कल्पना करा कि तुम्ही हिरा आहात.
तुम्ही स्वतःला हिरा बनवण्यासाठी १५० ते २०० किलोमीटर जमिनीमध्ये गाडले, म्हणजे कठीण परिश्रम घेतले.
तुम्ही ९०० ते १३०० डिग्री तापमान सहन केले, म्हणजे संकटांचा सामना केला.
तुम्ही ४० ते ५० किलोबार म्हणजे पृथ्वीवर असलेल्या दबावाच्या ५०,००० पट जास्त दबाव तुम्ही झेलला, म्हणजे समस्यांना तोंड दिले.
इथे तुमचे हिऱ्यात रुपांतर झाले.
आता तुम्ही किंमती आहे का?
नाही.
अगोदर हिरा कुठे आहे त्याचा शोध घ्यावा लागतो.
(इथे आयुष्याची काळी बाजू दर्शवली होती ती काढून टाकण्यात आली.)
एकदा खोदकाम सुरु झाले कि तुम्हाला बाहेर बाजारपेठ निर्माण करावी लागते. त्या बाजारपेठेवर नियंत्रण मिळवावे लागते.
भावनिक जाहिरात करून हिऱ्याची किंमत वाढवावी लागते.
त्यानंतर जेव्हा तुम्हाला बाहेर काढता तेव्हा तुमचे स्वरूप असे नसते कि कोणीही तुम्हाला लगेच घेईल म्हणून. इथे तुमची किंमत ग्राहकात नाही तर उद्योजक जगतात असते.
हा टप्पा महत्वाचा आहे.
इथे जसे बाजारात विकले जाल त्याला महत्व आहे.
उद्योजक तुम्हाला पैलू पाडतो. तुम्हाला सुंदर आकार देतो, चमक देतो जेणे करून लोक तुम्हाला पसंद करायला लागतील.
ह्या वरच्या ओळीत तुम्हाला उत्तर भेटले असेल कि बाह्य स्वरूप देखील किती महत्वाचे आहे ते. फक्त बाह्य स्वरूप नाही तर जगानुसार देखील थोडे बदलावे लागते. म्हणून आपले कडपे, वागणे बोलणे हे जेव्हा लोकात मिसळाल तेव्हा मृदू, मितभाषी आणि आकर्षक ठेवाल.
मग व्यापाऱ्याकडे तुम्ही जातात. तिथून ग्राहक तुम्हाला विकत घ्यायला सुरवात करतात.
तुमची किंमत इतकी आहे कि तुमचा व्यापार हा कायदेशीर आणि बेकायदेशीर ह्या दोन्ही मार्गांनी होतो व जेव्हा देखील व्यवहार होतात ते शेकडोत नाही तर हजारो आणि लाखोत होतात. जर तुमच्या सारखे एकत्र आले कि थोडे मिळून करोडो पार करतात.
वरील नियम वापरा आणि ह्याच आयुष्यात स्वतःची किंमत वाढवून जगा जेणेकरून आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला फक्त समृद्धी आणि अमर्याद अनुभवायला मिळेल.
९० ते ९९ % आत्मविकास आणि १० ते १ % बाह्यविकास तुमचे रुपांतर मौल्यवान हिऱ्यात करतो. हा माझा सिद्धांत आहे.
तुम्हाला देखील तुमची किंमत वाढवायची असेल तर आजच आपल्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्या व पुढील क्षणी बदल अनुभवा.
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.
फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
0 आपले विचार