संस्कार आणि शिक्षण ह्यामधील फरक, समज आणि गैरसमज
संस्कार : आईच्या गर्भापासून सुरु होते.
शिक्षण : ५ वर्षांनंतर आणि आता २ वर्षांनंतर सुरु होते.
संस्कार : नवजात शिशु आई वडील आणि परिवारातील इतर सदस्यांकडून बघत ऐकत किंवा ते शिकवतील तसे शिकत जातो.
शिक्षण : शाळा, शिक्षक आणि सोबतचे विद्यार्थी शिकवतात.
संस्कार : शरीरातील पेशींपर्यंत खोलवर रुजतात.
शिक्षण : मेंदूमध्ये थोडेफार प्रमाणात रुजते.
संस्कार : आई, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्य जबाबदर असतात.
शिक्षण : शाळा जबाबदार असते.
संस्कार : आत्मविश्वास निर्माण करतो.
शिक्षण : विश्वासाचे भ्रम निर्माण करते.
संस्कार : सज्जन दुर्जन मनुष्य घडवते. जबाबदारी घर परिवाराची.
शिक्षण : सज्जन दुर्जन दोघांना घडवते. जबाबदारी त्या व्यक्तीचीच किंवा त्याच्या घर परिवाराची.
संस्कार : सर्वांचा आदर, सन्मान करायला शिकवते.
शिक्षण : पदवी, पद आणि वयानुसार आदर करायला शिकवते.
संस्कार : मुलांना जे आवडते ते करायला पूर्ण संधी दिली जाते किंवा करून घेतले जाते.
शिक्षण : विषय समजो वा न समजो, आवडो वा न आवडो, जबरदस्ती ने वेळ प्रसंगी मारून शिकवले जाते.
संस्कार : स्वभाव घडवते.
शिक्षण : समाज, सरकार ला जसा पाहिजे तसा व्यक्ती घडवला जातो, उद्योग व्यवसायांसाठी नोकरदार निर्माण केले जातात.
संस्कार : नैसर्गिक असतो
शिक्षण : अनैसर्गिक असते.
संस्कार : मुक्त जगायला शिकवते
शिक्षण : दुसर्यांचे गुलाम बनायला शिकवते
धन्यवाद
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
बालक, पालक आणि कुटुंब
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार