पैसे कमावण्याचे मार्ग, त्यामध्ये झालेला बदल आणि आर्थिक मानसिकता का महत्वाची आहे?
पिढीजात पैसे कमावण्याचे मार्ग
संपत्ती किंवा पैसे कमावण्याचे मार्ग
वारसाहक्क
धार्मिक, सामाजिक नियमानुसार.
उद्योग पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.
व्यवसाय पारंपारिक, वयक्तिक आणि सामाजिक.
नोकरी
धोक्याची सूचना : नोकरी आता पारंपारिक पिढीजात राहिली नाही. कंपनीचा मालक त्याची कंपनी हि त्याच्या वारसांना किंवा सामाजिक संघटना असेल तर त्यांना देईल पण नोकरी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देवू शकत नाही. कितीही मोठे पद का असेना ह्यासाठी देखील अनेक कुटुंबे रांगेत असतात. हा थोडी हुशारी वापरून, धूर्तपणा, कपट आणि वाम मार्गांनी तुम्ही हि नोकरी पिढीजात करू शकता पण धोके हे राहणारच.
व्यवसायात साधे लहान दुकान आणि त्यासोबत सुरु असलेला व्यवसाय हा पुढच्या पिढीला देवू शकतो पण नोकरी नाही.त्यानंतर तुमचे संस्कार आणि पुढच्या पिढीचा निर्णय आहे कि तो व्यवसाय करायचा कि नाही आणि त्याला कमी लेखून त्यापेक्षा कमी पगाराची नोकरी करायची.
मराठी समाजाने सोडले ते परप्रांतीय समाजाने पकडले. संधी जो तिचा फायदा घेतो तीचीची असते ना कि सोडणार्यांची. म्हणून मुंबई मध्ये उच्चभ्रू वस्तीत परप्रांतीय जास्त आहेत आणि मराठी कमी. आणि त्याच उच्चभ्रू वस्तीत अनेक परप्रांतीय लघु व्यवसाय करून लाखोंमध्ये फायदा उचलत आहेत.
आपला नेता असणे, तो श्रीमंत असणे, काही मराठी राजकारणी श्रीमंत असणे म्हणजे मराठी समाज नाही. मराठी समाज तोच जो समृद्ध असेल, ज्याच्याकडे सर्वकाही असेल ना कि अपवाद राजकारणी किंवा धर्मकारणी.
जात, धर्म, राजकारण, इतिहास असेच चालत राहणार फक्त तुमचे आयुष्य सरासरी ६० ते १०० वर्षांचे आहे. तुम्ही ठरवा कि तुम्हाला तुमचे कुटुंब बघायचे आहे कि भूतकाळात जावून डिप्रेशन ह्या मानसिक आजाराने ग्रस्त व्हायचे आहे.
जर मुंबईत राहून तुम्हाला तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसे कमावता येत नसेल, किंवा श्रीमंत बनण्याच्या संधीचा फायदा घेता येत नसेल तर तुमच्यात आर्थिक मानसिकता नाही. हि मानसिकता निर्माण करावी लागते त्यानंतरच तुम्हाला संधी दिसायला लागतात.
तुमच्यात आर्थिक मानसिकता असेल, तुम्ही आर्थिक साक्षर असाल तर तर तुम्ही आज तुमच्या गरजेपेक्षा जास्त पैसा खेचत आहात आणि नाही तर तुमच्या आयुष्यात पैसे येण्याचा प्रवाह हा नीट वाहत नाही. आयुष्य मस्करी नाही, हॉस्पिटल मध्ये जेव्हा घरची व्यक्ती एडमिट असते, जीवनमरणाचा प्रश्न असतो आणि लगेच पैसे उभे करायचे असतात तेव्हा महत्व समजते पण तो पर्यंत खूप उशीर झालेला असतो.
भावनेला किंमत नाही. आर्थिक आयुष्य आणि इतर आयुष्य वेगवेगळे ठेवून जगावे लागते, जिथे जास्त वेळ द्यायची वेळ येईल तेव्हा पैश्यांना निवडा कारण आता जगण्यासाठी पैसा लागतो. पैसा असेल तेव्हा तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करू शकता आणि अजून जास्त पैसा असेल तेव्हा तुम्ही समाजसेवा करू शकता पण ह्यासाठी देखील पैसा पाहिजेच.
आर्थिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम बनण्यासाठी मी २ कोर्स सुरु केले आहे, पहिला आहे मानसिकतेचा आणि दुसरा आहे पैसे सर्व मार्गांनी खेचून आणण्याचा.
जे फॉलोअर्स आहेत, जे समविचारी आहेत आणि ज्यांनी पैसे कमावण्याच्या आड येणारे सर्व मार्ग बंद केले असतील अश्यांचे स्वागत.
रिझल्ट येतो पण कोर्स कठीण आहे, त्यामुळे पूर्ण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तरच पाउल उचला नाहीतर नाही. कमजोर लोक हि तोवर नैराश्य आणि हृदय विकार किंवा इतर तस्तम विकारांनी ग्रस्त होण्याची शक्यता असते.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.
फेसबुक : चला उद्योजक घडवूया
चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf
0 आपले विचार