एक कंपनी, करोडोंचा मुनाफा हे यश तुम्हाला दिसते आणि त्यापाठी काय दडलेले आहे हे नाही दिसत. समजा एका शहरात किंवा औद्योगिक वसाहतीत ५,००,००० आकड्यात पाच लाख कामगार आहेत, त्यापैकी ९०० नऊशे हे कायमस्वरूपी आहेत. उरलेले ४,९९,१०० हे कंत्राटी कामगार आहेत. त्यामध्ये कंत्राटदारांची संख्या हि हजारांच्या घरात.
हेच कंत्राटदार २५,००० पंचवीस हजारांच्या पगाराच्या पावत्यांवर सही घेणार आणि देणार जे काही सरकारने कमीत कमी जे ठरवून दिले आहे तेवढेच ते हातात देतात. ७,००० सात हजार समजू. हाच पगार आताच्या कामगारांना भेटतो आणि बाकी कंत्राटदारांच्या खिश्यात जवळपास १८,००० अठरा हजार रुपये. आणि कंपनीच्या खिश्यात करोडो रुपयांचा मुनाफा.
एक भारताच्या जमिनीवर बनणारे मोठे बांधकाम, त्याचे कंत्राट निघते. जवळपास ७५ टक्क्यांपेक्षा जास्त काम हे खाजगी कंपनीला देण्यात येते. आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी सरकारची भागेदारी असते. म्हणजे कामांची संख्या खाजगी मध्ये जास्त आणि त्यामध्येही कंत्राटदार.
कधीकाळी कामगारांना पगार आणि आदर खूप होता, पण काळानुसार कामगार ज्यांच्यामुळे संपूर्ण कंपनी चालायची आणि उत्पादने बनवायचे आता त्यांची गणना हि श्रमिक मध्ये व्हायला लागली आणि व्यवस्थापन विक्री विभाग जिथे श्रमापेक्षा मेंदूचा वापर जास्त होतो अश्यांना पगार जास्त मिळायला लागला.
आता तर हि तफावत प्रचंड आहे. ज्या कामगारांमुळे कंपनी चालायची आता त्यांना कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात येते व पगार तर अतिशय तुटपुंजा देतात, अनेक वर्षे तर त्यांना कायमस्वरूपी पण केले जात नाही.
ह्यावर अधिक माहिती तुम्हाला डाव्या चळवळीतील लोकांकडून भेटेल. आणि मुंबई सारख्या ठिकाणीही असे घोटाळे चालू असतात.
आपल्या भारतात नोकऱ्यांची कमी नाही. थोडा अभ्यास केला तर तुम्हाला अजून पक्की माहिती भेटेल. इंटरनेट वर सर्वच खरे पोस्ट करत नाही. त्यामुळे आपआपला मेंदू वापरलेला बरा.
एकदा का तुम्ही विचार करायचे सोडून दिले तर दुसरा तुमच्या अगोदर मेंदूचा ताबा घेतो आणि मग शरीराचा. कायद्यानुसार ८ तास कामाचे आहे पण अनेक कामगार हे त्यापलीकडे काम करत जातात, किंवा त्यांना करावेच लागते.
शोषण फक्त अशिक्षित आणि कमी शिक्षित कामगारांचे नाही होत तर उच्च शिक्षित अधिकाऱ्यांचे पण होते.
आपण प्रत्येकाला मानसिक गुलामीतून मुक्त करू शकत नाही, ज्याने मनापासून ठरवले तोच मानसिक गुलामीतून मुक्त होऊ शकतो. आणि आताच्या कंपन्या ह्या कामगारांचे मानसिक आणि शारीरिक उर्जा हि संपूर्ण पणे शोषून घेतात जेणेकरून तो फक्त घरी गेल्यावर झोपू शकतो.
विचार करा. पटले तर मानसिक गुलामीतून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करा. एकच आयुष्य भेटले आहे ते मुक्त पणे जगा. ह्या संपूर्ण जगात तुमच्या सारखा दुसरा कोणी नाही इतके विशेष महत्वाचे आहात.
वरील लेखामध्ये कसा पैश्यांचा प्रवाह हा ठराविक ठिकाणी जातो हे नमूद करून दिले आहे. लोक कसे श्रीमंत होतात हेही तुम्हाला समजले असेल.
धन्यवाद
अश्विनीकुमार
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७