एका शाळकरी मुलाला शाळेतील बाईनी एक चिट्ठी दिली आणि सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे.मुलगा धावत धावत घरी आला आणि ती चिट्ठीआई जवळ दिली.आई ने ती चिट्ठी पहिली मात्र आणि त्या मुलासमोर ती वाचून दाखवली. त्यातील मजकूर असा होता
"प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. "
कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत.एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली .तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती.ती पाहताच तो ढसा ढसा रडायला लागला.
त्यातील मजकूर असा होता " प्रिय पालक आपला मुलगा मतीमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अश्या मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठू नये. त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्यावा"त्याला कळून चुकल त्याच्या आई ने ते पत्र खोट वाचून दाखवील होत.
हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्ख जग प्रकाशमय करून टाकल.काय म्हणाव अश्या मातेला जीने एका मतीमंद मुलातून एक शास्त्रज्ञ घडविला. ही किमया फक्त सुजान पालकच करू शकतात.
जो पर्यंत तुमचा विश्वास अटळ असतो तो पर्यंत तुम्ही पाहिजे ते करू शकता. विश्वास मोडण्याची पहिली सुरवात हि घरापासून होते आणि बाहेरच्यापेक्षा घरच्यांनी मोडलेला विश्वास हा संपूर्ण आयुष्य उध्वस्त करून टाकतो.
कुठलाही मुलगा हा जन्मजात ज्ञान घेवून येत नाही. तो पहिले आई वडिलांचे बघून शिकतो. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, नातेवाईक, मित्र मंडळी, परिस्थिती आणि समाज ह्याप्सून शिकतो. ह्यानंतरच शाळा, शब्द वाचून शिकवून तो घडत जातो.
तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबतच रहा, उठणे बसने करा, जर नसतील तर एकटेही रहा पण मध्ये मध्ये पैसे खर्च करून तज्ञांची मदत घेत जा, ह्यामुळे तुम्ही सतत सकारात्मक रहाल आणि आपल्या स्वप्नांचे आयुष्य जगण्याच्या दिशेने प्रवास कराल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार