फ्रीलान्सर समज आणि गैरसमज





फ्रीलान्सर हे त्या त्या क्षेत्रातील तज्ञ असतात ज्यांना कुणाच्या हाताखाली जरी ती कंपनी त्यांना उच्च पद आणि करोडो रुपये पगार देत असेल तरी काम करत नाहीत. त्यांना स्वतःची कंपनी टाकून नुसते त्यापुरते एका मर्यादेत काम करणेदेखील मान्य नसते.
त्यांना दररोजचे वेळेची बंधन मान्य नसतात, पण जेव्हा ते काम मिळवतात तेव्हा २४ तासही ते आरामत त्यासाठी देतात कारण हे त्यांच्यासाठी काम नसून किंवा पैसे कमावण्याचे साधन नसून ती त्यांची आवड आहे.
मोठ मोठ्या कंपन्या ह्यांच्यावर करोडो रुपये खर्च करत असतात कारण ह्यांच्या इतके ज्ञान त्या कंपनीतील उच्च पदाधिकार्याला देखील नसते. मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या ह्यांना बोलावून काम करून घेतात. त्यासाठी ह्या कंपन्या त्यांना तासाने पैसे देतात.
फ्रीलान्सरची फी हि तासाला हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असते. त्यांना त्यांच्या कामाविषयी इतकी आवड असते कि ते प्रचंड दबावात कमी कालावधी मध्येही काम पूर्ण करून देवू शकतात.
फ्रीलान्सरची प्रत्येक समस्येवर समाधान करण्याची क्षमता अफलातून असते. हि क्षमता तुम्हाला कोठेही भेटणार नाही. ह्यांची मदत अनेकवेळा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत खातेही घेत असते. जिथे गोपनीयता आहे तिथेहि फ्रीलान्सरचा वापर करून घेतला जातो कारण ते त्यांच्या कामाशी एकनिष्ठ असतात.
९० टक्क्याहून अधिक फ्रीलान्सर ह्यांचे शिक्षण पूर्ण झालेले नसते. त्यांनी शाळा महाविद्यालयामधील शिक्षण अर्धवट सोडून संपूर्ण वेळ हा त्यांच्या आवडीसाठी दिलेला असतो. उरलेले निवृत्त असतात आणि त्यानंतर उरलेले हे पदवीधर असतात.
सहसा हे कुणाला भेटत नाही. अगोदर त्यांनी ज्यांचे काम केले असेल किंवा त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती असेल त्यांच्या सिफारशीने ओळखीने त्यांना भेटू शकतो.
फ्रीलान्सर चे काम हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत सुरु असते. त्यांच्याकडे जगभरातील तज्ञ लोकांची टीम असते.
जास्तीत जास्त फ्रीलान्सर हे त्यांच्या जन्मजात गुणांमुळे पुढे आलेले असतात, ते स्वतःहून आपोआप शिकत जातात. इतरांपेक्षा त्यांचा शिकण्याचा कालावधी खूप कमी असतो. त्यांच्या शिक्षणामध्ये व्यावहारिक ज्ञान जास्त प्रमाणात असते.
फ्रीलान्सर ची शाळा म्हणजे हे संपूर्ण जग आहे. ते कुठल्याही बंद भिंतीमध्ये असलेल्या शाळा कोलेज मधून आलेले नसतात. ह्यांना वयाचे बंधन नसते, तुम्हाला सगळ्यात कमी वयाचा आणि सगळ्यात जास्त वयाचा फ्रीलान्सर आढळून येईल.
फ्रीलान्सर हे सर्व क्षेत्रात आढळून येतात. माहिती तंत्रज्ञानामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतील. ह्यांच्या कामाचे ठिकाण हे घर, सीसीडी, हॉटेल किंवा ऑफिस मध्ये वेगळी जागा हे असते.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार