" भडकवणारे " आणि " भडकणारे "

तो एक तरूण...अत्यंत हुशार... सर्वांचा लाडका...

हा मुलगा एकदा पोलिसांनी पकडला, गाड्या फोडताना...
गेला तुरूंगात, लागली केस, वारी सुरू झाली कोर्टाची....

करिअर गेलं, वर्षे वाया गेलं, जामीन पण नाही, जवळ पैसे नाहीत, आयुष्यातुन उठला.....

का.....?????

का तर याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले...
आणि...हे घडले....

हे एक प्रातिनिधीक उदाहरण आहे.

पण लक्षात ठेवा...

आज जगात दोन प्रकारचे लोक आहेत...

दुसऱ्याला भडकवणारे आणि भडकणारे .....

भडकवणारे
दारू विक्रेत्याप्रमाणे द्वेष विकतात...

आणि...

भडकणारे दारूप्रमाणे द्वेष पितात...

दारूची नशा लगेच उतरते, पण, द्वेशाची नशा चढत राहते...

आणि...

एक दिवस ज्याप्रमाणे दारू विकणारा बंगले बांधतो...

आणि...

दारू पिणारा भिकारी होतो...

तसे भडकवणारे मोठे होतात

आणि...

भडकलेले, बरबाद होतात...

आज आपला तंबाखू सारखा वापर करून घेतला जातोय...

यासाठी...

शिवाजी महाराजांचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेतले जाते...

त्यांच्या नावाने भडकावले जाते...

ज्याने भडकावले, त्याचा मुलगा स्टडीरूममधे...

आणि...

जे भडकले ते कस्टडी रूममधे...

ज्यांनी भडकवले त्याचा मुलगा अभ्यास करतोय...
आणि...
जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतेय...

ज्यानी भडकवले त्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो...
आणि...
जे भडकले ते देशी प्यायला शिकतेय...

भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड ईग्लिश बोलतो,
आणि...
भडकणारा, बघून घेतो, तंगडंच काढतो, नादाला लागू नको, वावर गेलं तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतोय...

भडकवणारे
परदेशातून विमानाने भारतात येतात...
आणि....
भडकणारे...
शिवाजीनगर-
१० रूपये...१० रूपये
संभाजीनगर -
५रूपरे... ५रूपये...
बसा ना...
ह्या बाजूला ...
त्या बाजूला ...
गाडी भरली, की
लगेच निघणार ...
१० रूपये ... ५ रूपये ...

भडकवणारे
विमानतळावर उतरतात...
भडकणारे गर्दीत घोषणा देतात...
...आमके तमके आगे बढो...
हम तुम्हारे साथ है...
बजाव.....
वन्सं मोर...
ढिंगच्यांग ढिच्यांग....

भडकवणाऱ्यांचा पोरगा पंचतारांकित हाँटालात ऐटीत बसतो...
आणि...
भडकणारे तिथं वेटर असतात...

कुठे गेली लाज...
कुठे गेला आत्मसन्मान...
छञपती शिवाजी महाराजांचे
नांव घेता..
डॉ.बाबासाहेब आंबेडकराचे
नांव घेता..
पण स्वाभिमान माञ गहाण टाकलाय...
लाजाही वाटत नाही ...

अरे किती दिवस ...किती पिढ्यां....
आपल्या तरूणांना वाटत नाही कां...?
स्वतः काही तरी स्वाभिमान निर्माण करावा..
दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमधे आत्मविश्वास निर्माण करावा...
दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः मोठं व्हावे...
दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा, स्वतः चे रोपटे लावले तर ते मोठं झाड होतं...कधी कळणार आम्हाला हे...???

आज आमच्या पोरांचा केवळ वापर करून घेतला जातोय...
कुणाच्या तरी विरोधात..भांडण करण्यासाठी ...मारामारी करण्यासाठी...
कसा होणार आमचा भारत देश महासत्ता....२१व्या शतकात आहोत.

पण आमची पोरं काय करतायेत....
वाद घालणे, भांडण करणे, मारामारी करणे...

हीच गोष्ट मनाला खटकत होती....वाईट वाटत होते...तळमळ वाटत होती...पण सांगणार कुणाला...???

एकमेकांशी वाद लावतोय, वापर करून घेतोय, स्वतःच्या पक्ष, संघटना वाढवतोय....

भावांनो,

वाद घालण्यापेक्षा स्वतःशी जर संवाद साधला तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही...

आपल्याला भडकावणाऱ्यांनी कधी स्वतःच्या मुलाला, भावाला, गाड्या फोडायला, मारामारी करायला लावले का ?

का नाही लावत...???

अरे, विचार करा...

आणि...

तरीही जर तुम्ही भडकवणाऱ्या लोकांचं ऐकत असाल तर
तुमचं भविष्य अंधारात आहे...

विचार करा...

कुणाच ऐकून का बरबाद होता...???

या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या नोकरी, व्यावसाय, धंदा, शिक्षण, घर, संसार इ. कडे लक्ष द्या...

कोणी जर कुणा विरोधात भडकवले तर त्याला सांगा...

अगोदर स्वतःच्या मुलाला सांग...
त्याला गाड्या फोडायला लाव...

म्हणजे...

काम करायाला आम्ही आरामाला तुम्ही ...

बनवायला आम्ही खायला तुम्ही ....

रस्त्यावर आम्ही पेपरात तुम्ही ...

तुरूंगात आम्ही tv वर तुम्ही...

हे आता थांबले पाहीजे....

तरूणांनो

जागे व्हा....

दुसऱ्याला गुलाम म्हणणारे विचार करा...
आपण कुणाचे गुलाम नाही ना....???

आपला कुणी वापर करत नाही ना...???

विचार करा.

विचार पटले तर
मिञांना पाठवा.....!!!
धन्यवाद मंडळी

अश्विनीकुमार

आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार