कोण बोलतो कि फिटनेस (शारीरिक आरोग्य) च्या क्षेत्रात पैसा नाही म्हणून?


तुम्हाला फिटनेस ट्रेनर व्हायचे आहे? बिनधास्त व्हा. फिटनेस क्षेत्रात खूप पैसा आहे. तुम्ही अगदी खोर्याने देखील पैसा काढू शकता. हो हे शक्य आहे. विश्वास नाही बसत मग पुढील लेखात दिलेली फिटनेस ट्रेनर आणि त्यांची फी बघा.

ट्रेनर नाव : समीर जौरा
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : फरहान अख्तर. भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेता, प्लेबॅक गायक, निर्माता, आणि टीव्ही होस्ट.
फी : ३ ते ४ लाख रुपये महिना. पोषण आहारासकट.

ट्रेनर नाव : यास्मिन कराचीवाला
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : कॅटरिना कैफ. अभिनेत्री.
फी : १२ सत्रांचे १९,५०० (एकोणीस हजार पाचशे).

ट्रेनर नाव : सत्यजित चौरसिया
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : आमीर खान. भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि टीव्ही टॉक शो होस्ट
फी : १० हजार ते १ लाख. ग्राहक आवडल्यास विनामुल्य सेवा ट्रेनिंग द्यायला तयार.

ट्रेनर नाव :  समीरा आणि नम्रता पुरोहित
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : सारा आली खान, अभिनेती, सैफ अली खान आणि अम्रिता सिंग ह्यांची मुलगी. अभिनेते वरून धवन, आदित्य रॉय कपूर, अर्जुन कपूर. २०११ पासून फेमिना मिस इंडीया पेजंट ह्यांना ट्रेन करत आहे.
फी : १२ सत्रांचे ३२ हजार. व्यक्तीक ट्रेनिंग.

ट्रेनर नाव :  मनिष अडविलकर
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : सलमान खान. भारतीय चित्रपट अभिनेता, निर्माता, (कधीकधी) गायक आणि टीव्ही व्यक्तित्व. मिस्टर इंडीया विजेते आणि आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डींग विजेते.
फी : घरी येवून शिकवायचे ४ हजार रुपये प्रती सत्र. स्वतःच्या व्यायामशाळेत शिकवायचे ३५ हजार रुपये महिना.

ट्रेनर नाव :  पायल गिडवानी तिवारी
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री करीना कपूर, अभिनेता आणि नवाब सैफ अली खान.
फी : प्रती वर्ग ६ हजार रुपये.

ट्रेनर नाव :  डीयान पांडे
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेता बादशाह शाहरुख खान. अभिनेत्री बिपाशा बासू आणि लारा दत्ता.
फी : वार्षिक २२ हजार.

ट्रेनर नाव :  सिंडी जोर्डन
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री आणि मोडेल जेकलीन फर्नांडीस.
फी : १२ वर्गाचे १२ हजार रुपये.

ट्रेनर नाव :  राधिका कार्ले
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेत्री सोनम कपूर.
फी : प्रती महिना ५० हजार रुपये.

ट्रेनर नाव :  क्रिस गेथीन
ट्रेन केलेली प्रसिद्ध व्यक्ती : अभिनेता हृतिक रोशन.
फी : २० लाख प्रती महिना.

हो तुम्ही हि जी फी बघत आहात ते वास्तव आहे. माझे जे प्रसिद्ध विद्यार्थी आहेत त्यांना मी ५ ते २५ हजार चार्ज करतो आणि माझ्यापेक्षा जास्त फी घेणारे सुद्धा आहेत. तुम्ही कुठल्या आर्थिक स्तरावर आयुष्य जगत आहात ह्यावर अवलंबून आहे. दृष्टीकोन बदलला तर सर्वकाही बदलते व श्रीमंत आणि समृद्ध अनुभव यायला लागतात. कौशल्यापलीकडे जावे लागते.

जर उंच इमारत बांधायची असेल तर अंतरमनापासून काम करायला घ्या. तुमचे जितके अंतरमन खोल व मजबूत असेल तितक्याच उंच इमारती तुम्ही बांधू शकता. हो आणि किंमत हि मोजावी लागते, नुसती आर्थिक नाही तर सर्वकाही. जो ध्येयाशी एकनिष्ठ असतो तो कुठलीही किंमत मोजायला तयार असतो आणि तोच पुढे जातो.

धाडस असेल तरच पुढे या नाही तर सर्वसामान्य आयुष्य जगा. निसर्गाचा नियम एकच आहे कि काहीही करून तुम्ही जिवंत राहण्यासाठी धडपड केली पाहिजे मग उंच शिखरावर जगा नाहीतर पर्वताच्या पायथ्याशी.

जर तुम्हालाही व्यवसायिक आयुष्यात आर्थिक प्रगती करायची असेल तर आजच संपर्क करा. हा नियम खाजगी आयुष्यात देखील लागू होतो, खाजगी आयुष्यात देखील प्रगती करायची असेल तर आजच संपर्क कराल.



धन्यवाद
अश्विनीकुमार

चला उद्योजक घडवूया
Previous
Next Post »
0 आपले विचार