प्रोस्ताहन देणारी वास्तव आयुष्यावर आधारित कथा
गरीबीचे बालपण ते ओरेकल कंपनीचा सहसंस्थापक लेरी इलीसन
इलीसन ह्याचा जन्म न्यू यॉर्क शहराच्या अतिपूर्व भागात झाला. तो बाळ असतानाच त्याला न्युमोनिया झाला होता, त्याची आई त्याची काळजी घ्यायला सक्षम नव्हती, संगोपनासाठी त्याला त्याच्या काका काकींकडे जे शिकागोच्या दक्षिणेकडे रहायचे तिथे पाठवून दिले. त्याने त्याच्या जन्मदात्या वडिलांना कधीच बघितले नव्हते आणि त्याला दत्तक घेतले आहे हे खूप वर्षांनंतर समजले होते.
१९७७ साली त्याने भागीदारासोबत सोफ्टवेअर डेव्हलपमेंट लेबेरोटरिज नावाची डाटाबेस मेनेजमेंट कंपनी सुरु केली त्यामध्ये तो सह संस्थापक होता. पुढे १९७९ साली कंपनीचे नाम बदलून रिलेशनल सोफ्टवेअर हे नाव ठेवले, पुढे हीच कंपनी ओरेकल म्हणून ओळखली जावू लागली.
आज ओरेकल चे वार्षिक उत्पन्न हे २५ अरब (२५, 00,00,00,00,000) रुपये इतके आहे. लेरी इलीसनची आजची संपत्ती हि ५२ हजार करोड रुपये (५२, 00,00,00,000) इतकी आहे. त्याच्या कडे ते सर्व आहे जे एका अब्जाधीश कडे असते जसे कि खाजगी विमाने, बोटी, अनेक बंगले आणि हवाईअन बेटामधील एक बेट सुद्धा त्याच्या मालकीचे आहे. त्याने सीइओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) चा पदभार २०१४ साली सोडला.
धन्यवाद
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार