प्रत्येक जन आपआपल्या परिस्थितीनुसार इतिहास, वर्तमान आणि भविष्यात लिहून ठेवत असतो. जगामध्ये हा नियम सारखाच आहे.
मला नाही माहित कि मनुष्य प्राणी कधी पासून भेदभाव करायला लागला, पण इतके माहित आहे कि श्रीमन, मध्यमवर्ग, गरीब आणि अति गरीब हे पुरातन काळाच्या ग्रंथामध्येहि उल्लेख केलेला आढळतो.
मुंबई मध्ये ढोबळ मानाने मनुष्य प्राण्याचे वर्गीकरण केल्यास गर्भ श्रीमंत, श्रीमंत, उच्च मध्यम वर्ग, मध्यमवर्ग, गरीब आणि अति गरीब असे आढळून येते. वरील तीन वर्ग जिथेही जातील तिथे ते त्यांच्याच वर्गाशी मिळत्या जुळत्या लोकांमध्ये उठणे बसने करतील.
परदेशातून येणारा प्रवासी हा जर श्रीमंत असेल तर तो मुंबई ला आल्यावर ताज, ओबेरॉय अश्या सप्त आणि पंचतारांकित हॉटेल मध्येच थांबेल. त्याचा घरापासून ते हॉटेल पर्यंतचा प्रवास हा सुखकारकच असेल.
तोच प्रवास हा जस जसे तुम्ही खाली याल तस तसे बदलत जाईल आणि थोडा थोडा त्रास दायक होत जाईल. आणि जर ह्या वर्गांपैकी जो कोणी लेखक असेल तो लिहिताना त्या त्या पद्धतीच्या अनुभवाप्रमाणे लीहीत जाईल.
वर्तमानच इतिहास आणि भविष्य बनत असतो. मला जर कोणी बोलले कि इतिहासात सोन्याचा धूर निघत होता आणि भविष्यात सोन्याचा धूर निघणार आहे तर त्याला बोलतो कि मला त्याच्याशी काही देणे घेणे नाही आहे, आता दाखव, मी जिवंत असे पर्यंत मला बघायचा आहे, जर नाही दाखवू शकत तर सांगायची काही गरज नाही.
अश्या अतिरेकी वक्तव्य करणाऱ्या लोकांपासून लांब रहा, स्वर्ग आणि नर्क इकडेच ह्याच क्षणात आहे, तो आप आपल्या दृष्टीकोनात आहे. तुम्ही ह्या क्षणाला जसे आयुष्य जगत आहात तेच तुमचे वास्तव आहे. आणि हे वास्तव बदलायला तुम्हाला हाच क्षण आहे.
वेळ हे सतत चालणारे चक्र आहे, जो योग्य वळणावर वळवून परत आपल्या ध्येयाच्या स्वप्नाच्या दिशेने नेतो त्याला ते प्राप्त होते. जो नाही नेत त्याला हे चक्र भरडून टाकते. कोणीही अमरत्व घेवून आलेले नाही हे इतिहासात मोठ्या लोकांच्या उदाहरणावरून दिसून येईल. नाहीतर ते वर्तमानात आपल्या सोबत असले असते.
श्रीमंत - गरीब, सभ्य - असभ्य, चोर, डाकू - पोलीस, राजा - रंक, मित्र - शत्रू, चांगले - वाईट, रोगी निरोगी हे सर्व वर्णन इतिहासापासून ते वर्तमानापर्यंत आहे आणि भविष्यातही ते राहणार आहे.
मी समोर येणाऱ्या मग तो स्त्री असो किंवा पुरुष ह्याला मनुष्य प्राण्याच्याच नजरेने बघतो. बाकी भेदभाव हे समाजात जरी असतील तरी माझ्या आयुष्यात नाही आहे. आम्हाला निसर्गानेच (आपला आपला विश्वास जो असेल त्याने) निर्माण केले आहे. आमच्या नैसर्गिक भावनिक आणि शारीरिक गरजा एकसारख्याच आहे.
जर आयुष्य पूर्ण जगायचे असेल तर वर्तमानातच जगा. जर वर्तमानात तुम्ही तुमचे लक्ष्य विचलित केले तर इतिहास तर जाऊ द्याच पण संपूर्ण भविष्य हे अंधकारमय करून टाकाल.
मी जे आता सांगितले आहे त्याला अनुभवाशिवाय पर्याय नाही. अनुभव मनुष्याला हुशार बनवतो. विना अनुभवी मनुष्य हा त्याच्या बोलण्यावरूनच ओळखून येतो.
लक्ष्य फक्त वर्तमान काळावर आणि आपल्या ध्येय, स्वप्नांवर ठेवा.
धन्यवाद
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार