अनाथ, गुंडगिरी ते २० हजार करोड चा व्यवसाय



जोह्न पौल डीजोरिया यांना श्रीमंत आणि यशस्वी होण्या अगोदर कार मध्ये राहवे लागत होते.
डीजोरिया ह्यांचे बालपण हे खूप खडतर होते. ते दोन वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला होता, त्यांना घर चालवण्यासाठी १० वर्षांचे होण्याच्या अगोदरच ख्रिसमस कार्ड आणि पेपर विकावे लागत होते. शेवटी नाईलाजाने डीजोरिया यांना लॉस एजेलीस येथील अनाथ आश्रमात पाठवण्यात आले.
सैनिकात भरती होण्याअगोदर ते गुंडांच्या टोळीतहि सहभागी होते. रेडकेन लेबोरेटरिज येथे कामच अनुभव घेतल्यानंतर ४७ हजार रुपये कर्जाऊ घेवून स्वतःची जोह्न पौल मिश्‍चेल सिस्टम्स नावाची कंपनी सुरु केली.
डीजोरिया स्वतः घरोघरी दारोदारी जावून आपले उत्पादन विकत होते, हे करत असताना त्यांना स्वतःच्याच गाडीमध्ये रहावे लागत होते. उत्पादनाचा दर्जा इतका चांगला होता कि कोणी नाकारू शकत नव्हते. आज जेपिएम सिस्टम्स ची उलाढाल हि २० हजार करोड (२,००,००,००,००,०००) इतकी आहे.
त्यांनी पेट्रोन टकीला नावाचा वोडकाचा ब्रांड निर्माण केला आहे आणि त्यासोबत हिरे ते मोबाईल फोन असे इतर विविध उद्योग हि त्यांचे आहेत.
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार