशस्वी होतात ते.
अनेकांना वाटते कि लहान मुलांना काही समजत नाही पण हे साफ चुकीचे आहे, त्यांच्यात जो समजूतदारपणा आढळून आला तो त्यांच्या आई वडिलांमध्ये देखील आढळून नाही आला. लहान मुलांना माहिती असते कि काय योग्य आहे आणि काय अयोग्य ते पण आई वडील अनेकदा वयाने मोठे असण्याच्या गर्वात असतात व मुलांचा समजूतदारपणा हा दुर्लक्षित करतात व त्यांना मारून रागावून त्यांच्यासारखे नकारात्मक बनवतात.
मुलांना तुम्ही जसे संस्कार देतील तसेच ते बनतील. तुम्ही योग्य संस्कार द्या ते आयुष्यात भरभराट करतील आणि अयोग्य संस्कार द्या ते आयुष्य आणि कुटुंब बरबाद करतील.
तुम्हाला मुलांना तयार करण्यासाठी किंवा त्यांच्यातील जन्मजात गुणांना वाव देण्यासाठी सुरवातीला मानसिकतेवर काम करावे लागेल आणी त्यानंतर व्यवसायिक वाटचाल करावी लागेल. जितकी मानसिकता सक्षम आणि खोल त्यापेक्षा अनेक पटीने यशाची इमारत उंच किंवा मजबूत पाया असलेली.
इथे मुलांसोबत पालकांवर देखील काम करावे लागते. मुलांकडे कौशल्य असते पण त्याला योग्य दिशा देण्याचे काम पालक करत असतात त्यासाठी पालकांना देखील योग्य दिशेचे ज्ञान असले पाहिजे.
मुलं जे निरागसपणे आणि मनापासून कला सादर करत असतानाचा बघण्याचा आनंदच वेगळा असतो. एक दैवी क्षण असतो तो. जिथे मुलांवर काम करण्याची गरज असते तिथे मुलांवर काम केले जाते आणि जिथे पालकांवर जबाबदारी असते तिथे पालकांवर काम केले जाते.
एकदम सोपे आहे, मुलांची नैसर्गिक क्षमता, पालकांचे प्रोस्ताहन आणि तज्ञांचे मार्गदर्शन मिळून मुलं कमी वयात यशस्वी होतात एक पैश्यांचा ओघच त्यांच्या आयुष्यात सुरु होतो. अनेकांचे आयुष्य एका घटनेने बदलले बघितले आहे.
आजकालची मुलं हि हुशार आहेत, त्यांना माहिती आहे कि त्यांना कसे वागायचे आहे, कसे बोलायचे आहे, कसे कपडे परिधान करायचे आहे, कशी एक्टिंग करायची आहे आणि हे सगळे नैसर्गिक त्यांच्यामधून येत असते त्यामुळे विनाकारण मेंदूवर ताण देवून तणावात ते जात नाही. पण ज्यांना लहानपणी योग्य पोषक वातवरण आणि तज्ञांचे मार्गदर्शन भेटले नाही त्यांना मोठे झाल्यावर तणावाचा सामना करावा लागतो.
मग वाट कसली बघत आहात? तुमच्यासमोर मार्ग आहे फक्त वाटचाल करायची आहे. पुढील लेखात मी इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साईट चा वापर करून लहान मुलं कसे त्यांच्यातील कौशल्य जगासमोर मांडतात आणि यशस्वी होतात ते.
मनोरंजन क्षेत्रासाठी विशेष कोर्स तयार केलेला आहे तुम्ही त्याचा लाभ घेवू शकता. स्पर्धेला घाबरू नका कारण स्पर्धा सर्वच क्षेत्रात आहे, योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाने तुम्ही तुमचे ध्येय आरामात गाठू शकतात फक्त तुम्हाला किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत असेल तुमचे मागील नकारात्मक आयुष्य. तन मन धन झोकून द्या आणि जे तुमचे आहे त्यावर हक्क गाजवा.
#अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #बाजारपेठ #चलाउद्योजकघडवूया #आर्थिकविकास #नवउद्योजक #नवव्यवसायिक #ग्राहक #श्रीमंत #ऐषआराम #पैसा #नफा #नोकरी #बढती #घरखर्च
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
** फी पेड झाल्यावर तारीख आणि वेळ ठरवण्यात येईल.
फेसबुक : चला उद्योजक घडवूया
चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :
https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf