तुम्ही पिंजऱ्यात कैद केलेले वाघ आहात कि जंगलातल्या मुक्त वातावरणात राहणारे वाघ आहात?



मनुष्य हा निसर्ग नियमांविरुद्ध वागत आहे. जंगलात जिथे चालायला लागल्यावर प्राणी आपल्या पिल्लांना, बछड्यांना शिकार करायला शिकवतात तिथे मनुष्य प्राणी हा चार भिंतींच्या शाळेत आपल्या मुलांना पाठवतो.

सर्कस मधील पिंजऱ्यात जन्माला आलेल्या वाघाच्या बछड्याला स्वतंत्र काय असते हे माहिती नसते तसेच मनुष्य प्राण्याच्या मुलाला देखील माहिती नसत कारण ते पिंजऱ्यात जन्माला आलेले असतात.

सर्वच मनुष्य प्राण्याची मुल हि पिंजऱ्यात वाढतात का?
नाही.

काही मनुष्य प्राण्याची मुल हि परिस्थिती मुळे, स्वभावामुळे किंवा संस्कारामुळे चार भिंतींच्या बाहेर आयुष्य जगतात किंवा दुहेरी आयुष्य देखील जगतात जिथे ते शाळा आणि घर ह्या पिंजऱ्यात आयुष्य जगतात आणि त्याबाहेर देखील.

जिथे जास्तीत जास्त मुलांचे आयुष्य हे पिंजर्याबाहेर मुक्त जंगलरुपी बाजारपेठेत २० ३० वर्षानंतर सुरु होते तिथे काहींचे आयुष्य हे २० किंवा १० वर्षांच्या आत बाजारपेठ रुपी जंगलात सुरु होते.

जी मुलं हि जास्तीत जास्त वेळ पिंजऱ्यात राहिली त्यांनी फक्त घरच्यांची शाळेची काळी बाजू बघितली असेल पण जी मुलं पिंजर्याबाहेर मुक्त बाजारपेठेत वाढली त्यांनी आयुष्याची काळी बाजू बघितलेली असते.

पिंजऱ्याच्या आत वाढलेल्या मुलांना संकटाचा सामना कसा करायचा, जीवन मृत्यू ह्या क्षणाच्या वेळेस लढा कसा द्यायचा हे नैसर्गिक गुण जागृत न झाल्यामुळे ते अनेकदा शिकार होतात, इथे जर एकदा जीव गेला तर ठीक आहे पण जेव्हा सतत सतत त्यांना संकटांचा सामना करायला लागतो तेव्हा ते दररोज जखमी होतात व ते घाव जास्तीत जास्त प्रमाणत मानसिक असतात ते काही भरत नाही. मग तणाव आणि नैराश्याने भरलेले आयुष्य जगतात.

पिंजर्याबाहेर वाढलेल्या बछड्यांना संकटांचा, जीवन मृत्यू चा चांगलाच अनुभव आलेला असतो त्यामुळे ते मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या सक्षम झालेले असतात, त्यांना शिकारी पासून वाचता येते, जीवन मृत्यू चा त्यांनी अनेक वेळेस सामना केलेला असतो, त्यामुळे त्यांना भीतीवर मात आरामात करता येते.

पिंजर्याबाहेर वाढलेले बछडे हे आत्मविश्वासाने भरलेले असतात तर पिंजऱ्यात वाढलेले बछडे ह्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव जाणवून येतो.

तुम्ही कितीही सुरक्षित पिंजऱ्यात वाढा पण शेवटी तुम्हाला यायचे आहे ते बाजारपेठेच्या जंगलातच जिथे, वाघ सिंह, चित्ता, कोल्हे, जंगली कुत्रे, विषारी साप आणि गरुडासारख्या पक्षांचा सामना करायचा आहे. इथे दुसरा पर्याय नाही.

पिंजऱ्यात वाढलेल्या बछड्यांनी पुस्तकांची कागदे बघितलेली असतात तर पिंजर्याबाहेर वाढलेल्या बछड्यांनी पैश्यांची कागदे बघितलेली असतात. आत्मविश्वास मध्ये देखील फरक असतो. फक्त आत्मविश्वास आणि स्वकमाई पैश्याने भरलेला खिसा असेल तेव्हाचा आत्मविश्वास ह्यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे.

आयुष्य म्हणजे मस्करी नाही. ज्यांनी आयुष्याची काळी बाजू बघितली त्यांना चांगलेच माहिती आहे कि कशी दोन तोंडाची लोक इथे वावरता तर काहींनी सभ्यतेचा, उच्च शिक्षणाचा आणि पदाचा बुरखा पांघरलेला असतो.

निसर्ग सर्वांना समान संधी देतो पण मनुष्य प्राण्याने निर्माण केलेले नियम नाहीत. इथे तुम्हाला अजून हुशारीने धूर्तपणे वावरावे लागते.

तुम्ही शिका किंवा नका शिकू पण जगायचे तर सर्वांना आहे. शिक्षणाचे महत्व सांगून सर्वांना शाळेत पाठवायला लागले, भावना शाळेपासून जुळवल्या आणि नंतर शिक्षण महाग केले.

शाळा सोडलेला भाजीवाला उच्च शिक्षित कर्मचाऱ्यापेक्षा जरी जास्त कमवत असला तरी त्याला लग्नासाठी मुलगी दिली जात नाही किंवा त्याच्या घरात मागणी घालायला कोणीही जात नाही. कारण तो एक भाजीवाला आणि दुसरा उच्च शिक्षित कंपनीत काम करणारा. एक मालक तर दुसरा नोकर.

भले कैदखाण्यातील एखाद्या जोडीदारासोबत लग्न नाही झाले तरी चालेल पण जे चार भिंतीबाहेर वाढले अश्यांना आपला जीवनसाथी बनवा, तोच तुम्हाला संकटात साथ देईल व तुम्हाला संकटातून बाहेर काढेल.

एक खात्रीने सांगतो कि जास्तीत जास्त शिकार पिंजऱ्यात वाढलेल्या मुलांचा केला जातो आणी शिकारी असतात पिंजर्याबाहेर वाढलेली मुलं.

परिस्थिती मुले एखादा वयाच्या १० व्या वर्षी कमवायला सुरवात केली असेल आणि दुसरा वयाच्या २५ व्या वर्षी म्हणजे तब्बल १५ वर्षांचा फरक आहे. विचार करा ह्या १५ वर्षांत ते कुठपर्यंत गेले असतील ते.

जर तुम्हाला शिकारी बनायचे असेल, जर तुम्ही पिंजऱ्यात वाढला असाल तर तुम्हाला आत्मविकासाची सक्त गरज आहे. कारण एकदा का तुमची शिकार झाली कि कोणीही काहीही करू शकत नाही.

निर्णय तुमचा आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.

फेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत

व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5

धन्यवाद
अश्विनीकुमार

मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
Previous
Next Post »
0 आपले विचार