सामान्यतः जगभरातील लोकांमध्ये आढळून येणारे १० प्रकारचे फोबिया (अकारण भीती)



१०) मायसोफोबिया (Mysophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये धूळ आणि घाणीमध्ये असणारे किटाणू जीव जंतू ह्यामुळे आजारी पडू शकतो म्हणून ती व्यक्ती सतत स्वतःला स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते, त्या धुळीमध्ये असणाऱ्या जीवजंतू ची इतकी भीती जडलेली असते कि ती व्यक्ती अनेकदा हात धूत बसते.

९) अ‍ॅगोराफोबिया (Agoraphobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजाराने ग्रस्त असणाऱ्यांना घराबाहेरील ठराविक ठिकाणांचे वातावरण हे असुरक्षित वाटते. हे सहसा घरी राहणे पसंद करतात आणि बाहेर गेले तरी सतत ते भीतीच्या छायेखाली वावरत असतात.

८) सोशल फोबिया (Social Phobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला समाजात चार चौघात वावरण्याची भीती वाटत असते म्हणून हि व्यक्ती सहसा चार चौघात मिसळत नाही. चार चौघात वावरताना लाज आणि भीतीच्या ओझ्याखाली दबलेली असते. तिला प्रकाशझोतात यायला किंवा येण्याची भीती वाटत असते. चार चौघात आल्यावर आपल्याकडून अशी कृती घडेल ज्यामुळे लाजिरवाणे वाटेल किंवा समोरच्या व्यक्ती ह्या अपमान करतील ह्या भीती च्या छायेखाली ते वावरत असतात. लाजाळूपणा, दरदरून घाम फुटणे, तोतडे बोलणे आणि थरथर कापणे हि लक्षणे ह्या लोकांमध्ये दिसून येतील. काही परिस्थिती मध्ये भीतीचा झटका देखील येवू शकतो.

७) ट्रिपानोफोबिया (Trypanophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारात व्यक्तीला अश्या वैद्यकीय प्रक्रियेची भीती वाटते ज्यामध्ये इंजेक्शन आणि सलाईनच्या च्या सुयांची भीती वाटते. ट्रिपानोफोबिया आजाराची सीमा तेव्हा गाठली जाते जेव्हा त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचाराची सक्त गरज असते आणि ती इंजेक्शन घ्यायला, सलाईन लावायला नकार देत असते. दरदरून घाम फुटणे, मळमळने, हृदयाचे ठोके वाढणे आणि अति टोकाचे लक्षण म्हणजे बेशुद्ध होणे हे आहे.

६) एस्ट्रोफोबिया (Astraphobia) - ह्या मानसिक भीती मध्ये व्यक्तीला कडकडणारी वीज आणि ढगांचा गडगडांची भीती वाटते. मनुष्य प्राणी आणि इतर प्राण्यांमध्ये देखील हि भीती आढळून येते. कुत्रे आणि मांजरीमध्ये ह्या भीतीचे जास्त प्रमाण आढळून येते. धोका कमी असला तरी व्यक्तीमध्ये मळमळने, रडणे, भीतीने थरथर कापणे दरदरून घाम फुटणे, सतत लघवीला येणे आणि हृदयाचे ठोके वाढणे हि लक्षणे दिसून येतात. जेव्हा व्यक्ती एकटी असते तेव्हा त्या ह्या आजारपणाची तीव्रता अजून वाढून येते. ढगांच्या गडगडातीत सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला तरी ते कानावर हात ठेवून डोके खाली ठेवून बसून जातात. घरी असतील तर ते पलंगाखाली लपून बसतात. घराबाहेर निघण्यापूर्वी ते हवामानाचा अंदाज घेतात. विजेचा आणि ढगांच्या गडगडाटाच्या सतत संपर्कात येवून प्रतिकारशक्ती निर्माण होते.

५) सायनोफोबिया (Cynophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला कुत्र्यांची भीती वाटते. कुत्र्यांचा फोटो बघून देखील भीती वाटते. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ह्या भीतीचे प्रमाण जास्त आढळून येते. मोठ्यांमध्ये हा आजार जेव्हा ते लहान असतात तेव्हा जडला जातो. अनेकदा कुत्रा चावल्यामुळे किंवा तश्या कथा ऐकल्यामुळे देखील हा आजार निर्माण होतो.

४) एरोफोबिया (Aerophobia) - ह्या मानसिक आजारामध्ये व्यक्तीला विमानप्रवासाची भीती वाटते. विमान किंवा हेलिकॉप्टर ने प्रवास करायचा आहे हे फक्त ऐकल्यावरच त्यांना चिंता आणि भीती ग्रासते. ते अवकाशातून प्रवास करायचे टाळतात. ह्या आजाराच्या तीव्रतेची लक्षणे हि उलटी, भीतीचा झटका हि आहेत. जेव्हा विमानाने कुठे जायचे ठरवले कि ते चिडचिड करतात अस्वस्थ होतात. सततच्या विमानप्रवासाने एरोफोबिया ह्या भीतीच्या मानसिक आजारावर मात करता येते. संमोहनाने देखील ह्या आज्रावर मात करता येते.

३) अ‍ॅक्रोफोबिया (Acrophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला उंचीची भीती वाटते. ह्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हि जेव्हा एखाद्या उंच ठिकाणी जायचे बोलल्यास चिंता आणि भीतीने ग्रासून जाते. जरी जास्त उंच जागा नसली तरी ह्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला जास्त भीती वाटू शकते. पडण्याच्या विचारामुळे भीती वाटायला सुरवात होते, जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा सगळे सर्वसामान्य होवून जाते. जेव्हा ह्य मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती हि उंच ठिकाणी असते तेव्हा तिच्यात दरदरून घाम फुटणे, भीतीचा झटका येणे, हृदयाचे ठोके वाढणे हि लक्षणे तर आदळतात पण जीव जाण्याचा देखील धोका असतो. संमोहन, स्पर्श चीकीस्ता आणि समुपदेशन ह्याद्वारे ह्या आजारावर मात करता येते.

२) ओफिडिओफोबिया (Ophidiophobia) - ह्या मानसिक आजारामध्ये सापांची भीती वाटते. त्यांना साप चावण्याची भीती वाटत असते. हि भीती सर्वसामान्यपणे जास्त लोकांमध्ये आढळून येते. तीन पैकी एक व्यक्ती हि ओफिडिओफोबिया ने ग्रस्त आहे. ह्या आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती हि फक्त खरा साप बघून घाबरत नाही तर व्हिडीओ फोटो बघून देखील ती व्यक्ती घाबरते. हि भीती लहान मुलांपेक्षा वयस्कर लोकांमध्ये जास्त आढळून येते. लहान मुल तर सापांसोबत खेळताना आढळून येतील.

१) अ‍ॅरेनोफोबिया (Arachnophobia) - ह्या मानसिक भीतीच्या आजारामध्ये व्यक्तीला कोळी ची भीती वाटते, फक्त कोळी नाही तर त्याप्रकारातील जीव प्राणी म्हणजे विंचूची देखील भीती वाटते. हि भीती देखील सर्वसामान्य आहे. कोळी किंवा त्या प्रजातीतील जीव दिसल्यास भीतीचा झटका, बेशुद्ध पडणे, दरदरून घाम फुटणे, रडणे आणि ओरडणे हि लक्षणे दिसून येतात. काही प्रकरणात फक्त चित्र बघितले तरी भीती वाटायला लागते. घर जाळण्यापर्यंत देखील त्यांची मजल जाते किंवते पावले उचलतात. अशी व्यक्ती कोळींना टाळण्यासाठी लांब पल्ल्याचा रस्ता देखील पकडेल. संमोहन आणि स्पर्श चीकीस्तेद्वारे आपण ह्या आजारावर मात करू शकतो.

भीती हि सर्वसामान्य आहे आणि नैसर्गिक देखील आहे. आपल्यामध्ये कुठला तरी भीतीचा आजार आहे ह्यामुळे न्यूनगंड बाळगायचे काही कारण नाही. झुरळ, उडते झुरळ आणि गोम ह्यांच्याशी माझा छत्तीस चा आकडा आहे. आणि हे सर्वांना माहिती देखील आहे त्यामुळे कोणी चिडवले असेल असे मला आठवत नाही. ह्यावरून एकदा ब्रेकअप देखील केला होता.

भीतीचा मानसिक आजार आपल्याला केव्हा जडतो जेव्हा आपण भीतीने गांगरून जातो, शरीरात बदल होतात तेव्हा आपण समजू शकतो आपल्याला भीतीच्या आजाराने ग्रासलेले आहे. तेव्हा तुम्हाला त्या भीतीच्या आजारावर मात करण्यासाठी उपचार घ्यावे लागतील. संमोहन आणि स्पर्श चीकीस्ता ह्यामध्ये उत्तम काम करताना आढळून येते.

भीती फक्त हीच नाही तर विविध प्रकारच्या भीती आहेत त्यामध्ये आपण मात करू शकतो. जर तुम्ही देखील भीतीच्या आजाराने ग्रस्त असाल तर आजच संपर्क कराल, आपण तो आजार आरामात दूर करू शकतो आणि हे मी ज्यांच्यावर उपचार केलेले आहेत त्यांच्या अनुभवावरून बोलत आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :

https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.

https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार