प्रोस्ताहन + मोफत = मानसिक गुलाम


मोफत या संकल्पनेवर माझा विश्वास नाही, ह्या मोफत शब्दांनी अनेक साधू संतांना, राजकारणी लोकांना, करोडपती बनवले आहे व त्यांचे ९८ % अनुयायी आहे तसे राहिले आहे. अधिक संशोधनासाठी, अमेरिका, युरोप व इतर जगप्रसिद्ध विद्यापीठातील झालेले संशोधन तुम्ही तपासू शकता. मोफत सेमिनार घेवून संभाषण कौशल्याचा वापर करून १०० पैकी २० लोक तयार होतात मग बाकीचे ८० त्यांचे काय?, ती माणसे नाहीत का? २ दिवस मोफत सेमिनार, ८ दिवस कार्यशाळा ह्यामध्ये त्या लोकांवरील लहापणापासून झालेले संस्कार, आलेले चांगले वाईट अनुभव हे संपूर्ण पने बदलू शकतात का? नाही. जे प्रयोग जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी केले आहे त्यामध्ये त्यांनी महत्वाचे सत्य सांगितली आहे "ज्या मुलावर गर्भापासून ते वयाच्या ७ वर्षांपर्यंत जसे संस्कार होतात तेच त्यांचे व्यक्तिमत्व व स्वभाव आयुष्यभरासाठी बनून जातो". जे पण कार्यशाळा करतात त्यामधील ९८ % आहे तसेच राहतात व २ % बदलतात. मला मानसिक गुलामांची फौज नाही बनवायची आहे, त्यासाठी शाळा आणि विद्यापीठे आहेतच, मला त्यांना मानसिक गुलामीतून मुक्त करून त्यांच्या आयुष्याच्या रथाची दोरी त्यांच्याच हातात द्यायची आहे. मला आशा आहे कि तुम्हाला समजले असेल. काहीही शंक असल्यास फोन कराल.

धन्यवाद
अश्विनीकुमार
Previous
Next Post »
0 आपले विचार