परप्रांतीयांनी मुंबईतील मोक्याच्या जागा जिथे व्यवसाय जास्त होतो त्या ताब्यात घेवून ठेवल्या आहेत. जेव्हा मी माझा मोबाईल दुरुस्त करायला गेलो होतो तेव्हा तिथे मला मराठी मोबाईल दुरुस्त करणारा भेटला नाही तर एक परप्रांतीय भेटला ज्याचे अर्धे दुकान हे मोबाइल दुरुस्तीचे होते आणि उरलेल्या अर्ध्या दुकानात परप्रांतीय चाय आणि सोबत वडापाव विकत होता. दोघांचा व्यवसाय तेजीत सुरु होता आणि आजूबाजूला मराठी वस्ती. ती देखील कालांतराने कमी कमी होत जानार आहे. पैसे असतील तरच सामान्य मराठी मनुष्य ज्याने मुंबई वसवली तो राहू शकतो आणि सर्वांनाच काही जास्त पगाराची नोकरी लागणार नाही आणि फक्त नोकरी हा एकमेव मार्गच मराठी समाजाला मुंबईत टिकवून ठेवू शकत नाही.
तो मोबाईल दुरुस्त करणारा सांगत होता कि मनिष मार्केट किंवा मुंबई सेन्ट्रल मध्ये माझा मोबाईल दुरुस्त होईल किंवा तो पार्ट तिथे भेटेल. नंतर पुढे बोलला कि मनीष मार्केट मध्ये मुस्लीम दुकानदार आहेत आणि ते बोलायला बरोबर नाही, दादागिरी करतात. मी सहज विचारले ते स्थानिक आहेत का? तर तो बोलला कि नाही, परप्रांतीय आहेत. कारण मला माहिती आहे कि मराठी महाराष्ट्रीयन संस्कृती हि संपूर्ण वेगळी आहे, कुठलेही राज्य आपली बरोबरी करू शकत नाही. मग तो बोलला कि मुंबई सेन्ट्रल मध्ये मारवाडी लोकांची बाजारपेठ आहे तिथे तुम्ही जरी वस्तू नाही घेतली तरी ते काहीही बोलणार नाही पण जर तुम्ही मनीष मार्केट मध्ये भाव विचारले आणि वस्तू नाही घेतली तर ते अरेरावी करतात आणि अंगावर देखील धावून यायला कमी नाही करत. ते बघत देखील नाही कि सोबत कोणी स्त्री किंवा लहान मुल आहे कि नाही. हे मी डोळ्यांनी बघितले आहेत.
मनीष मार्केट आणि मुंबई सेन्ट्रल मध्ये सर्व प्रकारच्या वस्तू होलसेल आणि रिटेल भावात मिळतात. जे कुठेही तुम्हाला मिळणार नाही ते तिथे मिळेल. सर्व प्रकारचे जे महागडे श्रीमंत वापरतात ते ब्रांड आहेत त्या सर्वांच्या हुबेहूब पहिली नक्कल असलेली उत्पादने तुम्हाला तिथे मिळतील. अनेक वर्षे तिथे हा व्यवसाय विना रुकावट सुरु आहे मग इतकी वर्षे मराठी समाजाने हि बाजारपेठ काबीज का नाही केली? तिथून वस्तू घेतात आणि नंतर आपापल्या परिसरात रिटेल सारखे विकतात म्हणजे त्यांची मदत हि लागतेच. मग सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मराठी समाजाची शृंखला का नाही?
त्यानंतर बाजारपेठ काबीज केली आहे ती दक्षिण भारतीय लोकांनी. ते देखील तिथे असाच व्यवसाय बिनविरोध करत आहे. ह्यापाठोपाठ संधी, पंजाबी आणि नेपाळी लोक येतात. ह्यांचे काही सर्वांचेच कायदेशीर व्यवसाय नाही आहेत आणि हे पैसे कमावून आपापल्या राज्यात घेवून जातात. पगाराइतका पैसा ते दिवसाला कमावतात कधी कधी तासाला देखील कमावतात. माझ्याच मित्रांनी अनेकदा हजारो रुपयांची एकट्याने किंवा समुहाने खरेदी केलेली आहे.
२० वे शतक, २०१९ वर्ष सुरु आहे तरीही ह्या परप्रांतीयांच्या बाजारपेठेला टक्कर देण्यासाठी किंवा ती बाजारपेठ काबीज करण्यासाठी मराठी तरून पुढे का आले नाही हे समजत नाही. तिथे आजूबाजूला मराठी दुकानदार आहेत पण ती इमानदारीने व्यवसाय करतात, जुने मराठी बाजारपेठ देखील आहे तिथे तुम्हाला मराठी दिसून येतील. पण जास्तीत जास्त हे परप्रांतीय आहेत.
ह्या मोक्याच्या ठिकाणी असलेले दुकानदार हे आपल्या मुलांसाठी दुकान सोडून जातात व त्यांच्या मुलांना मोक्याच्या ठिकाणी असलेली बाजारपेठ मिळते. शाळेत जाणारी कॉलेज ला जाणारी मुल जेव्हा वेळ भेटते तेव्हा ते दुकान सांभाळतात, ग्राहकांना तोंड देतात आणि व्यवहार करायला शिकतात. ते पैसे देखील बघतात ना कि कुठला व्यापार खेळ खेळत बसतात. त्यांना बाजारपेठेतील ज्ञान हे भेटत जाते. मग अशी परप्रांतीय पिढीजात शृंखला सुरु होते.
त्यांच्या व्यवसायात इतका नफा असतो कि त्यांना मुंबईमधील श्रीमंत वस्तीत खोली घेणे परवडते किंवा ते भाड्याने राहतात. त्यांना मुंबई चा खर्च परवडतो. ते मुंबई चा खडा न खडा माहिती काढून घेतात व आपल्या समाज बांधवाला मदत करतात. जिथे बघावे तिथे गाववाले किंवा नातेवाईक ह्यांची दुकाने आहेत. त्यांना विचारले कि गोरेगाव ला कोण आहे? तर उत्तर असते कि नातेवाईक, मुंबई सेन्ट्रल ला कोण आहे? उत्तर नातेवाईक. म्हणजे मुंबई पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण त्यांचीच दुकाने आणि नातेवाईक.
मराठी तरुणांनो निराश व्हायचे कारण नाही कारण मी भारतीय नाही तर इतर देशातील कंपनीसोबत देखील सामना केलेला आहे. नंबर एक वर आम्ही अनेक वर्षे होतो. कुठलेही कंत्राट आम्हालाच मिळायचे. चायना, फिलिपाईन्स श्रीलंका, युरोपियन देश ह्यांच्या सोबत स्पर्धा केलेली आहे. तुम्ही ह्यांना आरामत हरवू शकता व बाजारपेठ काबीज करू शकता. फक्त एकदा बाजारपेठेत उतरा, सामना करा मग बघा. तुमचा सर्व भ्रम हा दूर होईल.
कठीण परिश्रम, एकग्रता, दर्जा, सातत्य, उत्तम संभाषण कौशल्य आणि इतर गुण जे परप्रांतीय किंवा इतर देशांमधील लोकांमध्ये आहे असे बोलले जाते, वेबसाईट वर लेख लिहिले जातात ते साफ खोटे आहे, त्यांनी जो अनुभव घेतला आहे त्यावर त्यांनी लिहिले आहे म्हणजे शितावरून भाताची परीक्षा ज्यामध्ये मी मराठी असून पुढे होतो आणि बाकी पाठी.
एकदा सामना तरी करा.भीतीवर मात करा, शत्रूला कमी समजा आणि स्वतःमध्ये आत्मविकास करत शत्रूला हरवा मग बघा तुमचा विश्वास किती वाढेल ते. फक्त एका अनुभवाची गरज बस. आणि काही वर्षे बाजारपेठेत सातत्य. विषय संपला.
मी सांगतो कि फक्त काही महिन्यात तुम्ही बाजारपेठेत जम बसवाल. फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील. पाया सर्वांचा एकच असतो फक्त तो तुम्हाला मजबूत करायचा आहे. खूप झाले आता परप्रांतीयांचे आता मराठी हा मोक्याच्या बाजारपेठेत दिसलाच पाहिजे. ज्या जिल्ह्यात दुष्काळ आहेत त्यांना अश्या बाजारपेठेत जागा द्या, स्पर्धा परीक्षा करून शेवटी पगारासाठी नोकरीच करणार आहे आणि इथे देखील पैसाच कमावणार आहे त्यावर लक्ष्य केंद्रित करा. पहिले बघा कोण किती कमावतो ते. सर्व तुमच्यासमोर आहे, फक्त तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलायचा आहे.
धाडस दाखवा, कृती करा, फक्त एक पाउल टाका आणि फक्त मुंबईतील नाही तर भारतातील आणि जगभरातील बाजारपेठ काबीज करा. आता जागतिकीकरण झाले आहे ना? मग आता आपली बारी. बाकीच्यांना आपल्या वर कथा बनवू द्या.
परप्रांतीयांनी अनेक वर्षे घालवली मुंबईमधील मोक्याच्या जागा ताब्यात घेण्यासाठी. मराठी समाजाने आता पासून सुरवात केली तर काही वर्षात आपण देखील ह्या सर्व मोक्याच्या जागा आपल्या मराठी समाजाच्या ताब्यात घेवू. साम दाम दंड भेद वापरा आणि ह्या सर्व मोक्याच्या जागा ताब्यात घ्या.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.
फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया
0 आपले विचार