आताच्या काळात तुम्ही बघितले असेल कि एकदा का आजारपण झाले कि लाखो रुपये कसे निघून जातात तेच समजत नाही. आणि जर परत आजारपण झाले आणि शस्त्रक्रियेची गरज पडली कि ते संपूर्ण कुटुंब रस्त्यावर येण्याची शक्यता नाही तर शास्वती असतेच, प्रत्येकाच्या आर्थिक परिस्थिती वर अवलंबून आहे. पैश्याचे सोंग कोणीही घेवू शकत नाही. विश्वास नसेल तर कधी सरकारी हॉस्पिटल मध्ये काही दिवस घालवा तेव्हा समजेल.
ठीक आहे व्यक्ती चुकते, ती स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष्य देत नाही, किंवा जगण्याच्या दगदगीमुळे तिला वेळ भेटत नाही म्हणून तिला आजरपण बळावतो व शेवटी डॉक्टर बोलतो कि ऑपरेशन ला पर्याय नाही. तुम्हाला इतके लाख रुपये जमा करावेच लागतील आणि ज्या गरिबांसाठी स्कीम्स असतात तिथे गर्दी बघाच तेव्हा तुम्हाला वास्तव समजेल.
ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांना काही लाख रुपये गेल्यावर काहीही फरक पडत नाही, ज्यांच्याकडे लाखो करोडो रुपयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहे त्यांना काही फरक पडत नाही पण अश्या लोकांना तणाव, नैराश्य आणि चिंता ग्रासते कारण त्यांच्याकडे पैसा असला तरी ते मनुष्य प्राणीच आहेत, फक्त पैश्यांमुळे त्यांचे शरीर आणि भावना ह्या बदलत नाही. निसर्गाला आणि आजारपणाला सर्व समान आहे, ते जात, धर्म, भाषा, प्रांत आणि इतर मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले भेदभाव मानत नाही, नियम सर्वांना एकसारखेच.
डॉक्टर आपल्याला आजारी पाडत नाही तर आपण अनेकदा आपल्या चुकीमुळे किंवा नकळत झालेल्या चुकीमुळे आजारी पडतो. त्यामधून आपण बरे देखील होऊ शकतो किंवा आपले आयुष्य वाढवू शकतो.
पण अंतरमनाची शक्ती इतकी प्रचंड आहे कि ती चमत्कार घडवू शकते.
मानसिक दृष्ट्या सक्षम बनणे, म्हणजे ध्यान, मंत्र साधना ह्यांचा वापर करणे, ह्यामुळे आपण आपली मानसिक शक्ती वाढवतो व आपला मेंदू शरीराला रोग बरे करण्याचा आदेश देतो. व्यायाम मग तो कसलाही असो त्याचा देखील आपण वापर करतो. पथ्य पाळणे म्हणजे नैसर्गिक खाण्याच्या सवयी लावून घेणे व आपल्या जिभेवर ताबा ठेवणे ह्यामुळे देखील प्रचंड फायदा होतो. आरोग्याविषयी चे सर्व तज्ञ हाच सल्ला देतात.
कृपया सर्व साधना ह्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा, घरगुती उपचार करू नका नाहीतर तुम्ही अजून समस्या वाढवाल.
हिलिंग चा वापर करून आपण आपले तेजोवलय वाढवू शकतो. आपला औरा सक्षम करू शकतो. ह्याचा फायदा देखील होतो ज्यामुळे तुम्ही डॉक्टर कडे गेल्यावर तुम्हाला बरे वाटायला लागते हा झाला डॉक्टरांचा औरा आणि त्याचा परिणाम. डॉक्टर अजाणतेपणे तुमची हिलिंग करत असतात व सोबत शस्त्रक्रिया देखील करत असतात ज्यामुळे आपण ठणठणीत होतो.
अनेकदा रुग्ण बोलतात देखील कि मी आता वाचणार नाही पण ते ठणठणीत होवून बाहेर येतात. ह्याला बोलतात प्राणउर्जेची शक्ती. प्राणउर्जा तुम्हाला जिवंत ठेवत असते. कितीही मोठ्या आजारपणामध्ये तुम्हाला जिवंत ठेवते व तुमचे शरीर ठीक करण्याचा प्रयत्न करत असते.
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मधुमेह हे आजार आपल्याकडील पैसा तर काढतोच पण सोबत प्रचंड मानसिक शारीरिक ताण तणाव देखील देतो ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हे तणाव आणि नैराश्यात जाते. पैसा तर जाणारच असतो पण आपण पैसे कमावण्यासाठी जे काम करतो त्यामध्ये देखील लक्ष्य लागत नाही आणि ह्यामुळे पैसे येण्याच्या मार्गात देखील अडथळे निर्माण होतात. दोन्ही बाजूंनी कोंडी होते.
आकर्षणाचा सिद्धांत वैज्ञानिक आणि अध्यात्मिक मार्गाने वापरता येतो, ह्याचा फायदा फक्त रुग्णांना नाही तर त्यांच्या कुटुंबालाही होतो. कुटुंबातील सदस्य देखील घरी आजारपन बघून स्वतः मनोशारीरिक आजार निर्माण करतात व त्याचे रुपांतर शारीरिक आजारात करतात. इथे जर योग्य उपाय किंवा उपचार केले तर सर्वांना त्याचा फायदा होतो.
अंतरमन बोला निसर्ग बोला किंवा आत्मा हा आपल्याच शरीराचा एक भाग आहे. हाच आपल्या शरीरातील एक भाग आपले शरीर सुदृढ करतो व त्याचा आपल्याला फायदा होतो. फक्त आर्थिक नाही तर सर्वांगीण आयुष्य सुखकर करून टाकतो.
कुठलीही उपचार पद्धती असू द्या तिचा उद्देश हाच असतो कि काहीही करून तुम्हाला बरे करणे त्यामुळे तुमच्या चालू असलेल्या वैद्यकीय उपचारासोबत तुम्ही इतर उपचार पद्धतीचा वापर करू शकता.
समुपदेशन, ध्यान, स्पर्श चीकीस्ता आणि संमोहन ह्या उपचार पद्धतीचा लोकांना प्रचंड फायदा झाला आहे. अनेकांना सकारात्मक रिझल्ट्स आले आहेत. अनेकांचे पैसे वाचले आहे. ह्याचा फायदा फक्त रुग्णांनी नाही तर डॉक्टर, रुग्णांचे कुटुंबीय ह्यांनी घेतलेले आहेत.
मी घरगुती उपचार ह्यासाठी नाही बोलत कारण अनेकांनी घरगुती उपचार करून त्यांच्या समस्या वाढवल्या आहेत व शेवटी त्यांना हॉस्पिटलमध्ये भारती व्हावेच लागले, काही हजारांसाठी त्यांनी त्यांचा लाखोंचे आणि शरीराचे नुकसान करून घेतलेले आहेत.
जर तुम्ही देखील अश्याच समस्यांमधून जात असाल तर आजच संपर्क करा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
फेसबुक :
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :
https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.
https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH
0 आपले विचार