आपले अंतर्मन हे २४ तास जागे असते. ते कधीही झोपत नाही. तुमचे घोरणे जरी बंद असेल पण अंतर्मन हे जागेच असते.
टीव्ही सुरु असेल आणि आपण झोपले असू तरी आपले अंतर्मन हे झोपेमध्येही सतत माहिती मिळवत असते.
ते सगळे आवाज आपल्या अंतर्मनात रुजत असतात.
आणि जेव्हा तुम्ही उठतात किंवा जागे होतात तेव्हा तेव्हा तुम्ही ती वस्तू किंवा सेवा विकत घेतात जेव्हा तुम्ही झोपले होतात पण ज्याची जाहीरात हि टीव्ही वर सुरु होती.
हो. म्हणून तुम्ही ती वस्तू किंवा सेवा विकत घेतात ज्याच्या जाहिरातीचा दिवस आणि रात्र तुमच्यावर मारा सुरु असतो.
तुम्ही ती वस्तू आज जरी नाही घेतली तरी एक न एक दिवशी घेणारच.
जर तुम्ही लहानपणापासून आपल्या मुलांना सतत टीव्ही दाखवत असाल किंवा तुम्हाला ती सवय असेल तेव्हा तुमची लहान मुल हि एक मनुष्य म्हणून मोठ्यापनी नाही वावरणार, ती ग्राहक म्हणून वावरतील.
असे करून तुमच्या पिढ्या एकाच कंपनीचे उत्पादन किंवा सेवा विकत घेत जातील आणि तुमच्या पिढ्या ह्या अजाणतेपणे त्यांचे गुलाम होवून जातील.
कारण तुमच्या आई वडिलांनी जी उत्पादने किंवा सेवा वापरली होती त्याच सेवा आणि उत्पादने जवळपास तुम्ही आता वापरत असाल.
म्हणजे तुम्ही नाही म्हणत सुद्धा मानसिक गुलामासारखे वागत एकाच कंपनी किंवा सेवेचा लाखो किंवा करोडो रुपयांचा फायदा तर करूनच देतात त्यामध्ये अधिक भर म्हणून आपल्या मुलांनाही त्या उत्पादन किंवा सेवेचा गुलाम करत तुमच्या पिढ्या त्याच कंपनीचे उत्पादन मानसिक गुलामासारखे घेत जातात.
असेच तुम्हाला एखाद्या नेत्याची गुलामी करणारी पिढी, मालकाकडे नोकर म्हणून काम करणारी पिढी, पिढीजात व्यवसाय किंवा रोजगार करणारे अशी लोक दिसून येतील.
असेच तुम्हाला उच्च शिक्षित लोक आपल्या मालकांची गुलामी करतानाही दिसून येतील. त्यांची क्षमता कितीही प्रचंड असली तरीही ती गुलामीच करणार, फक्त फरक इकडे पैश्यांचा असतो, त्यांना पगाराच्या रुपात जास्त पैसा भेटत असतो.
जर कोणी व्यवसायिक किंवा उद्योगपती आला तर त्याचा उद्देश हा आपला नफा वाढवायचा असतो तेव्हा हेच मानसशास्त्राचे ज्ञान वापरले जाते आणि जेव्हा कोणी सामान्य नोकरदार मनुष्य येतो तेव्हा हेच ज्ञान तो स्वतःचे आर्थिक मनसिकतेच्या गुलामिमधून मुक्त होण्यासाठी आणि आपला आर्थक फायदा वापरण्यासाठी करतो.
आगीने आपणा जेवण बनवून कुणाची भूकही मिटवून त्याला जगवू शकतो आणि त्याच आगीने त्याचा जीवही घेवू शकतो.
क्षमता तुमच्यातही आहे गरज आहे ती जागृत करण्याची. आणि ह्याला पर्याय फक्त आणि फक्त आत्मविकासच आहे.
जागृत बना, ह्या मार्गांनी तुमच्या कडील समृद्धी हि तुम्ही समोरच्याला देत आहेत आणि त्याच्या पिढ्या ह्या समृद्ध आयुष्य जगत आहे.
धन्यवाद,
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
0 आपले विचार