"फोर्ब्स ह्या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या २०१९ च्या यादीत पहिल्या दहा मध्ये एकही मराठी उद्योजकाने स्थान मिळवलेले नाही."



फोर्ब्स मासिकाने भारतातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली आणि नेहमीप्रमाणे मुकेश अंबानी ह्यांनी प्रथम क्रमांक पकडून ठेवला. मुकेश अंबानीची संपत्ती हि ३६,४५,५१,९३,००,००० तीन लाख चौसष्ठ हजार कोटी आहे. मुकेश अंबानी च्या खूप पाठी संपत्ती मध्ये दुसरा नंबर लागतो तो गौतम अदानी चा ज्याची संपत्ती हि ११,१३,५१,४६,५०,००० एक लाख करोड इतकी आहे.

यंदाच्या वर्षीप्रमाणे एकही मराठी उद्योजक, व्यवसायिक हा पहिल्या १० क्रमांकामध्ये येवू नाही शकला. मराठी समाजाने लक्ष्यात ठेवावे कि आपण देखील कधीकाळी राज्य केले आहे. त्यामुळे शत्रू कितीही बलशाली असला तरी त्याला नमवता येते हे आपल्याला चांगलेच माहिती आहे.

मी हे नाही बोलत कि पुढच्याच वर्षी मराठी उद्योजक पहिला क्रमांक पटकावेल. महत्वाचे हे नाही कोण जिंकते. महत्वाचे हे आहे कोण जबरदस्त प्रतिस्पर्धा करतो. आतापासून ध्येय एकच ठेवा कि आता फक्त पहिला क्रमांक नाही तर पहिले पाच क्रमांक हे मराठी उद्योजकांच्या नावाने भरलेले पाहिजे.

स्वप्न बघयला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही आणि स्वप्ने साध्य करायला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही आणि अडवले तर समोरच्याचे अस्तित्व नाहीसे करायचे. स्वराज्य काही असेच निर्माण होत नाही. आता इतिहास घडवणे तुमच्या हातात आहे. आणि माझा विश्वास आहेचच कारण मला माहिती आहे कि त्या लायक लोक महाराष्ट्रात आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडे उद्योजक व्यवसायिक येतात, प्रत्येक जिल्ह्यात एक मराठी व्यक्ती दाखवेल जी अंबानी अदानी आणि इतर परप्रांतीयांना तीव्र स्पर्धा देवू देखील शकते आणि प्रथम क्रमांक पटकावू देखील शकते.

सकाळी उठताना हेच ध्येय पकडून उठा आणि काम करा, रात्री झोपताना देखील तुमची भारतातील नाही तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे म्हणून हेच स्वप्न बघा. प्रथम क्रमांक कुणाची खैरात नाही, आज त्यांचे राज्य असेल प्रथम क्रमांकावर तर उद्या आपले. हे चालूच राहील. उद्यासाठी काम करा.

ह्या सर्वांची काळी बाजू देखील आहे ती मी इथे मांडत नाही. ती तुम्ही स्वतः शिकून घ्या आणि जर तिथे अडत असेल तर मी मदत करायला तयार आहे. किंमत मोजावी लागेल, यश काही इतक्या सोप्या पद्धतीने भेटत नाही. प्रथम क्रमांक पटकावण्यासाठी पाहिजे ती किंमत मोजायला तयार रहा.

यशाच्या पायऱ्या चढताना, मार्गावरून जाताना अनेक गुन्हे पचवले जातात आणि ते तुम्हाला कुठल्याही प्रोस्ताहन देणाऱ्या उद्योजकाच्या पुस्तकात दिसणार नाही. दिव्याखाली अंधार असतो. जंगले उध्वस्त झाली, स्थानिक सामवले गेले, आदिवासी गायब करण्यात आले, नद्या, समुद्रे प्रदूषित करण्यात आली, भूजल संपवण्यात आले त्यामध्ये केमिकल मिसळण्यात आले. मोठ मोठे घोटाळे करण्यात आले पण शिक्षेचे नाटक झाले असे एक नाही तर अनेक केसेस जगभरात होत असतात.

डी एस कुलकर्णी विरुद्ध लोढा, रहेजा आणि इतर परप्रांतीय अशी लढत आहे. मला हेच नाही समजत कि परप्रांतीय इतके गुन्हे करून सुद्धा जेल मध्ये का जात नाही आणि डी एस कुलकर्णी ह्यांच्यावर इतकी कडक कारवाई का? परत कुठचा डी एस कुलकर्णी जेल मध्ये गेला नाही पाहिजे अशी व्यवस्था निर्माण करा.

जर तुम्ही ध्येयाशी एकनिष्ठ असाल, काहीही करायला तयार असाल तरच संपर्क करा. युद्धभूमीवर योद्धा बनून जावे लागते आणि ध्यान करायला साधु बनून जावे लागते. दीर्घ कालावधी लागतो प्रचंड यशस्वी व्हायला, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम हे असावेच लागते. भावनेला किंमत नाही.

अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

** फी पेड झाल्यावर ऑनलाईन ऑफलाईन भेटीची वेळ ठरवण्यात येईल.

फेसबुक पेज : चला उद्योजक घडवूया

चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf
Previous
Next Post »
0 आपले विचार