महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१८ / १९ च्या अंदाजपत्रकानुसार ३.६७ लाख करोड ची आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हि भारतातील इतर राज्यांपेक्षा सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तुम्हाला फक्त मागणी आणि पुरवठा ह्यामधील तफावत ओळखून, स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून उद्योग, व्यवसाय सुरु करायचा आहे. २०१९ मधील सुरवात तुम्हाला २०२८ पर्यंत यशाच्या शिखरावर घेवून जाईल. इथे कौशल्यापेक्षा तुमच्या मानसिकतेची क्षमता कामी येईल. जितके तुम्ही मन अंतरमनाने स्थिर असाल तितक्या जास्त उद्योग व्यवसायाच्या संधी तुम्हाला दिसतील, मिळतील. विश्वास ठेवा आणि सतत कृती करताना मनात बोला कि "तुम्ही करू शकता". उद्योग, व्यवसाय आणि तुम्ही ह्यामध्ये कोणीही आले नाही पाहिजे. फक्त शहरांबद्दल बोलत आहे. आता प्रश्न आहे कि ३.६७ लाख करोड हे वाढत जातील त्यापैकी तुम्ही किती कमावणार? साधा नियम आहे कि तुम्ही नाही कमावले तर दुसरा कोणीतरी येवून कमावून जाणारच.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
ऑनलाईन, ऑफलाईन समुपदेशन, प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध
0 आपले विचार