जे तज्ञ असतात त्यांचा पुरेपूर वापर करून घेतला जातो. कच्चे तेल आणि उर्जा ह्या क्षेत्रातील मोठ्या उद्योजकांनी आणि भांडवलदारानी पर्यावरणवादि तज्ञ, ज्यामध्ये उच्च शिक्षित संशोधक पण येतात ह्यांना विकत घेवून सतत टीव्ही वृत्तपत्र ह्यामध्ये त्यांचे लेख, वादविवाद हे त्यांच्या उत्पादनापासून पर्यावरणाला काही धोका नाही असे सांगत होते.
सामान्य लोक अश्या तज्ञांवर विश्वास ठेवणारच. कारण सामान्य लोक स्वतःच्या मेंदूने कधीच विचार करत नाही किंवा त्यांना तितका वेळच दिला नसतो. पण आता परिस्थिती अशी आली कि मालदीव सारखे व्हीनस सारखे शहर बुडू लागली आहेत ह्यावरून प्रदुषणाचा किती भयंकर प्रभाव झाला आहे हे समजून येत आहे.
समाजशास्त्राचे तज्ञ सुद्धा दोन्ही कामासाठी वापरत होते. त्यांना फक्त सामान्यांना भूल देत ठेवायचे होते आणि त्यामधून आपला उद्योग व्यवसाय हा वाढवायचा होता. हेच उद्योजक आपले उत्पादन एके ४७ तस्करीच्या मार्गाने अतेरीक्यांना विकायचे आणि हेच उद्योजक आपले उत्पादन कायदेशीर कराराद्वारे एखाद्या देशाच्या सैन्याला देखील विकायचे.
ह्याच तज्ञांचा वापर हा ढालीसारखा करतात. जर एखादी योजना किंवा करार करायचा असेल तेव्हा ह्यांना पुढे करून आपले काम करून घेतले जाते पण ह्या तज्ञांना वाटते कि आपले ऐकून त्यांनी हा निर्णय घेतला आहे पन वास्तवात असे नसते.
ते ह्यासाठी करतात कि जे आपण करतो ते फसले तर ह्याची सर्व जबाबदारी हि त्या तज्ञांवर येईल आणि मुख्य सूत्रधार हा आरामात बाजूला होईल. अश्या जगभरात आणि भारतातही अनेक घटना झालेल्या आहेत पण सामान्य माणसांना ते समजून येत नाही. त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेच्या पलीकडे असते.
सामान्य मनुष्य हा फक्त भावनेवर चालतो. त्याला प्रत्येक वेळेस एक कोण न कोणतरी नेता लागत असतो कारण तो मानसिक दृष्ट्या अपंग असतो. तो फक्त जाती धर्माच्या गर्दीमध्ये स्वतःला सुरक्षित मानतो.
भांडवलदार, राजकारणी ह्यांना हे सामन्यांचे मानसशास्त्र उत्तम माहित असल्यामुळे ते सतत राज्य करत असतात. त्यांना माहित आहे कि त्यांची आताची पिढी आणि पुढील सात पिढ्या आरामत सामन्यांवर राज्य करतील.
म्हणून तुम्हाला जिथे तिथे दिसेल कि मोठ मोठे नेते जेवढे भांडत नाही त्यापेक्षा कितरी त्वेषाने कार्यकर्ते भांडत असतात. नेत्यांवर जे गुन्हे लागतात त्या प्रत्येक गुन्हाला राजकीय गुन्हे म्हंटले जाते ज्यामुळे त्यांच्या कारकीर्द वर काहीही फरक पडत नाही आणि कार्यकर्ते जे गरीब, मध्यवर्गीय घरातून येतात त्यांच्यावर इंडियन पिनल कोड द्वारे गुन्हे दाखल केला जातात.
तुम्हाला आयुष्य एकच भेटले आहे ते असे दुसर्यांसाठी वाया घालवायचे कि हुशार बनून आलेली परिस्थिती बदलवत आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे? निर्णय तुमचा.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार