अमली पदार्थाच्या नशेच्या अधीन, बेघर ते करोडपती बनण्यापर्यंतचा प्रवास


खलील रफाती
बालपणात लैंगिक शोषणाच्या अत्याचाराला बळी पडला होता.
१३ वर्षांपूर्वी बेघर आणि अमली पदार्थांच्या आहारी गेला होता.
नशेची सुरवात हि गांजापासून झाली, त्यानंतर वाढत वाढत ती एक्सटसी, केटामाइन आणि शेवटी हेरोईन ह्या अमली पदार्थांपर्यंत मजल गेली.
तो ह्या अमली पदार्थ विकण्याचा व्यवसायदेखील करत होता.
रफाती ह्या अमली पदार्थांच्या नशेच्या चक्रव्युहात अडकत गेला. २००१ साली जेव्हा त्याने जाणीवपूर्वक हेरोईन ची जास्त प्रमाणात मात्रा घेतली ज्यामुळे त्याचे प्राण जाणार होते, पण पैरामेडिक (नर्स) च्या प्रयत्नांमुळे त्याचा जीव वाचला.
त्याच्याच पुढील वर्षी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता, त्यामधून तो थोडक्यात बचावला होता. त्यावेळेसही तो अमली पदार्थाचे व्यसन करत बसला होता.
२००३ मध्ये रफातीने अपयशांचा तळ गाठला होता. अजून खाली जाण्यासारखे काहीच नव्हते.
नंतर त्याने संपूर्ण वेळ हा आरोग्यासाठी दिला. त्याचे आयुष्य त्या क्षणी बदलले जेव्हा त्याच्या मित्राने ज्यूस आणि सुपरफूड बद्दल माहिती दिली.
ह्याचा परिणाम लक्षणीय आणि कमी कालावधीत आला होता.
२००७ साली मैलाबू मध्ये त्याने सुरु केलेल्या रीविरीया रिकव्हरी सेंटर रुग्ण आणि कर्मचार्यांसाठी ड्रिंक बनवायला सुरवात केली.
त्याने स्मूथी तयार केली त्यामध्ये खजूर आणि केळे हे पदार्थ होते. ह्या स्मूथीला त्याने वोल्व्हरीन हे नाव दिले कारण ह्यामुळे आरोग्य सुधारायला आणि ताकद वाढायला मदत होत होती.
रीवेरीया मधील रुग्णांमध्ये प्रसिध्द असलेली स्मूथी हि हळू हळू नैरोबी मध्ये लोकप्रिय व्हायला लागली. शहराबाहेरील लोकही रीविया रिकव्हरी मध्ये माझी स्मूथी प्यायला येवू लागले.
येणारी लोक हि काही अमली पदार्थ व्यसनांच्या अधिनही नव्हते तरीही ते माझी स्मूथी प्यायला येत होते.
आता रफाती ने ठरवले कि स्वतःचे ज्यूस सेंटर सुरु करायला हवे.
त्याने त्याचे ५०,००० डॉलर (३४,००,०००, चौतीस लाख) हे सोन्याच्या शिक्क्यांच्या रुपात ठेवले होते व उरलेली रक्कम हि एका व्यावसायिक जुगारी कडून उभी केली.
त्याने त्याचे दुकान साधेच ठेवले आणि उद्दिष्ट होते, प्रेम, बरे होणे आणि प्रोस्ताहन. हेच ३ शब्द त्याच्या टीशर्ट आणि जेकेट वर लिहून आहे. जे तुम्हाला तिथून विकतही घेता येतील.
दुकानाचे नाव सनलाइफ ओर्गेनिक ब्रांड ठेवले, त्यामध्ये ३२ प्रकारचे ज्यूस, प्रोटीन शेक, स्मूथी, प्लस अकाई बॉल्स, कॉफी, संड्यें आणि फ्रोझन योगहरट विकतो.
त्याच्या ज्यूस आणि इतर प्येयांमध्ये आरोग्यदाई आणि शरीराला पोषक असेच घटक तो वापरतो.
तो कर्मचारी म्हणून अश्या लोकांना घेतो ज्यांना खरच त्याची गरज आहे. केचे केलो सारखा त्याचा रुग्ण आणि गिर्हाईक जो अमली पदार्थांच्या अधीन होता तो सांगतो कि त्याने माझ्यावर खूप मेहनत घेतली आणि मला मेहनत घ्यायलाही लावली. तो जनी असलेल्या वडीलांसारखा आहे.
त्याचे ग्राहक हे प्रसिध्द व्यक्तिमत्व एलीझाबेत टेलर, गन्स एंड रोझेस गीटारिस्ट स्लाश आणि एकेडमी अवार्ड विनिंग कलाकार जेफ्फ ब्रिजेस हे आहेत.
भूतकाळ कितीही कठीण असू द्यात,
तुम्ही कधीही नवीन सुरवात करू शकता.
बुद्ध
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार