अनेक वर्षांपूर्वी एक महान राजा राज्य करत होता, आणि त्याच्या राजवाड्याच्या बाहेर मुख्य दरवाज्यापाशी दोन भिकारी दररोज भिक मागत असत.
राजाचे त्या रस्त्याने दररोज येणे जाने होत होते, पहिला भिकारी म्हणायचा “आशीर्वाद आणि कृपा त्याला लाभो ज्याची मदत राजा करेल.” त्यानंतर दुसरा भिकारी म्हणायचा “आशीर्वाद आणि कृपा त्याला लाभो ज्याला देव मदत करेन.”
राजा पहिल्या भिकार्याचे शब्द ऐकून आनंदित व्हायचा.
एके रात्री राजाने विचार केला कि जो भिकारी स्तुती करतो त्याला बक्षीस द्यायचे; राजा आपल्या स्वयपाक्याला आदेश देतो कि एक मिठाई बनव, त्यामध्ये सोने असले पाहिजे आणि त्याच्या आजूबाजूने मिठाईचे आवरण असले पाहिजे.
दुसऱ्या दिवशी तो त्याच रस्त्याने चालला असताना ती मिठाई जो भिकारी स्तुती करतो त्याला देवून टाकतो.
पहिल्या भिकार्याला पैश्यांची खूप गरज असते म्हणून तो ती मिठाई दुसऱ्या भिकाऱ्याला खूप स्वस्तामध्ये विकून टाकतो.
जेव्हा दुसरा भिकारी खाण्यासाठी त्या मिठाईचे दोन भाग करतो तेव्हा त्याला सोने दिसते, तो ते सोने विकून श्रीमंत मनुष्य बनून जातो.
मग तो दुसऱ्याच दिवसांपासून राजाच्या राजवाड्याबाहेर भिक मागायला जाने बंद करून टाकतो.
जेव्हा राजा मिठाई दिलेल्या दुसऱ्याच दिवशी त्याच रस्त्याने चाललेला असतो तेव्हा त्याला पहिला भिकारी पैश्यांसाठी भिक मागताना दिसून येतो. राजा थांबून त्याला विचारतो कि मी दिलेली मिठाई तू खाल्लीस का?
पहिला भिकारी नाही म्हणून उत्तर देत सांगतो कि ती मिठाई जो कालपर्यंत माझा शेजारचा भिकारी होता त्याला विकली, आणि आज तो काही मला दिसला नाही.
राजा अत्यंत निराशाने मान हलवत मनातल्या मनात बोलत मान्य करतो कि खरच कृपा त्याच्यावरच होते ज्याला देव मदत करतो.
आपल्या देवाला सर्वकाही माहिती असते. तो कधीच तुम्हाला विसरत नाही. देव योग्य वेळी मदत करतो. देवावर विश्वास ठेवा. त्याची करणी तुम्हाला समजणार नाही. एखाद दिवशी तुम्हाला समृद्ध आयुष्य जगायचा आशीर्वाद तुम्हाला देवाकडून भेटेल व ते आयुष्य तुम्ही जगायला लागाल. विश्वास ठेवा.
*****तुमची आताची परिस्थिती कोणती आहे?****
राजा सारखी, किंवा दुसऱ्या भिकार्यासारखी?
कि
पहिल्या भिकार्यासारखी?
****जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर हा असेल तर तुमच्या आयुष्यात आकर्षणाचा सिद्धांत काम करत आहे, तो फक्त तुम्हाला आत्मविकासाद्वारे सतत टिकवून ठेवायचा आहे.****
****आणि जर दुसऱ्या प्र्षांचे उत्तर हा असेल तर तुम्हाला तातडीने आत्मविकासाची गरज आहे.****
(देवाच्या जागी तुमचा ज्यावर विश्वास आहे ते समजून वाचाल. तिथे अंतर्मन किंवा आकर्षणाचा सिद्धांतही वापरू शकता.)
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
0 आपले विचार