जेव्हा पहिले १० उद्योगांची यादी बघतो तेव्हा असे दिसून येते कि भले मुख्य कार्यालय हे मुंबई मध्ये का असेना पण त्यांच्या मालकांचा जन्म हा महाराष्ट्राच्या बाहेर झालेला असतो. भले सर्व च्या सर्व १० मराठी नको पण कमीत कमी १ तरी उद्योजक त्या यादीत असा पाहिजे ज्याचा जन्म महाराष्ट्रात झाला असावा आणि त्याचे आडनाव देखील मराठी असावे. म्हणजे २०१९ मध्ये देखील आपण मागे आहोत. पुढील १० वर्षांचे लक्ष्य ठेवले कि मी खात्रीशील सांगू शकतो कि एका तरी मराठी उद्योजकाचे नाव हे भारतातील १० श्रीमंत उद्योजकांच्या यादीत येईल. हे नाव तुमचे देखील असू शकते, तुम्ही एक पाउल तरी उचला. सर्वकाही शक्य आहे.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
0 आपले विचार