गुंतवणूक केल्या केल्या ३ ते ६ महिन्यात गुंतवलेली रक्कम वसूल करून देणारा द्रोण आणि पेपर डिश व्यवसाय.




गुंतवणूक केल्या केल्या ३ ते ६ महिन्यात गुंतवलेली रक्कम वसूल करून देणारा द्रोण आणि पेपर डिश व्यवसाय.
त्यानंतर निव्वळ नफा.
संपूर्ण महाराष्ट्रातून भेटलेल्या प्रतिसादामुळे मी हि पोस्ट परत अपडेट करत आहे. मुंबई आणि जवळील जिल्ह्यातून अनेकांनी प्रत्यक्ष भेट दिली व मशीन विकत घेवून आपला व्यवसाय सुरूही केला, पण जे लांब राहत आहेत त्यांच्यासाठी व्हिडीओ अपलोड करत आहे.
ह्या व्हिडीओ मध्ये मशीन, कच्चा माल आणि तयार झालेल्या मालाची गोनी ह्यासाठी लागणाऱ्या जागेचाही तुम्हाला अंदाज येईल. ज्यांना घरातून सुरु करायचे आहे किंवा गाळा घेवून मोठ्या प्रमाणात सुरु करायचे आहे त्यांना जागेचा अंदाज घेता येईल.
खालील मासिक उत्पन्न हे पूर्ण वेळ काम करून भेटते.
भारत देश हा सणासुदीचा, मेळावे, जत्रा आणि सामुहिक कार्यक्रमांचा असल्यामुळे हा व्यवसाय सतत भरभराटीत असतो. तुम्ही एकट्याने देखील हा व्यवसाय करू शकता किंवा २ पेक्षा जास्त लोक मिळूनही हा व्यवसाय करू शकता.
महिला बचत गट व इतर संस्था ह्यांच्या साठीही अतिशय उपयुक्त व्यवसाय आहे.
उद्योजक विशाल शेडगे आणि विनोद काळे ह्यांना स्वतःचे काही तरी करायचे हा विचार शांत बसू देत नव्हता. मध्यम वर्गीय नोकरदार कौटुंबिक पार्श्वभूमी, ना घरातून ना समाजातून मदत. वरून कुटुंबाची जबाबदारी. जर नोकरी सोडली तर कुटुंबाचे पोट भरणार कसे? तरीही धाडस दाखवत नोकरी सोडली, उद्योग सुरु केला.
इथे पहिल्याच उद्योगात कोणीही मदत तर केली नाही पण सर्वांनी फसवले. मशीन घेताना फसगत झाली, कच्चा माल घेताना फसवले गेले, बाजारातील अनुभवी दुकानदार कमी भावात माल खरेदी करू लागले. ह्या परिस्थितीत अने जन हार मानतात पण ह्या दोघांनी हि वाईट परिस्थिती शिकण्याच्या उद्देशाने घेतली आणि हाच तो वाईट अनुभव पुढील द्रोण पेपर डिश च्या व्यवसायात कामी आला. हा अनुभव तुम्हाल कोठेही बिझनेस मेनेजमेंट च्या विद्यापीठात भेटणार नाही.
पेपर डिश आणि द्रोण व्यवसाय सुरु करण्याअगोदर मागील अनुभव चांगलाच कामी आला मशीन घेताना त्यांची फसगत झाली नाही आणि रास्त दरात मशीन खरेदी करण्यात आली. परत हा व्यवसाय नवीन होता त्यांच्यासाठी, फसगत होणे तर अपेक्षित आहे.
आता त्यांना लागणारा कच्चा माल पेपर ह्यामध्ये फसगतीला सामोरे जावे लागले. मागचा धाडसी आणि दांडगा अनुभव असल्यामुळे ते ह्याही परिस्थितीमधून लवकर उभे राहिले व त्यांचा हा व्यवसाय यशाच्या दिशेने घौडदौड करायला लागला.
एक मशीन आणि छोटासा गाळा ह्यापासून सुरु केलेल्या व्यवसायाचे त्यांनी मोठ्या व्यवसायात रुपांतर केले व आज ते स्वतःहि द्रोण पेपर डिश बनवतात व अनेक गरजूंना हा व्यवसाय करायचे शिकवून त्यांनाही त्यांच्या पायावर उभे केले.
आज त्यांचा व्यवसाय उत्तम जम बसवून आहे.
खालील व्हिडीओ मध्ये मशीन, लागणारा कच्चा माल, त्याचा दर्जा, उत्पादनाचा दर्जा ह्याचा तुम्हाला अंदाज येईल.
प्रबळ इच्छा शक्ती, धाडस आणि प्र्वाहाविरुद्ध पोहण्याची क्षमताच मनुष्याला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते.
युट्युब वर व्हिडीओ खालील लिंक वर चेक करा.
१) हेंड प्रेस मशीन पेपर डिश डाय सोबत - ३५,००० हजार रुपये
द्रोण डाय सोबत - ३०,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न १०,००० ते १५,००० रुपये
२) सेमी ऑटोमेटिक द्रोण मेकिंग मशीन सिंगल स्ट्रोक - ३०,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न ९,००० ते १२,००० हजार रुपये
३) सेमी ऑटोमेटिक द्रोण मेकिंग मशीन डबल स्ट्रोक - ५०,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न १५,००० ते १८,००० हजार रुपये
४) फुली ऑटोमेटिक द्रोणा मेकिंग मशीन सिंगल स्ट्रोक - ७५,००० हजार रुपये
मासिक उत्पन्न - १५,००० ते १८,००० हजार रुपये
५) फुली ऑटोमेटिक द्रोणा मेकिंग मशीन डबल स्ट्रोक - १,१०,०००
मासिक उत्पन्न - २०,००० ते २५,००० हजार रुपये
६) एम्बॉसिंग मशीन ० नंबर आणि १ नंबर डाय कटर सोबत - १,१५,०००
मासिक उत्पन्न - ३०,००० ते ३५,००० हजार रुपये
उत्तम प्रतीचा कच्चा माल उपलब्ध करून दिला जाईल
सर्कल कटिंग पेपर, ० ते ५ नंबर डीश पेपर
वितरक (डिस्ट्रीब्युटर) ह्यांनी द्रोण, ० ते ५ नंबर पेपर डिश ह्यासाठी संपर्क करावा.
विशाल शेडगे आणि विनोद काळे
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार फुलझेले
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार