महाभारतातील अभिमन्यू, गर्भ संस्कार, अनुवांशिकता आणि कौटुंबिक संस्कार भाग १



उद्योजक, व्यवसायिक, नोकरदार आणि इतर सामान्य लोक ह्यांनी आवर्जून वाचा आणि समजून घ्या हा लेख. कमी वयात यशस्वी होण्याचे रहस्य हि तुम्हाला समजेल, आणि ह्यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करून सिद्ध हि केले आहे.
अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा हिचा मुलगा. अतिशय शूरवीर. १६ व्या वर्षांपर्यंत अर्जुनाने एक चांगला पिता व्हायचे निभावले होते, अर्जुनाने वडिलांकडून द्याचे संस्कार जसे धनुर्विद्या आणि इतर शस्त्र चालवायचे शिकवले होते. प्रत्येक वडिलांनी शिकण्यासारखे.
जेव्हा गर्भ पोटात वाढत असतो तेव्हा तो संपूर्ण आई वर अवलंबून असतो. खाणे पिणे, ऐकणे, बघणे, अनुभवणे ह्यामार्फत गर्भातच त्याचे शिक्षण सुरु होते. जे कायमस्वरूपी त्याला स्वभाव देऊन जातो जे कोणीही बदलू शकत नाही, अपवाद फक्त १ टक्का लोक.
अभिमन्यू जेव्हा गर्भात होता तेव्हा अर्जुन सुभद्राला कौरवांचे युद्ध कौशल्याचा एक भाग चक्रव्युव्ह कसे भेदायचे हे सविस्तर सांगत होता. आणि आईच्या मार्गे गर्भ शिकत जातो त्यामुळे अभिमन्यू हि शकत होता. अर्जुनाने चक्रव्युव्ह भेदून आत कसा प्रवेश करायचा हे पूर्ण सांगून झाल्यावर सुभद्राला झोप आली आणि ती त्या चक्रव्युव्हा मधून बाहेर कसे पडायचे हे ऐकू शकली नाही.
गर्भ हा संपूर्ण पणे आई वर अवलंबून असल्यामुळे आई झोपल्यामुळे गर्भातील अभिमन्यू हि चक्रव्युव्हा मधून बाहेर कसे पडायचे हे ऐकू शकला नाही, ह्यामुईल तो अर्धवटच शिकू शकला. आणि नंतर मोठे झाल्यावर त्याला अर्जुन, श्रीकृष्ण ह्यांना वेळ भेटला नाही.
हे इथपर्यंत ठीक होते, पण ह्याचे परिणाम भयंकर झाले. ज्यांच्या मुलांनी परिणाम भोगले असतील किंवा भोगत असतील त्यांनी त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावी. आणि उद्योजक व्यवसायिक, गुंतवणूकदारांनीही समजून घ्यावी. अर्धवट शिक्षण नेहमीच घात करते. आता परिणामासाठी पुढे वाचा.
जेव्हा कौरव पांडवांचे युद्ध सुरु होते तेव्हा कौरवांनी त्यांचे अभेद्य चक्रव्युव्ह रचले जे फक्त अर्जुन आणि कृष्णाला येत होते. अर्जुन आणि त्याचा सारथी कृष्ण हे दोघेही रणांगनापासून लांब लढाईत व्यस्त होते आणि ह्या कौरवांच्या चक्रव्युव्हामुळे पांडवांच्या सैन्याचे खूप नुकसान होत होते. हे बघून अभिमन्यू युधिष्ठीर ला चक्रव्यूव्ह भेदण्यासाठी परवानगी मागतो पण युधिष्ठीर सुरवातीला परवानगी देत नाही, सैन्याचे होणारे नुकसान आणि अभिमन्यूच्या हट्टामुळे त्याला परवानगी द्यावी लागते.
अभिमन्यू चक्रव्युव्ह भेदण्यास यशस्वी ठरला कारण त्याने आईच्या गर्भातच ह्याचे शिक्षण घेतले होते पण चक्रव्युव्हा बाहेर निघायचे शिक्षण तो मोठे झाल्यानंतरही घेवू शकला नाही आणि ह्यामुळे तो चक्रव्युहामध्ये अडकून पडला. शेवटी त्याचा अंत हा जयद्रथाच्या हातून झाला.
लहान मुल यांची शिकण्याची सुरवात हि गर्भापासून होते, त्यानंतर ते आई वडिलांची बघून ऐकून शिकतात, त्यानंतर ते कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक आणि ज्या समुहात राहतात त्यापासून शिकतात. चांगले संस्कार चांगला मनुष्य घडवते आणि वाईट संस्कार हे वाईट मनुष्य घडवते.
उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहार करताना अर्धवट ज्ञानासोबत कृती हि कधीही प्रचंड नुकसानीचे परिणाम घेवून येते, त्यापेक्षा ती कृती न केलेली बरी.
आयुष्यामधील उद्योग, व्यवसाय, गुंतवणूक, खाजगी आयुष्य ह्यामधील चक्रव्युव्ह तुम्ही आरामत भेदू शकता, ह्यामध्ये कृष्णाचा रोल हा नेहमी आत्मविकास प्रशिक्षक करत असतो. तज्ञांचे फायदे हे ह्याच लेखातील पुढील भागात स्पष्ट करेन.
(कृपया हा लेख कुठल्या विशिष्ट धर्माच्या दृष्टीकोनातून बघू नका, आप आपल्या विश्वासानुसार वरील लेखामधील नावे हि आप आपल्या विश्वासानुसार बदलून वाचाल, सर्वात महत्वाचा आशय आहे.)
धन्यवाद
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार