प्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आणि आत्महत्या
अनेकदा मला अश्या प्रेमभंग झालेल्या लोकांचे फोन येतात, त्यांचे एकच म्हणणे असते कि आता गेलेला जोडीदार परत त्यांच्या आयुष्यात आला पाहिजे. किंवा ते त्यांच्यापासून जगू शकत नाही वगैरे वगैरे. इथे वयाची अट नाही, अगदी शाळेपासून ते ज्येष्ठ प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांचा प्रेमभंग झाला होता ते देखील फोन करत होते. अजून एक आश्चर्य म्हणजे लग्न होवून, मुले होवून मुले मोठी होवून देखील काहींचे फोन आले होते. लोकांचे बाहेरील चेहरे बघून आपल्याला माहिती नसते कि त्यांचे आयुष्य हे कसे चालू आहे म्हणून.
प्रेमभंग झाल्यावर किंवा आपल्याला एकतर्फी व्यक्ती आवडत असल्यास ती नाही बोलल्यास किंवा ती आपल्या आयुष्यात न आल्यास व्यक्ती इतके टोकाचे पाउल का उचलते?
ह्याचे उत्तर मनात अंतरमनात आणि हृदयात म्हणजे भावनांमध्ये दडलेले आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात रहा किंवा एकतर्फी प्रेम करत रहा तेव्हा तुम्ही एक खूप मोठी चूक हि करता कि एकतर्फी वाहून जाता, भविष्य जे अस्तित्वात नाही त्याचे स्वप्न बघता, त्या स्वप्नात जगता, जर शाळा कॉलेज मध्ये शिकणारे किंवा अजून लग्न न झालेले जोडपे आपल्या मुलांची नावे ठेवायला सुरवात करतात, त्यामध्ये भर हि इंटरनेट ची जिथे कल्पनेचे चित्र चांगले रंगवले जाते आणि ते काल्पनिक चित्र आयुष्य खरे देखील वाटते त्यामुळे अजून विश्वास दृढ होत जातो कि भविष्य हे असेच असणार म्हणून आणि शेवटी ते दोघे वेगळे होतात.
ह्यामध्ये काही समजूतदार, वास्तवात राहणारे, भावनिक दृष्ट्या साक्षर आणि सक्षम असलेले प्रेम वीर असतात ते ब्रेकअप झाल्यावर हृदयभंग झाल्यावर आरामात समजून घेतात, एकतर कायमचे वेगळे होतात किंवा मैत्रीचे नाते ठेवतात. काही लोक दुसरीकडे लग्न करून देखील विवाहबाह्य संबंध ठेवतात.
आणि जे भावनिक दृष्ट्या कमजोर असतात निरक्षर असतात ते वेडेचाळे करायला लागतात जसे कि त्यांचा श्वासच बंद झाला कि काय. ह्याच वेडेपणामध्ये आत्महत्या देखील करायला जातात. काही लगेच सावरतात तर काहींना सावरायला अनेक दिवस, महिने आणि वर्षे लागतात. काहीतर सावरण्याचा प्रयत्नच करत नाही.
प्रेमभंग झालेल्यामध्ये एक न्युनगंड येतो. ते स्वतःला कमी समजू लागतात. त्यांना नवीन नातेसंबंध जुळवणे कठीण जाते, आणि जरी नवीन नातेसंबंध जुळवले तरी ते जास्त काळ टिकत नाही कारण ते भूतकाळात म्हणजे जुन्या नातेसंबंधांशी तुलना करत बसतात. त्यांना असे वाटते कि प्रेम परत दुसऱ्यांदा होऊ शकत नाही म्हणून पण ते हे विसरतात कि ज्या आई वडिलांचे एकापेक्षा जास्त मुले असतात ते त्या सर्व मुलांना एकसारखेच प्रेम करतात. प्रेमामध्ये पहिले दुसरे ह्याचे त्याचे असे काही नसते.
आकर्षणाचा सिद्धांत एकदम सोप्या नियमावर चालतो तो म्हणजे तुम्ही एक मागा तुम्हाला भरपूर मिळेल. उदाहरणार्थ जर तुम्ही एक बी पेरले तर जमीन हे नाही बोलणार कि तू एक बी पेरले तर तुझ्या झाडाला एकच फळ आणि एकदाच देईल म्हणून. तुम्ही जर प्रेम पेरत आहात तर तुम्हाला जास्त प्रमाणत प्रेम मिळेलच आणि त्यापैकी एकासोबत तुम्हाला लग्न करायचे आहे. काहींचे अनेक लग्न होतात किंवा लग्नानंतर देखील त्यांना प्रेम मिळत जाते हे सर्व समृद्धीचा भाग आहे. मनुष्याने निर्माण केलेले नियम निर्सग नियम आणि ब्रम्हांडाच्या नियमांना विचारत नाही.
जर निसर्ग, ब्रम्हांड इतका समृद्ध आहे तर लोक फक्त एक व्यक्ती सोडून गेली म्हणून आत्महत्या का करतात? किंवा त्याच व्यक्तीच्या नावाचे जप का जप्त बसतात? विविध व्यसने लावून का घेतात? काही स्वतःचे आयुष्य बरबाद का करतात?
कारण अश्या व्यक्तींना समृद्धी काय आहे हे माहिती नसते. ते टीव्ही वरील सिनेमे बघून मोठे झालेले असतात, त्यांना वास्तव काय आहे हे माहिती नसते. आयुष्य हे प्रेमावर नाही जिंवत राहण्याची धडपड करणे करत राहणे ह्यावर चालते. जो जगण्यासाठी धडपड करतो, जो वास्तवात आयुष्य जगतो तोच आयुष्याचा पुरेपूर आनंद घेतो व भाग्यशाली आयुष्य जगतो.
आता तर परिस्थिती अशी आली आहे कि जी मुलं पौगंडावस्थेत आहेत, ज्यांना वास्तव आयुष्याचा अनुभव नाही, जे आई वडिलांच्या सहाय्याने आयुष्य जगतात ते टोकाची भूमिका घेतात. घर चालवायला पैसा लागतो, त्याचे रक्षण करायला शक्ती लागते आणि जे शाळा कॉलेज मध्ये आहेत त्यांच्याकडे असे काहीच नाही. ते सर्व आई वडिलांवर अवलंबून असतात मग चोरी, आत्महत्या असे प्रकार करतात.
प्रेम भावना आहे म्हणून ह्याचा परिणाम हा सर्वांवर होतो मग लहान काय आणि मोठे काय त्यामुळे सर्वांना समजून घेणे त्यांना वास्तवाची जाणीव करून देणे हे खूप महत्वाचे असते. स्वतःवर प्रेम करणे खूप महत्वाचे असते ना कि इतरांवर, जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांना प्रेम देवू देखील शकत नाही. एक व्यक्ती गेली कि दुसरी व्यक्ती आरामात आयुष्यात येवू शकते, १३५ करोड ची लोकसंख्या आहे. ज्याला स्वतःच्या जीवाची किंमत नाही त्याला कुणाचीही किंमत नाही. अश्या लोकांपासून लांब रहा.
तणाव नैराश्य सोडा आणि सुख समृद्धीने भरलेले आयुष्य जगा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
appointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.
फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
ग्रुप ०
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
ग्रुप १
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
ग्रुप २
https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy
0 आपले विचार