एकदा एक सिंह हा शिकार करण्यासाठी निघालेला असतो. सिंहाचे हे
नेहमीचेच काम असते. सहसा सिंहाला शिकार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते,
शिकार
सहसा भेटत नाही. पण आज जेव्हा सिंह शिकारीला निघतो तेव्हा एका ठिकाणी
प्रमाणापेक्षा जास्त शिकार त्याला आयती भेटते. तो नेहमीच्या सवयीप्रमाणे कृती
करतो. दबक्या पावलाने शिकारीच्या जवळ जातो. हरीणांच्या समूहाला पळायला जागा नसते.
सिंह हा हल्ला करतो व हरिणांना मारून टाकतो.
सिंह तिथेच ताव मारतो. आयती शिकार, जास्त प्रमाणात
अन्न उपलब्ध झाल्यामुळे तो दाबून खातो. सिंह पोट भरले असल्यामुळे तिथेच आराम करतो.
शिकार पकडण्यासाठी त्याला जास्त मानसिक आणि शारीरिक शक्ती खर्च न झाल्यामुळे
त्याला लगेच गाढ झोप लागते व सिंह झोपून जातो.
इतक्यात त्या सिंहावर जंगली कुत्र्यांचा समूह हल्ला करतो. इथे एक
नियम लक्ष्यात ठेवा, तुम्ही कितीही शक्तिशाली का असेना, तुम्ही जास्तीत
जास्त १० जणांना मारू शकता पण ५० १०० लोकांना नाही मारू शकत. इथे सिंहावर शिकारी
कुत्रे भारी पडले, सिंह जखमी झाला, रक्तबंबाळ झाला आणि शेवटी शिकारी
कुत्र्यांच्या समुहाने सिंहाची शिकार केली.
सिंहाला वाटले कि हरीणांचा समुह हा त्याचा शिकार होता पण इथे जंगली
कुत्र्यांच्या समुहाने सिंहाचा शिकार करायचे ठरवले होते म्हणून त्यांनी हरिणांना
त्या जागी ठेवले होते.
सिंह एकटा होता म्हणून हरला, जंगली कुत्र्यांनी एका सिंहाला समुहाने
मारले, जर एक एक जंगली कुत्रा गेला असता तर सिंहाने आरामात त्यांना मारले
असते. हे जे विचार आहेत ते बाजूला ठेवा, जो कमजोर असतो तो समुहात राहतो आणि
समुहातच शिकार करतो. जो विनाकारण धाडस दाखवायला जातो तो मरतोच. जंगली कुत्र्यांनी
समुहात शिकार केली ती योग्यच केली कारण त्यांना त्यांची मर्यादा हि माहिती होती.
आयुष्यात आणी जंगलात ध्येय असते ते म्हणजे जिवंत राहणे, जो
जिवंत राहिला तो जिंकला आणि जो मेला त्याचे अस्तित्व नष्ट झाले. जंगलात पुतळे उभे
करत नाहीत.
परिस्थिती कितीही कठीण असली तरी मन शांत ठेवून
कृती करा. संकटे, कठीण परिस्थिती तुम्हाला हरवत नाही तर तुमचे अंतर्मन तुम्हाला
हरवते.
आपले अनुभव इनबॉक्स, ईमेल किंवा व्हास्टएप
द्वारे शेअर कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन,
मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि उपचार उपलब्ध.
0 आपले विचार