भविष्यात यशस्वी होणाऱ्या व्यक्तींची वर्तमान काळातील लक्षणे



तुम्ही देखील कुठची व्यक्ती यशस्वी होईल हे भविष्य वर्तवू शकतात. खूप सोपे आहे. काही रहस्य वैगैरे नाही. तुम्ही स्वतःला देखील तपासू शकता.

आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो आपण त्यांच्यासारखेच बनतो.

तुम्ही कोणासोबत राहता हे तपासा. तुम्हाला त्यांचे कुठले गुण आवडतात आणि कुठले नाही हे लिहून ठेवा. तपासल्यानंतर तुम्हाला समजून येईल कि तुम्ही कोठे चालला आहात ते.

मनुष्य हा समुहात राहणारा प्राणी आहे. सामाजिक प्राणी आहे. आपण ज्या समुहात राहतो, त्यांचे प्रत्येकाचे नियम असतात ते आपण आचरणात आणत असतो. नकळत आपल्या अंतरमनात हे सर्व आचरण कायस्वरूपी बसते व नकळत आपण दररोज तशी कृती करत जातो.

तुम्हाला यशस्वी बनायचे आहे?
यशस्वी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे आहे?
आनंदी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे आहे?
निरोगी आयुष्य जगणाऱ्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला धाडसी बनायचे आहे?
धाडसी लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा आहे?
आत्मविश्वासू लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला अंतर्मनाची शक्ती जागृत करायची आहे?
ज्यांची अंतर्मनाची शक्ती जागृत झाली अश्यांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला भाग्यशाली आयुष्य जगायचे आहे?
भाग्यशाली लोकांच्या समुहात रहायला सुरवात करा.

तुम्हाला गरुडझेप घायची आहे?
गरुडांच्या समुहात रहायला सुरवात करा.
गरुड कबूतरांसोबत उडत नाही आणि राहत देखील नाही.

तुम्ही जास्तीत जास्त वेळ कुणासोबत घालवता त्यावरून तुम्ही घडत जाता व तुम्ही तशी परिस्थिती देखील निर्माण करतात.

जर तुम्हाला यशस्वी लोकांचा सहवास भेटत नसेल तर तज्ञांच्या सहवासात रहा.

वेळ हि वाळूसारखी निसटून जात असते त्या सोबत तुमचे आयुष्य देखील. जो काही निर्णय घ्यायचा तो आज घ्या. वेळ कुणासाठीही थांबत नसते.

तुमच्या परिसरातील ऑफलाईन समविचारी आणि कृतीशील लोक भेटत नसतील तर ऑनलाईन त्यांना शोधा व त्यांच्या संपर्कात रहा.

सकारात्मक भावना आणि कंपने जुळण येणाऱ्या लोकांसोबत रहा आणि नकारात्मक भावना आणि कंपने जुळून येणाऱ्या लोकांपासून लांब रहा.

ऑनलाईन कमी आणि ऑफलाईन जास्त आयुष्य जगा.

लवकरच समविचारी कृतीशील लोकांचा समूह बनवण्यात येईल. ह्या समुहात येण्यासाठी मागील सर्व नकारात्मक पूल तोडावी लागतील व परतीचा मार्ग बंद करावा लागेल.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार