मुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्तित्व कमी कसे होत गेले?
मुंबई मध्ये एक काळ असा होता ज्यामध्ये स्थानिकांची जागा होती त्यामध्ये त्यांनी दुकाने देखील काढली व भाडे खात बसले होते. ज्यांना अजून वेळ होता ते मुलं जन्माला घालत बसले. दुकानाचे मालक असणे हे महत्वाचे तर आहेचच पण अजून एक समस्या आहे ती म्हणजे जर समजा ठराविक रक्कम हि भाड्याने भेटत गेली तर विचार करा कि जो ते भाड्याचे दुकान चालवत आहे तो किती पैसे कमवत असेल?
स्थानिक मंडळे काढणे वेगळे आणि दुकान चालवणे वेगळे. मराठी लोकांची मंडळे आहे तिथेच आहे फक्त आजूबाजूची दुकाने आहे ती परप्रांतीयांच्या हातात गेली. भावना महत्वाची जी मराठी पिढ्या मुंबई मध्ये टिकणे महत्वाचे? परप्रांतीय अगोदर बेकायदेशीर काम करायचे, त्यानंतर सरकार ने अश्या कामावर बंदी आणली तर मग ते त्या सलग्न अश्या कायदेशीर व्यवसायात उतरले आणि बघता बघता प्रचंड पैसा कमवू लागले पण बेकायदेशीर काम करणे काही सुटले नाही. ह्या आणि त्या मार्गाने पैसे कमावतात व मराठी त्यांचे खाते सांभाळतो.
भाड्याची जागा आता मालकीची होऊ लागली. स्थानिक दादागिरी करत आहे म्हणून परप्रांतीय हाताखाली कामावर ठेवू लागले. स्वतःच्या गावावरून लोक मागवू लागले आणि त्यांना सर्व सुखसुविधा देवून पोसू लागले. मग तेच हाताखाली काम करणारे गावावरून मागवलेले कामगार हळू हळू नव नवीन संधी शोधू लागले आणि एकसारखी बाजारपेठ काबीज करू लागले.
उदाहरणार्थ एक परप्रांतीय दारूची अवैध तस्करी करत होते. सरकारने त्यावर बंदी आणली. मग त्यांनी बार चालवायला घेतले. कायदेशीर आणि बेकायदेशीर बार चालवू लागले. ह्यांच्या मध्ये डी एस कुलकर्णी सारखे जेल मध्ये पाठवण्याची कामे करणारा कोणी नव्हता, उलट पांघरून घालत होते. मी स्वतः स्थानिक आहे त्यामुळे सर्व आतल्या घडामोडी कश्या झाल्या ते चांगले माहिती आहे.
सर्वात मोठी चूक केली ती मराठी भाई किंवा गुंड लोकांनी. त्यांची मदत घेत परप्रांतीय हे जमिनीवर कब्जा करू लागले, हफ्ते देवू लागले, बायका मुली पुरवू लागले आणि मराठी भाई गुंडांना एका लहानश्या परिसराचे राजे असल्यासारखे वाटू लागले. सर्व गुन्हे हे मराठी भाई आणि गुंडांच्या नवे करून त्यांनी जागा ताब्यात घेतल्या, मराठी वस्ती उध्वस्त केल्या, टोलेजंग इमारती बांधल्या आणि तिथे स्थानिक आहार मांस, मटन, मच्छी ह्यावर आणि ह्या सोबत मराठी संस्कृतीच्या लोकांवर खोली घेण्यात बंदी आणली.
काहींसाठी मुंबई शहर आहे तर काहीसाठी गाव जे उध्वस्त केले गेले. स्थानिकांचा इतिहास पुसला गेला. स्वतःच्याच मराठी लोकांनी पुसायला मदत केली.
सरकारी अधिकारी ह्यांना हाताशी धरण्यात आले. त्यांना खुश ठेवण्यात आले. त्यांना पाहिजे ते पुरवण्यात आणि आपले काम पूर्ण करून घेण्यात परप्रांतीय यशस्वी झाले आणि मराठी त्याच अधिकाऱ्यांना नावे ठेवू लागला कि पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही. ते बिचारे सरकारी अधिकारी वाट बघत होते कि कोण मराठी येतो आणि त्याचे काम करून देतो ज्याने दोन मराठी कुटुंब आणि इतर अनेक मराठी कुटुंबांचा फायदा होईल पण असे काही झाले नाही.
म्हणजे इतकी वर्षे मराठी आपल्याच हाताने आपले अस्तित्व मिटवत होता जे आताच्या पिढीला समजेल कि नाही ते माहिती नाही.
प्रत्येक संधी सोडली गेली. इतका शिकलो काय बार चालवू काय? लेडीज बार किंवा दारूचे दुकान चालवायला लाज वाटते. समोरच्या जागेवर कब्जा केला तर सरकार कारवाई करेल, छे किराणा मालाचे, स्टेशनरीचे दुकान चालवू? कपडे कोण घेते? मी नाही बाजारात भाजी विकणार? मला फक्त आणि फक्त नोकरीच पाहिजे तेही ८ तास.
माझ्या पाहण्यातील २ मुले, मराठी मुलाचे वडील रिक्षा चालवतात पण त्यामधून नीट कमवता येत नाही. भविष्य अंधकारमय कारण नोकरी करणार आणि नोकरीची परिस्थिती चांगली माहिती आहे. दुसरा मुलगा परप्रांतीय आणि मुंबई मध्ये एका महत्वाच्या स्टेशनजवळ मोठे कपड्याचे दुकान. आता सांगा कुणाचे भविष्य उज्वल आहे? कुणाला पदवी पूर्ण झाल्यावर काम शोधताना तणाव आणि नैराश्य येणार आहे?
ज्याचे मोठे दुकान आहे त्याला तणाव नसेल, तो आरामात किंवा मनोरंजन म्हणून शिकत असेल, त्याला तणाव तेव्हाच येईल जेव्हा तो दुकान एकटा चालवायचा प्रयत्न करेल. त्याच्या पाठी त्याच्या वडिलांचा आणि समाजाचा हात असेल. त्यामुळे हे येणारे तणाव तो आरामात हाताळू शकतो. मराठी मध्ये देखील दुकानदार होते, इमानदार, दर्जेदार माल आणि सेवा देणारे पण नंतर काय झाले माहिती नाही जो नोकरीचा किडा चावला त्याचे विष भिनभिनायला सुरवात झाली आणि एखाद्या प्लेग सारखे सर्व मराठी समाजात पसरला गेला.
ह्या प्लेग मुळे अनेक मराठी मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आणि सोबत त्यांच्या पिढ्यांचे देखील. अनेक मराठी दुकानदार, उद्योजक, व्यवसायिक हे लुप्त होत गेले आणि त्याची भंयकर फळे हि दिसत आहे. नाहीतर फोर्ब्स च्या पहिल्या दहा श्रीमंत उद्योजकांमध्ये मराठी नाव हे तुम्हाला दिसलेच असते. १९०० चे संपूर्ण दशक पार करून आपण २०१९ मध्ये पोहचलो आहे ना कि एका दिवसात मराठी समाजाची पीछेहाट झाली आहे.
आज मुंबई ची निवडणूक बघा आणि उभे असलेले परप्रांतीय उमेदवार बघा. सगळ्यांवर काही ना काही केसेस आहेत आणि काहींनी केसेस दाबून देखील टाकल्या. आणि जर तिथे मराठी उद्योजक असला असता तर पहिले अपमानित केले असते, नंतर जात काढून त्या उद्योजकाचे समर्थक कमी केले असते जसे डी एस कुलकर्णी ह्यांचे करण्यात आले आणि नंतर त्यांना जेल मध्ये टाकले असते.
आज रहेजा कॉम्प्लेक्स उभे आहे, हिरानंदानी उभे आहे मग तिथे मुंबई मध्ये पाटील कॉम्प्लेक्स, कोळी कॉम्प्लेक्स, कुलकर्णी कॉम्प्लेक्स किंवा कांबळे कॉम्प्लेक्स का नाही? किती लोकांवर केसेस सुरु आहे माहिती आहे का? सर्व नियम पायदळी तुडवून यशस्वी उद्योजक झाले आहे परप्रांतीय. आणि ज्यांची इमानदारीची ग्वाही देत आहे ते जॉब सिक्युरिटी च्या नावाखाली प्रचंड कमी पगार देवून कामगारांचे शोषण करत आहेत. ज्या परप्रांतीयाच्या पूर्वजांनी अफू चा तस्करी बोला किंवा व्यवसाय बोला तो कमवून जो पैसा आला तो उद्योग व्यवसायात गुंतवला.
आपली त्यावेळेस दिशा चुकली आणि आज आपण भरकटलेलो आहोत. समाज उभा नाही, मदत नाही, प्रोस्ताहन नाही. संस्कार नाही आणि आर्थिक शिक्षण नाही. आज परत एका दुकानात दही घ्यायला गेलो तिथे तो लहान मुलगा शाळेतून येवून गिऱ्हाईक बघत होता, दुकान सांभाळत होता. उद्या तो शिक्षण फक्त नावाला असेल आणि शाळा पूर्ण होईपर्यंत धंद्याचे सर्व गणित शिकून घेईल आणि एम बी ए वाल्यांना कामावर ठेवेल.
इथे सर्व नातेवाईक हे गुजराती, मारवाडी, दक्षिण भारतीय, भय्ये, बिहारी आणि इतर परप्रांतीय हे वाळवीसारखे पसरले आहेत. संपूर्ण मुंबई मध्ये दुकान नाहीतर कंत्राट घेवून बसले आहेत. मराठी दिसतच नाही. मुंबई चा काही भाग असा झाला कि स्थानिक मराठी पूर्ण हद्दपार झाला कि काय अशी अवस्था आहे. आज मुंबई जाईल, उद्या पुणे पर्वा, सातारा सांगली, कोकण तर परप्रांतीय लोकांना गुंतवणुकीसाठी स्वर्ग वाटत आहे आणि तशी गुंतवणूक देखील सुरु आहे अश्या प्रकारे ते पण जाईल.
आता युद्ध करण्याची पद्धत बदलली आहे, तलवारीने युद्ध नाही होत तर पैश्याने होते. जो समाज श्रीमंत तो युद्धात जिंकणार. हे युद्ध आहे आर्थिक युद्ध. आता अशी वेळ आली कि सुरवातच महाराष्ट्र काबीज करण्यापासून करावी लागेल. जे आपले उद्योजक व्यवसायिक अगोदरच उद्योग व्यवसायात आहे त्यांना मदत करावी लागेल, संपूर्ण साखळी म्हणजे कच्चा माल, पक्का माल, ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते ते फेरीवाले हि सर्व शृंखला काबीज करावी लागेल.
नंतर बाहेर आपले हात पाय पसरावे लागतील ते संपूर्ण जगभर आपले आर्थिक राज्य प्रस्थापित करावे लागेल. जागतिकीकरणात स्पर्धेला तोंड तर द्यावेच लागेल. ह्यासाठी लागते ती मानसिकता. जर मानसिकता असेल तर टिकाल आणि नसेल तर स्पर्धेतून गरीब होवून बाहेर फेकले जाल. परप्रांतीयांना गरज नाही कारण त्यांच्याकडे मानसिकता आहे त्यामुळे ते आरामात कुठल्याही परिस्थितीतून बाहेर येतात. नुसता पैसा आहे म्हणून व्यवसाय करणारे मराठी बघितले आणि त्यांचे लाखो रुपये बुडताना देखील बघितले. अश्यांपासून लांब रहा. पैसा महत्वाचा नाही तर काहीतरी मोठे करण्याचा, श्रीमंत बनण्याचा आणि जगावर राज्य करण्याचा धगधगता अंतर्मनातील ज्वालामुखी महत्वाचा आहे.
समविचारी लोकांचे स्वागत आहे, बाकीच्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे. इथे काही दोषारोप करत नाही आणि नाही कुठला वादविवाद जेणेकरून महत्वाचा वेळ हा वाया जाईल. कमेंट युद्धापासून लांब रहा, मोठमोठ्या कमेंटस देणार्यापासून लांब रहा. फेसबुक चा वापर फक्त तुम्हाला जे पाहिजे ते घेण्यासाठी करा आणि ऑफलाईन काम करून श्रीमंत व्हा.
उद्योजक, व्यवसायिक, गुंतवणूकदार, सरकारी आणि खाजगी नोकरी करणारे किंवा इतर जे मदत करू इच्छित असणार्यांनी खालील फॉर्म भरून द्याल.
https://forms.gle/qHbMmDWCeKLRWrZF9
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.
फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया
चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf
0 आपले विचार