वय वर्ष १३ कारकीर्द ला सुरवात "जयललिता" "अम्मा"
वय वर्ष १६ कारकीर्द ला सुरवात "सचिन तेंडूलकर"
वय वर्ष ११ कारकीर्द ला सुरवात "वारेन बफेट"
तुम्ही जो पर्यंत शाळेच्या आणि घराच्या चार भिंतीच्या जगात कैद असाल तर खऱ्या किंवा वास्तव आयुष्याशी आपला सामना झाला नसेल. जीवनाच्या भाषेत तुम्ही बालिश आहात असे समजू मग भले तुम्ही पुस्तकी ज्ञानात, घरात आणि शाळेत कितीही हुशार असो, त्याचा काहीही फायदा नाही.
आयुष्य जगायला उशिरा सुरवात करणे हे निसर्ग नियमाविरुद्ध आहे. निसर्गाने निर्माण केलेले सर्व प्राणीमात्र हे आप आपल्या मुलांच्या हात पायात आणि पंखात बळ आले कि ते त्यांना आपले पोट भरायला आणि रक्षण करायला शिकवतात, पण मनुष्य प्राणी हा अनेक वर्षे फक्त आणि फक्त चार भिंतीमधील फक्त बौद्धिक शिक्षणावर जोर देतो ज्यामुळे जी नैसर्गिक उर्जा असते नव नवीन शिकण्याची ती चार भिंतीमध्ये मरून जाते.
आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांची अवस्था अशी असते कि वाघाला आयुष्यभर पिंजर्यात ठेवले, शिकार न शिकवता खाऊ पिऊ घातले आणि मोठे झाल्यावर अचानक जंगलात सोडून दिले. मग दुसर्या दिवशी त्या वाघाची कोळे आणि कुत्र्यांनी शिकार केली.
ह्याला अपवाद अनेक आहेत. ते तुमच्या नजरेआड असतात किंवा तुम्हीच दुर्लक्ष केलेले असते. मी शाळेत असताना माझा मित्र एका कंपनीमध्ये सेल्समन चे काम करत होता, त्यावेळेसच त्याच्याकडे गाडी, मोबाईल बँक अकाऊंट हे सर्व होते. शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच तो पुर्ण पणे घर वगैरे घेवून सेटल झाला होता.
जसे बाहेरच्या जगात पाउल ठेवले तसेच अनेक उदाहरणे प्रत्यक्षात भेटू लागली जी शाळेपासून पैसे कमावण्यासाठी धडपड करत होती. काहींचे पारंपारिक किंवा वडिलोपार्जित व्यवसाय होते तर काहींनी स्वतः उद्योग व्यवसाय हा उभा केला होता. काही चांगल्या मार्गाने पैसे कमवत होते तर काही वाम मार्गाने. पण ह्या सगळ्यांमध्ये एक स्वभाव समान दिसला कि कितीही पैसे असले तरी त्यांचे पाय हे जमिनीवर होते. माणुसकीची जान होती. मदतीला तयार असत. हेच गुण खूप कमी प्रमाणात किंवा अतिशय नगण्य शिक्षित आणि उच्च शिक्षित लोकांमध्ये आढळले.
वारेन बफेट ने गुंतवणुकीसाठी वयाच्या ११ वय वर्षांपासून सुरवात केली तर जय ललिता ने वयाच्या १३ वर्षांपासून. आज हे दोघेही प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे लोकांपर्यंत माहिती पोहचली, पण असे अनेक जगभरातून लहान मुल मुली आहेत कि ज्यांनी लाखो आणि करोडोमध्ये पैसे कमवायला सुरवात केली होती, करत आहेत आणि राहणारच.
सचिन तेंडूलकर ह्याचेही उदाहरण तुम्ही घेवू शकता. हि माणसे तुम्हाला फक्त नैसर्गिक दृष्टीकोन असेल तरच दिसतील किंवा तुमच्या आयुष्यात असतील, नाहीतर तार्किक दृष्टीकोन हा तुम्हाला जे पाहिजे तेच दाखवत राहील, भले हि लोक तुम्हाला भेटून गेली किंवा तुमच्या आयुष्यात आली तुम्हाला त्यांच्या क्षमतेबद्दल समजणार नाही.
जे वयस्करांना जमत नाही त्याही पेक्षा जास्त चांगले नातेसंबंध हि लोक सांभाळत असतात. त्यांचा दृष्टीकोन उद्दात्त झालेला असतो. मोडेलिंग क्षेत्रात अनेक मुली ज्या १२ वर्षे वयापासून स्पर्धेला उतरलेल्या असतात आणि ह्यांची स्पर्धा अनेक वेळेस हि वयस्कर मोडेल्स सोबत असते, असेच मुलांचे देखील आहे.
इथे मुलगा मुलगी हा भेद नाही चालत, परिस्थिती आणि गरज आणि ह्यांना असलेला प्रत्यक्ष अनुभव जो जगप्रसिद्ध बिझनेस मेनेजमेंट च्या विद्यापीठातहि नाही भेटत तो ह्यांच्याकडे असतो. मी स्वतः अश्या मुल आणि मुलींसोबत काम केले आहे जे माझ्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी निगडीत होते.
जीवनाच्या शाळेत तुमची पदवी तपासली आजत नाही, तिथे लागते कौशल्य, धाडस आणि वर्तमान काळात निर्णय घेण्याची क्षमता जी फक्त अनुभवानेच येते. आयुष्याच्या शाळेत कोणीही लहान मोठे नसते तर सर्वांना एकच अट लागते ती जिवंत राहण्याची.
कमी वयात आयुष्य सुरु केलेल्या लहान मुला मुलींनी जगाची, समाजाची काळी बाजू बघितली असते त्यामुळे तर चांगलेच तयार झालेले असतात. त्यांना खरे आयुष्य काय आहे ते माहित असते. त्यांना माहित आहे कि आपण अपयशी आहोत तर कोणीच विचारणार नाही आणि यशस्वी झालो जर जग डोक्यावर घेईल.
कमी वयात आयुष्य जगायला सुरवात केलेल्या मुला मुलींना जग कधीच गुलाम बनू शकत नाही. त्यांनी काळानुसार बदलायचा गुणधर्म हा स्वीकारलेला असतो. ह्यांची लग्नेही लवकर होतात आणि ते लग्नाच्या खूप आधीच सेटल झालेले असतात.
जय ललिता ची सुरवात हि कुठून झाली आणि ती कुठच्या यशाच्या शिखरापर्यंत पोहचली. तिने राज्यावर राज्य केले नाही तर तिथल्या जनतेच्या हृदयावर राज्य केले. इतके तर सख्या आई वडिलांना पण जमत नाही मुलांच्या हृदयावर राज्य करणे.
पावसाळी ढग काही सूर्याला झाकू शकत नाही. तसेच तुमचा मर्यादित दृष्टीकोन हा मनुष्याला प्रगतीपासून रोखू शकत नाही. आपला दृष्टीकोन वाढवा. घराबाहेरही जग आहे जे तुमची वाट बघत आहे.
धन्यवाद
अश्विनीकुमार
बालक, पालक, संगोपन आणि कुटुंब
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार