जेव्हा जोडपे त्यांच्या समस्या घेवून येतात तेव्हा मी अगोदर त्यांना वेगवेगळे अटेंड करतो ज्यामुळे त्यांना व्यक्त होता येतात मग एकत्र. जेव्हा ते एकटे असतात तेव्हा ते मनमोकळे पणाने बोलतात व्यक्त होतात आपल्या भावना व्यक्त करतात.
जेव्हा जोडीदार एकता असताना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगतो तेव्हा असे आढळून आले कि आजच्या धकाधकीच्या जीवनात, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आणि ऑफिस किंवा कामाच्या निमित्ताने बाहेर वेळ घालवल्यामुळे अनेकांचे विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होतात. आता हे प्रमाण वाढत चालले आहे. जोडीदाराबद्दल च्या भावना जर कमी होत असतील किंवा नसतील तर आपण समजू शकतो पण त्यामध्ये लहान मुलांचा काहीही दोष नाही.
असे अनेक वैवाहिक जोडीदार बघितले जे कामात आणि करिअर मध्ये इतके व्यस्त असतात कि ते घरीच मुल झोपल्यानंतर येतात. काही तर कामानिमित्त भ्रमंतीवर असतात. त्यांना सेक्स केला कि नाही हे देखील माहिती नसते आणि मुल कुणाची आहे हे देखील. त्यांचे काम असते पैसा कमावणे आणि घरी खर्चासाठी मुलांना क्रेडीट कार्ड देणे.
अगोदर हे प्रमाण जे उच्च पदावर होते, जे मालक होते त्यामध्ये दिसून येत होते पण जस जसे कामगार कायदे शिथिल झाले, कामाचे तास वाढले, नोकरीची शास्वती राहिली नाही आणि कार्यालयापासून लांब घर असल्यामुळे विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण हे मध्यम वर्ग आणि गरीब लोकांमध्ये देखील वाढले. आता कुणाला फुरसतीचा वेळ उरला नाही आणि नाही इतरांच्या आयुष्यात झाकू शकतात. एकाच इमारतीमध्ये एक सकाळी कामाला जातो तर दुसरा दुपारी आणि तिसरा संध्याकाळी. सुट्टी देखील रविवारची नाही तर कधीही दिली जाते त्यामुळे शेजार संबंध जुळूनच येत नाही.
स्थानिकांचे प्रमाण कमी झाले आणि परप्रांतीयांचे प्रमाण वाढले जे इथे पैसा कमावण्यासाठी आणि मौज मजा करण्यासाठी आलेले असतात. त्यांना ओळखणारे कोणी नसते त्यामुळे ते विवाह झाला असला तरी विवाहबाह्य संबंध ठेवतात. त्यांना माहिती असते कि मुंबई मध्ये ते पैसे कमवायला आलेले असतात व इथे काहीही झाले तरी ते त्यांच्या मूळ राज्यात परत जावू शकतात. एक स्त्री किंवा पुरुष किती वेळा नाही बोलेल? शेवटी काही त्यांच्या जाळ्यात फसतातच.
विवाहबाह्य संबंधामध्ये आता वयाची देखील अट राहिली नाही त्यामुळे नक्की काय चालले आहे ते देखील समजून येत नाही. कॉलेज च्या मुलामुलींचे देखील विवाहित लोकांसोबत संबंध आहेत. वय नातेसंबंध हे सर्व बाजूला सारले गेले. जोडीदार भेटत नाही म्हणून नात्यांमध्ये लग्न झालेली काही उदाहरणे आढळून आली.
नात्यांमध्ये देखील विवाहबाह्य संबंध आढळून आले. हे सहसा समजून येत नाही आणि उघडकीस देखील येत नाही. कारण सर्वांना ते एकमेकांचे नातेवाईक आहेत असाच भास होतो. सम वय किंवा थोडेफार वयामधील अंतर असते, भाऊ बहिण आहेत असे सांगतात किंवा इतर जे काही नाते असेल ते पण त्यांचे प्रेमप्रकरण सुरु असते. तेव्हा जोडीदाराला जास्तच मानसिक धक्का बसतो जेव्हा त्याला समजते कि आपल्या वैवाहिक जोडीदाराचे त्याच्याच ज्याला किंवा जिला ते भाऊ बहिण मानत असतात त्यांच्यासोबत संबंध आहेत.
पुरुष हेट्रोसेक्शुल जरी असाल तरी तो सहसा समलिंगी संबंध ठेवत नाही किंवा त्यांचे तसे करण्याचे प्रमाण कमी असते पण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात भले ते हेट्रोसेक्शुल असले तरी समलिंगी आकर्षण दिसून येते. अनेकदा स्त्रिया ह्या जेव्हा मैत्रिणीकडे वेळ घालवतात तेव्हा काही स्त्रिया ह्या समलिंगी संबंध ठेवतात किंवा आकर्षित होतात. नवरा जेव्हा पकडतो तेव्हा त्याला वाटते कि त्याची बायको हि समलिंगी आहे पण असे नसते, नैसर्गिक आहे, कारण स्पष्ट नाही. अनेकदा अश्या प्रकारचे विवाहबाह्य संबंध देखील निर्माण होतात.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. विवाहबाह्य संबंधांची कारणे हि बदलत जातात. ह्यामध्ये मुख्य कारणे शारीरिक आणि मानसिक गरज पूर्ण न होणे हे आहे. सोबत पैसा देखील महत्वाचा आहे. आताच्या काळात स्त्रियांकडे पैसे देखील आहे व ते त्यांच्या पायवर देखील उभ्या आहेत त्यामुळे अनेकदा त्या स्वतः निर्णय देखील घेतात. धाडस देखील दाखवतात. अनेकदा स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्त धाडसी दिसून आल्या आहेत आणि त्या नैसर्गिक आहेत देखील कारण मुलांना सांभाळायचे काम देखील त्यांचेच असते म्हणून त्यांना निसर्गाने धाडसी बनवले आहे.
माझे म्हणणे इतकेच आहे कि कुणाचा जीव ह्या अश्या संबंधामुळे जाता कामा नये आणि मुलांची फरफट होता कामा नये, बाकी निर्णय तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने घेतलेला बरा. कृपया अश्या नाजूक संबंधांच्या वेळेस तज्ञांची मदत घेत जा, समुपदेशन करत जा ह्यामुळे आपण टोकाचे पाउल उचलत नाही व योग्य निर्णय घेतला जातो.
लोक अनेक समस्यांमधून जात असतात आणि त्यांना वाटते कि ते एकटेच आहे पण असे काही नसते, तुमच्यासारख्या समस्या ह्या अनेकांना आहेत फक्त तुम्हाला महिती नाही कारण चार भिंतीच्या गोष्टी कधीही बाहेर येत नाही किंवा आणत नाही पण मनातल्या मनात झुरत जातात. असे झुरण्यापेक्षा त्या भावनांचा निरचा केलेला बरा. इथे समुपदेशन आणि आकर्षणाचा सिद्धांत खूप प्रभावशाली काम करतो, तुम्हाला अश्या समस्यांमधून बाहेर काढतो आणि सोबत संमोहनाचे उपचार घेतले तर अजून प्रभाव पडतो.
अश्विनीकुमार
बालक, पालक, कुटुंब आणि नातेसंबंध
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
व्हास्टएप ग्रुप फक्त पोस्ट : https://chat.whatsapp.com/Hi7uSq1sTJ2Ha3OjHGzUah
फेसबुक पेज : Balak Palak Children Parents