तुम्ही भाग्यशाली आहात कि दुर्भाग्यशाली



अनेक लोकांना हा प्रश्न पडत असेल कि "मी सोडून बाकीचे भाग्यशाली का आहे?" एकदा एक शिक्षक सफेद कपडा ज्यावर काळा ठिपका असतो ते घेवून येतो. तो विद्यार्थ्यांना कपडा दाखवतो आनि विचारतो "तुम्हाला काय दिसत आहे?" पहिला विद्यार्थी "सर काळा ठिपका", दुसरा विद्यार्थी "सर लहान काळा ठिपका", तिसरी विद्यार्थिनी "गोल आकाराचा काळा ठिपका". असे एक एक करून सगळे विद्यार्थी काळ्या छोट्या ठिपक्या बद्दलच बोलत असतात.
शिक्षक निराश होतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो "मी एक सफेद कपडा घेवून आलो ज्यामध्ये फक्त एकच काळा ठिपका आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना तो फक्त छोटासा काळा ठिपका दिसला पण कोणीही तो ठिपका सोडून बाकी इतक्या मोठ्या सफेद भागाकडे लक्ष्य नाही दिले."
शिक्षक पुढे म्हणाले "आपले आयुष्यही असेच असते. आपण आपल्या आयुष्यात जास्त प्रमाणात घडणाऱ्या चांगल्या घटना, आनंदाचे क्षण सोडून एखाद दुसरी काल, परवा किंवा काही वर्षांपूर्वी घडलेली एखाद दुसरी वाईट घटना किंवा क्षण लक्ष्यात ठेवून आपले वर्तमान आयुष्य दुखात आणि भविष्य अशीच काही घटना किंवा क्षण घडेल ह्या भीतीत जगत असतो."
शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे आणि जगभरातील अध्यात्मिक ग्रंथामध्ये हि उल्लेख आहे कि भाग्यशाली तोच असतो जो संपूर्ण लक्ष्य फक्त समस्येकडे केंद्रित करून नाही ठेवत, त्यांचे संपूर्ण लक्ष्य हे उत्तराकडे, संधीकडे असते. तुम्ही ज्यावर लक्ष्य केंद्रित कराल ते तुमच्या आयुष्यात घडणारच, दुसर्या भाषेत तुम्ही घडवत आहात.
आता तुम्ही ठरवा कि तुम्हाला कसे जगायचे आहे ते.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार