मला एक समजले नाही कि उच्च शिक्षित उच्च पदाधिकारी हे सरकारी नोकरीवर असताना काही बोलत नाही पण निवृत्त झाल्यावर असे काही मार्गदर्शन करतात, आरोप प्रत्यारोप करतात कि जसे काय ते त्याविरुद्धच उभे होते आणि वेळ प्रसंगी आपली नोकरी सोडायला देखील तयार होते. जे कोणी कमी शिक्षित किंवा कनिष्ठ पदावर आहेत त्यांनी हे समजून घ्यावे, हुशार बनावे, आणि निवृत्त झाल्यावर हिरो बनायचा प्रयत्न करावा जे काही शक्य नाही कारण भांडवलशाही मिडिया सुद्धा संधी फक्त उच्च पदावर असलेल्यांनाच देते. माणूस दिसतो तसा नसतो, ते फक्त त्याच्या घरच्यांना आणि त्याच्यासोबत काम केलेल्यांनाच माहित असते. कामावर असताना कोणीतरी तुम्हाला भडकाऊन देईल व तुम्ही जोश मध्ये काहीतरी कराल आणि आपली नोकरी कायमची गमावून द्याल.
लोक तुम्ही समजता तेव्हढी मूर्ख हि नाहीत आणि हुशारही नाही, जेव्हा एक चूक कराल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल.
लोक तुम्ही समजता तेव्हढी मूर्ख हि नाहीत आणि हुशारही नाही, जेव्हा एक चूक कराल तेव्हा तुम्हाला अनुभव येईल.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार