मराठी तरून तरुणींना "कुठला व्यवसाय करू?" "कुठली नोकरी करू?" भेडसावणारा प्रश्न आणि त्याचे मानसिकतेत, संस्कारात, मराठी समाजात लपलेले उत्तर


मराठी तरून तरुणी कुठचा उद्योग व्यवसाय आणि नोकरी करू हा विचार करत बसतात, इतरांना विचारत बसतात तर दुसरीकडे परप्रांतीय येवून जिथे संधी भेटेल तिथे ओळख काढून उद्योग व्यवसाय सुरु करतात किंवा नोकरीला सुरु करून दिवसाला किंवा महिन्याला पगार मिळवायला सुरवात करतात आणि आश्चर्याची गोष्ट हो असते कि त्यांच्याकडे रहायला घर देखील नसते म्हणजे विचार करा जर आपण मुंबई मध्ये राहून आपले घर असून आपण कमी का कमावतो? कमावण्याचे इथे मी फक्त कायदेशीर मार्गांबद्दल बोलत आहे ना कि बेकायदेशीर मार्गांबद्दल.

अनेकांना वाटते कि भ्रष्टाचार हा फक्त सरकारी नोकरी मध्ये होतो ना कि खाजगी. हा साफ खोटा गैरसमज आहे. माझ्या संपर्कात अशी लोक होती ज्यांचा पगार कमी पण कंपनीला आणि त्यांच्या ग्राहकांना फसवून त्यांनी प्रचंड पैसे कमावले व स्वतःचे घर देखील घेतले. इथे नियम एकच लागू होतो तो म्हणजे जो पकडला गेला तो चोर.

मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हा मी एक एक पैश्यांचा हिशोब मालकाला द्यायचो आणि तुटपुंजा पगार घेवून घरी यायचो आणि त्याच कंपनीत माझा जो परप्रांतीय मित्र होता तो लेडीज बार मध्ये पैसे उडवत बसायचा. तरीही शेवटी थोड्याश्या अनबन मुळे मालकाने मला काढून टाकले आणि तो परप्रांतीय मुलगा अजून देखील त्याच कंपनीमध्ये कामाला आहे.

भ्रमात राहू नका. लोक कुठकुठच्या मार्गांनी पैसे कमावतात हे मला बिलकुल माहित नव्हते पण जस जसे परप्रांतीय संपर्कात आले, मराठी लोकांशी संपर्क थोडा कमी झाला तस तसे मला विवध मार्ग दिसू लागले आणि जेव्हा एक मार्ग वापरून बघितला त्यातील पैसे कमावणे किती सोपे असते हे बघितले तेव्हा समजले कि परप्रांतीय इतके पैसे कसे कमावता ते.

जर तुम्ही धाडसाचे बोलत असाल तर कोण बोलते कि मराठी तरुणांमध्ये धाडस नाही आहे म्हणून? पण त्यांना असे संस्कार दिले जातात कि ते फक्त आणि फक्त गुलाम म्हणून जगले पाहिजे. नोकरी केली तरी मालक जे शोषण करून पगार देत असतो त्यामध्ये समाधान मानायला सांगतात मग मालक काय शोषण करतच बसतो. मी जेव्हा काम करायचो तेव्हा मला वाटायचे कि मी इमानदारीने काम करतो आणि मालक देखील पण जेव्हा त्याने मला सी ए कडे त्याची फाईल घेवून पाठवले तेव्हा कळाले त्याची कमी किती आणि तो पगार किती देतो.

फक्त पैसे कमवत आहे म्हणून ती व्यक्ती चांगली असा अर्थ होत नाही. राजकारणी लोक सोडून जर कोणी मराठी पैसे कमवत असेल तर लोकांना ते बघवत नाही आणि तिथेच परप्रांतीय घोटाळे करून करोडोची संपत्ती जमवत असेल तर ते त्याची चर्चा करत बसतील. हे जे वास्तव सांगत आहे ते के बघितले आहे पुराव्यानिशी ते सांगत आहे. तरीही एक प्रश्न यायचा कि मग इन्कमटॅक्स आणि इडी ह्या खात्यातील कर्मचारी काम करतात तरी काय? नंतर ह्या प्रश्नाचे विचार करणे सोडून दिले.

महत्वाची बाब म्हणजे जे परप्रांतीय आहे त्यापैकी काही बिलकुल मारा मारी करत नाही, आणि ह्यामध्ये तर मराठी तरून पुढे होता. तरीही त्यांचे धाडस इतके असते कि ते ब्लेकमेल करायला पाठी पुढे पाहत नाही. ते प्रयत्न करतात जर हा घाबरला तर मला पैसे देईल आणि नाही तर धमकी देवून सोडून देईल, जास्तीत जास्त मारेल पण मारून टाकणार नाही म्हणून १०० पैकी ५ तरी त्यांच्या जाळ्यात फसतातच.

वास्तव आयुष्यात जगायला शिका. सिनेमा वेगळा आणि त्या सिनेमामध्ये कोणा कोणाचे पैसे लागले तो देखील एक संशोधनाचा भाग आहे. वास्तव आयुष्यात जर तुम्ही संधी चा फायदा नाही उचलला तर दुसरा ती संधी घेवून जाईल. संधी प्रत्येक ठिकाणी असते तुम्हाला ती फक्त शोधायची आहे, नसेल तर निर्माण करायची आहे जसे माझ्या ऑफिस मधील मित्राने निर्माण केली तशी, पगार कमी वर कमाई जास्त.

तुम्ही आणि तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग हे गुप्त ठेवा. खासकरून जर तुमचा जास्तीत जास्त संपर्क हा मराठी लोकांसोबत येत असेल तर, आणि सहसा परप्रांतीय लोकांसोबत चर्चा करताना देखील तुमचे पैसे कमावण्याचे मार्ग उघड करू नका हा पण ते कुठ कुठल्या मार्गाने पैसे कमावतात हे त्यांच्या काढून जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

फक्त आणि फक्त समविचार आणि सम कृतीशील लोकांसोबतच रहा. समविचारी लोकांसोबत राहिल्यामुळे तुम्हाला सतत विरोधाचा सामना करावा लागणार नाही त्यामुळे तुम्ही नैराश्यात जाणार नाही. सम कृतीशील म्हणजे जिथे लोक भावनिक सणांच्या सुट्ट्या घेत असतील तिथे तुम्ही तुमच्या साथीदारासोबत नवीन संधी साधण्यासाठी कामावर जात असाल.

म्हणून मी माझ्या प्रत्यके लेखामध्ये बोलत असतो कि जर आर्थिक मानसिकता, साक्षरता आणि भावनिक दृष्ट्या सक्षम असाल तरच उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक किंवा मोठ मोठ्या आर्थिक व्यवहारात उतरा, धाडस दाखवा नाहीतर पहिले आर्थिक दृष्ट्या साक्षर व्हा, सक्षम व्हा, मानसिक दृष्ट्या समक्ष आणि साक्षर व्हा त्यानंतरच मोठ मोठ्ये आर्थिक व्यवहारांकडे वळा.

श्रीमंत बनण्याच्या वाटेवर भले तुमची गाडी कितीही मोठी असली तर तुम्हाला एकट्यानेच प्रवास करायचा आणि आणि अश्या अनेक गाड्या त्या मार्गाने जात असतात. प्रत्येक जन आपल्या कामात व्यस्त असतो कोणीही बाहेर बघत नाही.

जागृत झाला असाल तर बिनधास्त मोठी झेप घ्या, मी तुमच्या पाठीशी आहे.

#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.


धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया

Previous
Next Post »
0 आपले विचार